हे खरं आहे?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
17 Feb 2010 - 6:21 pm

आज मला असं कळले की अमेरीकेत गर्भलिंगनिदान हा भारतातल्या प्रमाणे गुन्हा नाही... ही माहिती प्रथमच कानावर आल्याने खरी की खोटी ते जाणून घेण्यास उत्सूक आहे.

समाज

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

17 Feb 2010 - 7:10 pm | नितिन थत्ते

शक्य आहे. विकास (बिना बांबूवाले), रंगाशेठ, डांबिसकाका वगैरे प्रकाश टाकू शकतील.

भारतातल्या परिस्थितीमुळे तो गुन्हा ठरवावा लागला आहे.

नितिन थत्ते

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2010 - 1:10 am | पिवळा डांबिस

खरं आहे...
अमेरिकेत अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ही मूल निर्व्यंग आहे याची खात्री करून घेण्यासाठी करतात. मग त्यादरम्यान डॉक्टरांना त्या अपत्याचं लिंगनिदान होतंच. जर आईवडिलांची इच्छा असेल तर डॉक्टर ते आईवडिलांना सांगतात नाहीतर गुप्त ठेवतात...
माझ्या मुलाच्या बाबतीत, जी गोष्ट मेडिकल स्टाफला माहिती आहे ती आम्ही पालक म्हणून माहिती करून न घेण्यात काहीच पॉईंट नव्हता. उलट त्या माहितीमुळे अपत्यासाठी नांवं शोधण्याचं काम अर्ध्याने सोपं झालं!!!:)

संग्राम's picture

17 Feb 2010 - 7:15 pm | संग्राम

नक्की माहीत नाही पण "फ्रेंड्स" च्या एका एपिसोड मध्ये डॉक्टर,
रॉस आणि रिचल ला विचारतात की तुम्हाला बेबी मेल की फीमेल हे जाणून घ्यायचे आहे का ?
.... असेल तर मेडिकल रिपोर्ट फाइल मध्ये बघा ...

चिरोटा's picture

17 Feb 2010 - 7:15 pm | चिरोटा

अमेरिकेत प्रत्येक राज्याचेही काही कायदे असतात्.काही राज्यांत ते कायदेशीर असेल तर काही राज्यांत २०० वर्षाचा कारावासही होवु शकतो.! :)
P = NP

मस्तानी's picture

17 Feb 2010 - 7:24 pm | मस्तानी

निदान मी तरी असं पाहिलंय की इथे अगदी सर्रास पाचव्या महिन्यात मुलगा का मुलगी हे कळते आणि नवीनच होऊ घातलेले आई-बाबा अगदी हौशीने मुलगा असेल तर निळे आणि मुलगी असेल तर गुलाबी कपडे घेतात ... शिवाय बाळाचे नाव देखील बऱ्याच वेळी जन्माच्या दिवशीच register करतात ... बारसं वगैरे नंतर नावापुरतं केल तर करतात ...

सनविवि's picture

17 Feb 2010 - 7:45 pm | सनविवि

तिकडे स्त्रीभ्रूणहत्या होत नाही (किंवा अतिशय कमी प्रमाणात), त्यामुळे लिंग निदान कायदेशीर आहे. पण South East Asian immigrants नी याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहेच.

डॉक्टर सांगतात..
असा उल्लेख कायद्याने मान्य असावा..

हे व्हर्जीनियात तरी कायदेशीर आहे हे स्वानुभवाने सांगू शकतो. बहुदा अमेरिकेत सर्वत्र कायदेशीर असावे.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

प्राजु's picture

17 Feb 2010 - 9:48 pm | प्राजु

हो इथे सांगतात.
कारण इथे स्त्रीभ्रूण हत्या होत नाहीत.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

शैलेन्द्र's picture

17 Feb 2010 - 9:50 pm | शैलेन्द्र

हे वाचा...

Sequenom's Shares Soar on Launch of Fetal Sex Determination Test
February 16, 2010

By a GenomeWeb staff reporter

NEW YORK (GenomeWeb News) – Shares of Sequenom were up 14 percent in mid-afternoon trade on the Nasdaq after the firm announced earlier today the launch of its SensiGene Fetal (XY) test through its CLIA lab, the Sequenom Center for Molecular Medicine.

The new SensiGene test is a non-invasive assay that detects circulating cell-free fetal DNA in maternal blood. It interrogates male specific targets on the Y chromosome and runs on Sequenom's MassArray system.

Sequenom said that a validation study showed that the test had 97.9 percent sensitivity and 100 percent specificity.

http://www.genomeweb.com//node/933839?hq_e=el&hq_m=621428&hq_l=2&hq_v=32...

वर्षा म्हसकर-नायर's picture

17 Feb 2010 - 10:37 pm | वर्षा म्हसकर-नायर

माझ्या मते indian sub continent सोडुन सगळीकडे गर्भ लिंगनिदान हा गुन्हा नाही.
मी भारताबाहेर रहाते. मला स्वतःला देखिल माहीत होते मला मुलगा होणार का मुलगी.
Indian subcontinent प्रमाणे इतर देशात, मुलगी जन्माला येणं हे वाईट समजले जात नाही. तीथे मुलगी आहे हे कळल्यावर भ्रुणु हत्या, अर्भक हत्या होत नाही.
भारतात हे होते आणि ह्याच कारणास्तव भारतात लिंगनिदान हे कायद्याने गुन्हा आहे.
अमेरिकेत उलट ते जाणून घेतात म्हणजे त्याप्रमाणे बाळाचे कपडे आणि इतर गोष्टी ह्यांची advance मधे तयारी करता येते. ते तर baby ची room , pink or blue color ने सजवायची ते त्यांना कळते. :) (हे म्हणजे आपल्या साठी अतिच नाही :) )

युयुत्सु's picture

18 Feb 2010 - 8:41 am | युयुत्सु

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

चिऊ's picture

18 Feb 2010 - 12:17 pm | चिऊ

तिकडे ते कायद्यानी मान्य आहे....

स्वानुभवावरून सांगू शकतो की अमेरीकेत टेक्सासमध्ये मुलगा की मुलगी ते सांगतात. आम्हाला नर्सने सांगितले होते.