नको आणखी

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
9 Feb 2010 - 4:41 pm

फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

जयश्री अंबासकर

गझल

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Feb 2010 - 4:43 pm | विसोबा खेचर

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

वा जयू, सुंदर काव्य!

तात्या.

Dhananjay Borgaonkar's picture

9 Feb 2010 - 4:45 pm | Dhananjay Borgaonkar

जयश्री ताई वेलकम बॅक...
बर्याच दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.
छान आहे कविता.

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

एक नंबर....

क्रान्ति's picture

9 Feb 2010 - 8:43 pm | क्रान्ति

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
वा! :)

क्रान्ति
अग्निसखा

शुचि's picture

9 Feb 2010 - 11:12 pm | शुचि

क्या बात है

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

आई ग!!!!!!!!!

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

संदीप चित्रे's picture

10 Feb 2010 - 12:12 am | संदीप चित्रे

>> गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

>> येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

कायच्याकायच आवडले :)

ऋषिकेश's picture

10 Feb 2010 - 12:30 am | ऋषिकेश

गझल आवडली. त्यातही

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

हे बेष्टच
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

जयवी's picture

11 Feb 2010 - 9:51 am | जयवी

तात्या, धनंजय, क्रान्ति, शुचि, संदीप, ऋषिकेश......धन्यवाद !!
इतक्या सुरेख प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं :)

जयवी's picture

11 Feb 2010 - 9:55 am | जयवी

:)

वर्षा म्हसकर-नायर's picture

11 Feb 2010 - 11:35 am | वर्षा म्हसकर-नायर

जयु,
>>जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
>>>>

सुरेख गं ! खुsssssssssssssssssssssssपच आवडली. जीयो. जीयो.

वर्षा

वर्षा म्हसकर-नायर's picture

11 Feb 2010 - 11:36 am | वर्षा म्हसकर-नायर

जयु,
>>जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
>>>>

सुरेख गं ! खुsssssssssssssssssssssssपच आवडली. जीयो. जीयो.

वर्षा

मदनबाण's picture

11 Feb 2010 - 12:56 pm | मदनबाण

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

सॉलिट्ट्ट्ट... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato