राणी वै-याची रात्र आहे...जागी रहा !
फक्त जागीच नव्हे..जागृत रहा.....
सरस्वतीच्या मंदिरात
सर्वासमोर जाळली गेलेली रिंकू...
भर रस्त्यात चाकूच्या घावांनी
तडफडणारी अमृता...
टाहो फोडून आकांताने सांगताहेत
राणी वै-याची रात्र आहे..जागी रहा...
तथाकथित पौरुषाचा डंका पिटणारे
भ्याड महाभाग खरतर अधमच..
खून, बलात्कार, जळीत..
उघड्या डोळ्यांनी मिटक्या मारीत पाहतात
जिभल्या चाटत विकृत आनंद उपभोगतात
आणि वेळ येताच पाय लावून पळत सुटतात .
सावधान राणी सावधान !
वै-याची रात्र आहे जागी रहा ...
दिप्ति,जयबालापारी शूराने धै-याने सामोर जा
झाशीच्या राणीचा वारसा अंगीकारून
खातमाच करून टाक
या वासनांध गनिमांचा.....
आमेन !
शरद