रेशीमगाठी..

राधा१'s picture
राधा१ in जनातलं, मनातलं
13 Feb 2010 - 3:25 pm

एक प्रसन्न सकाळ...
सगळे रोजच्या सारखेच सुरु होते.
धडधड...रोजचेच स्टेशन..रोजचीच गाडी...वेळ एकदम सकाळची म्हणुन फारशी गर्दी नाहीच..

लेडीजचा पहिला दर्जाचा डबा..एक रोजचा ग्रुप दारात गप्पा मारत उभा आहे...

बाजुच्या जेन्ट्सच्या डब्याच्या दारात दोन मुलं निसर्ग सौंदर्य (???) बघत इकडे तिकडे बघत उभे आहेत.

एका मुलाच लक्ष सहज(?) मुलींच्या डब्याकडे जातं..आणि एका मुली बरोबर नजरानजर होते. आणि मग येथे सुरू होतो... नजरेचा खेळ!!!!

ती: अगं आताशा रोज तो बघत असतो गं?
मैत्रिण१ : ए तुला कस काय गं कळल?
ती: अगं म्हणजे माझ लक्ष गेल गं चुकुन..म्हणजे मी काही रोज नाही बघत पण आता..कोणीतरी बघत आहे अस कळल्यावर जाणाराच न गं लक्ष?
मैत्रिण२: सांभाळुन गं राणी...काय आहे ना, आज कालच्या पोरांचा काही भरवसा नसतो ..उगीच तुला आपल वाटत असेल की आपल्याकडेच बघत आहे म्हणून..!!!
मैत्रिण१ : तुला कशाला गं त्रास होत आहे? चांगला हँडसम आहे बघत आहे म्हणजे लाइन देत आहे मग काय प्रोब्लेम आहे..
ती: ए तुम्ही कशाला भांडत आहात गं त्याच्यासाठी...आता कोण बघत आहे म्हटल की लक्ष जाणारच ना गं!!
आणि शिवाय मला कुठे त्याच्याशी लग्न करायचंय्? गाडीमधली माणसं गाडीपर्यंतच दिसतात नंतर कुठे दिसतात गं? चला आपल स्टेशन आलं आता उतरुया..

{मुलांचा डबा}
तो: जस्ट ब्रेक द रुल..ती पण आज बघत होती बॉस...नक्की बघत होती..माझं होत ना लक्ष बारीक!!
मित्रः मजा आहे बॉस ..च्यायला एम.एन.सी मध्ये जॉब नाही लागला काय तर महिन्या दोन महिन्यात मुलींच्या हॉट लिस्ट वर तु गेलास...
तो: तुझं ना आपल काही तरीच यार. मी तर जस्ट मजा करत होतो रे..अरे ह्या ट्रेन मधल्या मुली दिसतात होय कुठे. तुझं आपला काहीतरीच येड्यागत..बरं ते जाउदे.. विकेंडला कुठे जायच बोल..नाहीतर मागच्या सारखा घोळ घालून ठेवशील..आपण जायचं ना मुव्हीला?? का सरळ भटकायला जायचंय?

मित्रः ओके बघु बॉस अजुन चांगले दोन दिवस आहेत ना..बहुदा भटकंतीच करु या.. अरे उतर लवकर आपल स्टेशन आलं पण बघ..च्यायला त्या पोरींच्या नादापायी आपल लक्षच नव्हत बॉस..
तो: चला आता ..

{दोन महिन्यानंतर}
ती: काय गं तो अजिबात दिसत नाही आहे ना गेले ८ दिवस? जॉब सोडला वगैरे का त्याने?
मैत्रिण२: कोण दिसत नाही आहे गं? हा हा...कोणीतरी कोणाला तरी मिस करत आहे का?

मैत्रिण१: अगं बाई आता रोजची सवय झाली आहे ना.. दिसला नाही तर जीव तुटणार नाही का?
आपण विचारायच का त्या दुसर्‍याला?
ती: ए मी सहजच म्हटलं ग!! तुम्ही दोघी म्हणजे ना!! आणि त्या दुसर्‍याला काही गरज नाही आहे विचारायची...मी आपल सहजच म्हणत होते..

दोघी मैत्रिणी: हो का? बंरं !!!! आम्हाला आपल वाटलं की... याद आ रही है | तेरी याद आ रही है|
याद आनेसे तेरे जानेसे जान जा रही है | याद आ रही है| अस काही होत आहे का?
ती: तुमचं आपल काहीतरीच!!

{सेलफोनवर}
मित्रः अरे बॉस कसा आहेस? पार्टी पाहिजे पार्टी आता...
तो: अरे मी मजेत रे.. प्रोजेक्ट संपत आला बाबा एकदाचा..कधी परत येईन अस झालंय मला. आणि पार्टी कसली हवी आहे रे तुला?

मित्रः अरे कर जरा विचार कर बॉस..काहीतरी खबर आहे खास.. आणि ज्यासाठी तुला येथे लवकर यायचं आहे ना त्यासाठीच हवी आहे मला पार्टी ..
तो: अरे नीट सांग ना काय ते..
मित्रः अरे ती रे गाडीतली तुला शोधत आहे गेले २/३ दिवस..म्हणजे मी काही तिच्याशी बोललो नाही, पण तिच्या डोळ्यातुन दिसत होतं...
तो: काहीपण काय सांगतोस तू ? बहुदा सकाळपासुन मीच पहिला भेटलो की काय...काहीपण सांगत आहेस ते
मित्रः अरे खरच रे..मी सांगतो ना तुला..
तो: चल अच्छा फोन ठेवतो आता..मस्करी बास आल्यावर बोलु..मी येत आहे २/३ दिवसांत..मग भेटुच ट्रेन ला.
मित्रः ओक्के बॉस

{४/५ दिवसांनंतर: ट्रेन मध्ये}
{ लेडीजचा डबा}
मैत्रिण१ : अरे आलाय बघ तो आज...बोलुन घे ना त्याच्या बरोबर.
ती: ए अस कस बोलु गं काय वाटेल त्याला?
मैत्रिण२: अग काहीपण काय सल्ला देतेस तिला. कोण कुठचा आपल्याला फक्त रोज बघुन माहित आहे..
ती: ए गप्प बसा की ग दोघीजणी..मी कोणाशीच काही बोलत नाही आहे ..कळल का? आता भांडु नका ग!! तो तिथे मजेत बसला आहे आणि आपण मात्र उगीचच भांडत आहोत.असो वाटल वाटल बोलावस तर नंतर बोलु पण आत्ता सध्या नकोच.

{जेण्ट्स चा डबा}
तो: अरे आज ती एकदम छानच दिसत आहे
मित्रः अरे विचार ना तिला काय स्पेशल म्हणुन?
तो: अस कस विचारु?
मित्रः अरे ती सुद्धा येथे बघत असते म्हणजे तिला सुद्धा इंट्रेस्ट असेल बॉस.
अरे ट्राय तर कर... संध्याकाळी बघ ती असते आपल्या नंतरच्या ट्रेनला..बघ हवं तर थांब!!!
तो: काहीही..बघतो जमलं तर

{२ महिन्यांनी}
स्थळ स्टेशन..
तो आणि ती....

लेडीज डब्बा:
मैत्रिण१: काय गं दोघींनी मिळून माझी मस्त विकेट घेतलीत..
ती: अग सगळ क्रेडीट आमच्या वन्संना जातं..तिच्या मुळेच हे सगळ शक्य झाल..आमच्या हिरोंची आयडिया होती ही
मैत्रिण२: खर तर ह्याच सर्व श्रेय माझ्या बंधुरायालाच बर का? कारण आम्ही रोज दोघ स्टेशन पर्यंत एकत्र यायचो..त्याने हिला बघितलं..आणि सांगितल मला आज पासून ही तुझी वहिनी..पण जुळवुन मात्र तु आणायला पाहिजेस..मग पुढच्या गोष्टी ह्याने मित्राला घेऊन केल्या..पहिल्यांदा मित्राला सांगितल..ती बघत आहे म्हणुन..आणि मग काय काय झाल ते कळलंच..दादाला मध्ये कामासाठी परदेशी जावं लागलं..त्यामुळे हिच्या मनातली कळकळ सुद्धा मला जाणवली..मग काय घेतला दादाने पुढाकार..म्हणुन तिच मत जाणुन घेण्यासाठी तिला त्याच्या विरुद्धा सांगत राहिले.... ;)

{जेण्ट्स चा डबा}
मित्र : अरे तु तर माझा चांगलाच बकरा बनवलास की..सगळ प्री-प्लान होत तुझं आणि तुझ्या बहिणीचं..जाम आगाऊ आहात तुम्ही दोघं....पण यातुन मला मात्र फायदा झालाय..तुला सुद्धा वहिनी मिळणार आहे आता... हा हा हा...

तो: कोण? काय सांगतोस काय?
मित्रः ओळख की तू?
तो: अरे सांग की...
मित्र: बघ हं चिडांयच नाहीस..
तो: नक्की नाही चिडत
मित्रः अरे तुझीच बहिण... हा हा हा..!!! :) :)
तो: अरे हे तर ती बोललीच नाही...पण उत्तम झाल :)
मित्रः ह्म्म्म!!! आमच असच ठरलं होत..की आत्ता तुला नाही सांगायच..पण काय करणार..शेवटी तू माझा खरा मित्र पडलास ना..तुझ्यापासुन काय लपवायच? म्हणुन सांगितल तुला..:)

नाट्य

प्रतिक्रिया

स्वप्नाली's picture

13 Feb 2010 - 3:29 pm | स्वप्नाली

व्वा!!! खुपच छान जमली आहे की कथा!!!!
फारच छान...अशीच लिहीत रहा.. :)

चिरोटा's picture

13 Feb 2010 - 5:32 pm | चिरोटा

मस्त जमलाय नजरेचा खेळ.
(८:४०-अंधेरी-सी.एस्.टी हार्बर) भेंडी
P = NP

शुचि's picture

13 Feb 2010 - 5:39 pm | शुचि

गंमत आली. खूप छान आहे कथा.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण's picture

13 Feb 2010 - 6:01 pm | मदनबाण

कथा आवडली... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato