एक दिवस भटकंतीचा: स्मरणरंजन

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
6 Feb 2010 - 9:53 am

मी, मनोज आणि त्याची पत्नी मधु अश्या तिघांनी भटकायला जायचे ठरवले (अर्थातच बाकीच्या मित्रांना वेळ नव्ह्ता). ताम्हिणी घाटात जायचा बेत ठरला.३ ऑक्टोबर ०९ ला आम्ही तिघांनीही सकाळी १०.३० वाजता पुणे सोडले तेही अर्थातच मनोजच्या स्विफ्ट गाडीने. आकाश अंशत: ढगाळ होते. पिरंगुट, पौड मागे टाकून आम्ही दीड तासात मुळशी ला पोहोचलो.सर्व परिसर तेरड्याच्या जांभळ्या आणि सोनकीच्या पिवळ्या सोनेरी फुलांनी भरून गेला होता. पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे अशी गावे पार करत आम्ही ताम्हिणी घाटाच्या तोंडावर जाऊन पोहोचलो.

आजूबाजूला गर्द हिरवाई पसरली होती. आणि त्यात फुलांच्या सोनेरी, जांभळ्या रंगांमुळे परिसर सुरेख नटला होता.
आता वर आभाळ गच्च दाटले होते. खग्रास सुर्यग्रहणात जसा अचानक अंधार दाटुन येतो तसेच आम्ही अचानक ढगांमधे शिरलो. आता २/३ फुटांवरचेही काहीही दिसत नव्हते. मनोज सावधगीरीने गाडी हाकत होता. दरीच्या अलीकडे आम्ही गाडी लावली आणि आम्हि ढगांमधे उतरलो. हळुहळु जाउन आम्ही दरीचा काठ शोधून काढ्ला. तिथेच ३ महिन्यांपुर्वि आम्ही होतो.

आता मनोजने वाइल्ड ऑर्किड ची झाडावरील रोपे गोळा केली तसेच मॉस पण घेतली. तेवढ्यात जोराच्या पावसाल सुरुवात झाली व आम्ही गाडीत आलो. आता आम्ही घाट उतरायला सुरुवात केली. १५, २० मिनिटातच आम्ही जसे अचानक ढगांमधे शिरलो तसेच अचानक ढगांतुन बाहेर पड्लो. आता सर्व काहि स्वछ दिसत होते. आणि मागे सर्व ढग होते. काही वेळातच आम्ही घाट उतरुन कोकणात माणगावला पोहोचलो.

पाउस आता सर्वत्र पडत होता. माणगावला जेवण करुन आम्ही रोहा, वाकण फाट्यामार्गे पालीजवळ पोहोचलो. तिथे. जवळच उन्हेरे गावी गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथे गेलो. एकुण ४/५ कुंडे आहेत. गरम पाणी हे गंधक मिश्रित असल्याने काळे होते. तसेच त्याला उग्र वासहि होता. आम्ही थोडावेळ तिथे हात, पाय बुडवून बसलो. पाणी चांगलेच गरम होते. मग आम्ही तिथून देवाचे दर्शन घेउन निघालो ते १० मिनिटाच पाली गावात पोहोचलो. अष्ट विनायकांपैकी एक असलेला बल्ल्लाळेश्वराचे दर्शन आम्ही घेतले. गजाननाची मुर्ती मोठी छान व प्रसन्न आहे. पाउस असल्याने गर्दी नव्हती. मग आम्ही तिथुन निघालो. आता धुवाधार पाउस सुरु झाला होता. तिथून पाऊण तासात खोपोली गाठून द्रुतगती महामार्गाद्वारे आम्ही तिघेही ९.३० च्या सुमारास पुण्यात पोहोचलो.

प्रवास

प्रतिक्रिया

शुचि's picture

6 Feb 2010 - 11:28 am | शुचि

पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे , उन्हेरे वैगेरे तपशीलवार नावे ऐकताना कानाला खूप गोड वाटली.
छायाचित्रं - एकल्या उभ्या झाडाचं खूप गोड. प्रवासवर्णन मस्त.
गणपतीच दर्शन झल असत तर बरं झालं असतं अस राहून राहून वाटत राहीलं. परवानगी नसेल कदाचित छायाचित्र काढायची.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

सुनील's picture

6 Feb 2010 - 12:05 pm | सुनील

अप्रतिम फोटो. अजून थोडी माहिती चालली असती!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विमुक्त's picture

6 Feb 2010 - 1:15 pm | विमुक्त

सुंदर फोटो...

मीनल's picture

6 Feb 2010 - 8:32 pm | मीनल

दुसरा आवडला.
तिथे रानात आपण स्वःतच उभ आहे अस वाटल.
मीनल.

मदनबाण's picture

13 Feb 2010 - 12:15 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 12:48 pm | विसोबा खेचर

छान..

स्पा's picture

7 Jun 2016 - 5:57 pm | स्पा

अफाटच

राजकुमार१२३४५६'s picture

7 Jun 2016 - 7:58 pm | राजकुमार१२३४५६

एका दिवसात भटकून येण्यासारखी पुण्याजवळ भरपूर ठिकाणे आहेत. त्यातले हे एक ठिकाण ताम्हिणी घाट. कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही.
फोटो छान आलेत.

महामाया's picture

8 Jun 2016 - 6:45 pm | महामाया

फोटो देखील अप्रतिम...

प्रचेतस's picture

8 Jun 2016 - 6:48 pm | प्रचेतस

अहो हे काय वाचता? खूप जुनं आहे हो.