रुतावे कुठे

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
1 Feb 2010 - 10:16 am

न काट्‌यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे

विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

जयश्री अंबासकर

गझल

प्रतिक्रिया

चेतन's picture

1 Feb 2010 - 10:22 am | चेतन

मस्त गझल जमलेयं

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे
हे खासचं

न काट्‌यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे

हे जरा वेगळ वाटलं :?

चेतन

श्रावण मोडक's picture

1 Feb 2010 - 12:48 pm | श्रावण मोडक

आवडली रचना!

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2010 - 1:00 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर....

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

आयुष्यात असे 'शोल्डर टू क्राय ऑन' मिळणे ही फार भाग्याची पण तितकीच दुर्लभ गोष्ट आहे.

बिपिन कार्यकर्ते

अजिंक्य's picture

1 Feb 2010 - 1:16 pm | अजिंक्य

छान गझल. आवडली.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
अजिंक्य.

मीनल's picture

1 Feb 2010 - 7:17 pm | मीनल

हाय क्लास अ‍ॅज युजवल.
मीनल.

मनीषा's picture

1 Feb 2010 - 8:06 pm | मनीषा

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

सुरेख !!!

प्राजु's picture

1 Feb 2010 - 11:07 pm | प्राजु

फारच सुंदर!!

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

मस्त!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2010 - 11:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

आणि

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

सुंदर.....!!!

उन हशरतोंसे कह दो कही और जा बसे
इतनी जगे कहा है दिल दागदार में !!

सागरलहरी's picture

2 Feb 2010 - 8:42 am | सागरलहरी

प्रतिक्रियेला कुठ्ल्या २-४ पंक्ती घेताच येईनात अ़ख्खी गजलच फार छान आहे.
तरी हे..
विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे
.. फारच खोल आहे... ज्याला दंश झाला त्याला कळेल...
सागरलहरी.

ऋषिकेश's picture

2 Feb 2010 - 10:00 am | ऋषिकेश

मस्त गझल

ऋषिकेश
------------------

जयवी's picture

2 Feb 2010 - 1:02 pm | जयवी

मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)

राघव's picture

3 Feb 2010 - 7:11 pm | राघव

निव्वळ क्लास!! खूप आवडली गझल.
तुमची शब्द निवड अन आघात यांचा तोल सांभाळण्याची कला खासच आहे. त्यातही आज प्रकर्षानं जाणवली! :)
खूप खूप शुभेच्छा!!

राघव

मिसळभोक्ता's picture

4 Feb 2010 - 3:24 am | मिसळभोक्ता

"रुतावे" हा विडंबनकारांना आव्हान देणारा शब्द वापरल्याबद्दल अभिनंदन !

मी फक्त सुरुवात करून देतो, बाकी इतरांची मर्जी.

न शाळेत जाता, पळावे कुठे
*तावे कुठे, अन *गावे कुठे

(संदर्भः शाळांमधील स्वच्छतागृहांची दुर्दशा - एक बातमी)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)