माझेच होते.....
हाय ! तुजला जिंकले त्याने जरी ,
ओठी तुझ्या पण नाव ते .....माझेच होते !
माळू दे त्याला तुझ्या केसांत गजरा ,
गंधदायी मोगरे.....माझेच होते !
स्पर्शता त्याने तुला जे लाभले ,
सगळे जुने शहारे.....माझेच होते !
एकही खुलली जरी ना स्मीतरेषा ,
दाबलेले हुंदके.....ताजेच होते !
अंतरी तुझिया जरी झंकारलो
झाकलेले प्रेतही.....माझेच होते !
प्रतिक्रिया
4 Feb 2010 - 4:53 pm | चिऊ
अंतरी तुझिया जरी झंकारलो
झाकलेले प्रेतही.....माझेच होते !
खुपच दर्द भरी कविता होती....माझे एक निरि़क्षण आहे (कदाचित चुकिचे पण असेल)...प्रेमभ॑गाच्या कविता मुल्ला॑च्या जास्त आहेत...
5 Feb 2010 - 1:45 am | शुचि
कोणत्या "मुलीला" मागणी घलताना पाहीलय? मागणी घालणे, प्रेमभंग होणे याचा मत्ता अजूनही पुरुषांकडेच आहे. स्त्रिया वाटच बघत बसतात मग होणार कुठून प्रेमभंग? त्यात बुळचत कल्पनांची भर्मार "स्त्री च्या नकारात होकार असतो" वगैरे वगैरे म्हणजे जिल "हो" म्हणायच असेल तीनेही नकार द्यायचा आधी खोट लाजत. मग मागणी घातली तर तर विचारायलाच नको ..... पुरुषीच ठरणार .... Frustrating!!!
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
5 Feb 2010 - 10:23 am | उदय सप्रे
तुमच्या मतांचा मी आदर करतो , पण आपण आयुष्यात लता स्रेष्ठ की आशा यात गाण्याचा आनंद घालवून बसतो ! अहो , ज्याला किंवा जिला "प्रेम" म्हणजे काय हे कळले तो किंवा ती समोरच्या व्यक्तीवर असे प्रेमभंगाचे प्रसंग येवू देईल काय? हा महत्वाचा मुद्दा आहे !
माझ्याच काय किंवा कुठल्याही कवी/कवयित्रीच्या बाबत काय , लिहिलेले सगळेच "आपबीती" अस्ते असे नाही काही , "मन उधाण वार्याचे" हेच खरं आणि आमच्या बाबत ते जरा अतीच "उधाण" , तेंव्हा कवितेचा आनंद घ्या असे मला वाटते.....चूकभूल द्यावी घ्यावी , मी कुणी मोठ्ठा लेखक / कवी वगैरे नाहिये पण खरंच जे वाटलं मत मांडलं , राग नसावा !
उदय सप्रेम

5 Feb 2010 - 10:34 am | शुचि
>>कुठल्याही कवी/कवयित्रीच्या बाबत काय , लिहिलेले सगळेच "आपबीती" अस्ते असे नाही काह>>>>
हा मुद्दा चांगला वाटला. धन्यवाद.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
5 Feb 2010 - 10:23 am | उदय सप्रे
तुमच्या मतांचा मी आदर करतो , पण आपण आयुष्यात लता स्रेष्ठ की आशा यात गाण्याचा आनंद घालवून बसतो ! अहो , ज्याला किंवा जिला "प्रेम" म्हणजे काय हे कळले तो किंवा ती समोरच्या व्यक्तीवर असे प्रेमभंगाचे प्रसंग येवू देईल काय? हा महत्वाचा मुद्दा आहे !
माझ्याच काय किंवा कुठल्याही कवी/कवयित्रीच्या बाबत काय , लिहिलेले सगळेच "आपबीती" अस्ते असे नाही काही , "मन उधाण वार्याचे" हेच खरं आणि आमच्या बाबत ते जरा अतीच "उधाण" , तेंव्हा कवितेचा आनंद घ्या असे मला वाटते.....चूकभूल द्यावी घ्यावी , मी कुणी मोठ्ठा लेखक / कवी वगैरे नाहिये पण खरंच जे वाटलं मत मांडलं , राग नसावा !
उदय सप्रेम
5 Feb 2010 - 10:35 am | चिऊ
उदय... मी तुमच्याशी सहमत आहे....प्रेम हे कायम असते...प्रेमभंग होतो असे कधिच म्हणू नये..असो.. तुमच्याकडून अजुन खुप वाचायला आवडेल.....शुभेच्छा....
5 Feb 2010 - 10:59 am | शुचि
>>प्रेम हे कायम असते...प्रेमभंग होतो असे कधिच म्हणू न>>
स्वक्षरी करू का या वाक्याची .... नको जऊ दे फार बदलतेय स्वक्षर्या :)
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
5 Feb 2010 - 10:43 am | वेताळ
कवितेते तुम्ही अगदी जीव ओतला आहे.प्रेम हे केल्या शिवाय कळत नाही.
प्रेम हे कायम असते...प्रेमभंग होतो असे कधिच म्हणू नये.
सही बोललात राव. प्रेम एकदाच करायचे असते व आयुष्यभर करत राहयचे असते. मस्तच कविता.
वेताळ
5 Feb 2010 - 10:51 am | विजुभाऊ
ABBA या गॄप चे विनर टेक्स इट ऑल हे गाणे ऐका.
तुमच्याच भावनां पण फारवेगळ्याप्रकारे सांगीतल्या आहेत त्यात.
प्रेमभंगातून आलेले फ्रस्ट्रेशन किती सुंदर पद्धतीने व्यक्त करता येते याचा ते गाणे हा एक वस्तु पाठ आहे.
वाईट वाटून घेऊ नका पण स्पष्ट साम्गतो उदयजी तुमच्या कवीतांत नकारात्मक भावना फार असतात.