आता राम लल्लालाच करायला हवे
बाबरीपरी मशिदींच रक्षण
अन रसूल अल्लालाच धावायला हवंय
मंदिर जन्मभूमी वाचवायला .....
स्वत:च्याच अस्तित्वासाठी ...
तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी
स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा.....
खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना
जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो...
असते ती फक्त एक जीवघेणी नशा...
धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची
वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची...
तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा
कान, डोळे, तोंड बंद करून
महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये.
थांबव या हिंस्र पशूंना...
त्यांच्या निगर गट्ट हृदयाच्या गाभा-यात खोलवर शिरून...
माणुसकीचा झरा पाझरत बंधुभावच खरा धर्म याची जाणीव करून दे त्यांना
नाहीतर कोण पढेल रोज नमाज...
अन कोण गाईल महाआरती..... ?
प्रतिक्रिया
11 Feb 2010 - 1:55 pm | अविनाशकुलकर्णी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
11 Feb 2010 - 3:12 pm | विसोबा खेचर
सदर कवितेत इतकं गडाबडा लोळत हसण्यासारखं काय आहे ते कळलं नाही..
तात्या.
11 Feb 2010 - 1:55 pm | पक्या
छान कविता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
11 Feb 2010 - 1:58 pm | अविनाशकुलकर्णी
सारे मुसलमान अतिरेकी नाही हे जरी खरे असले तरी सारे अतिरेकी मुसलमान आहेत त्याचे काय?
11 Feb 2010 - 3:51 pm | विजुभाऊ
सारे अतिरेकी मुसलमान आहेत त्याचे काय?
ही एक भाजपच्या गणगोतानी उठवलेली एक बजारगप आहे.
१) आयर्लंड मध्ये कोण अतीरेकी आहेत?
२) अतीरेकी वागणार्या अमेरीकेचा धर्म कोणता आहे?
३) बियंत संग/ सतवन्तसिंग हे कोणत्या धर्माचे होते?
४) जपान मधले ओम शिनरी क्यो अतीरेकी हे कोणत्या धर्माचे आहेत.
५) वेल्लुपिल्लई प्रभाकरन आणि त्याचे सहकारी कोणत्या धर्माचे आहेत.
६)नेपाळमधल्या माओवादी अतीरेकी कोणत्या धर्माचे आहेत.
७)नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चारू मजूमदार/कानू सन्याल कोणत्या धर्माचे आहेत?
८)जर्मनीतील नीओ नाझी कोणत्या धर्माचे आहेत?
भाजपच्या प्रभावळीत रहाणार्या तथाकथीत बुद्धीवंतांच्या "सारे अतीरेकी मुसलमान आहेत " तथाकथीत मेंदूतून निघालेली एक बाजारगप ...त्यावर किती विश्वास ठेवायचा
"उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद" असे करू नका
12 Feb 2010 - 1:02 pm | सागरलहरी
अतिरेक्याना धर्म नसतो.... पण एखादा तथाकथित धर्मच इतरांवर वर्चस्व गाजवण्याला अतिरेक वादाला खतपाणी घालत असेल सुसाट हिंसेचे समर्थन करत असेल व आपल्या विचारसरणीतून अतिरेकी घड्वत असेल तर काय ?
बाकी भाबडे पणा ठीक आहे..
12 Feb 2010 - 11:09 pm | मराठे
अतिरेकी हा अतिरेकीच असतो. तो कोणत्याही धर्माचा नसतो.
कसाब मुसलमान नसता तर त्याने जे केलं ते क्षम्य होउ शकतं?
बजरंग दलाने लोकांना जिवंत जाळंलं ते क्षम्य होतं?
11 Feb 2010 - 3:10 pm | विसोबा खेचर
छान आहे कविता अन् त्यातले विचार..
तात्या.
11 Feb 2010 - 4:27 pm | शुचि
फार करूण कविता आहे. पाणी आलं डोळ्यात वाचून.
पहील्या प्रतिक्रियेतील अस्थाई स्मायली पाहून जे वाटलं ती भावना व्यक्त करण्याकरता टारझन यान्चाकडून भां*** बाझ*** यव्यतिरिक्तही शब्द शिकावे लागतील असो.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
14 Feb 2010 - 5:02 am | अविनाशकुलकर्णी
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्
रता अधिक असून हा घातपात झाल्याची माहिती एटीएसद्वारे सांगण्यात आली आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
सायंकाळी पावणे आठच्या सुमारास झालेला हा स्फोट सुरवातीला सिलेंडरचा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, स्फोटाची तीव्रता आणि स्फोटासाठी वापरलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हा बॉम्ब स्फोट असल्याचे एटीएसतर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रथमदर्शनी हा बॉम्ब स्फोट असून या मागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
स्फोट झाल्यानंतर स्फोटाचा आवाज सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जर्मन बेकरीचे संपूर्ण नुकसान झाले असून परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळी एटीएस आणि पोलीस पथक पोहचले आहेत. जखमी आणि मृतांना जखमींना ससून आणि खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दोन अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
या स्फोटाची तीव्रता पाहता घातपात झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या हायप्रोफाइल परिसरात २६/११ चा मास्टरमाइंड डेव्हीड हेडलीही या भागात येऊन गेल्यामुळे या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत होते. हा संशय रात्री पावणे नऊच्या सुमारास खरा ठरा
या परिसरात ज्यूइशी सेंटर आणि ओशो आश्रम आहेत.
=========================