भारतात आजपर्यंत दरवर्षी ५००० आयायटी उच्चशिक्षित तयार होतात. गेल्या वर्षीपर्यंत ह्यांची संख्या किती असेल हे मला निश्चित माहित नाही पण ते २ ते २.५ लाख असावेत असा माझा अंदाज आहे.
हे देशातील अत्यंत उच्च प्रतिचे शिक्षण घेतलेले नागरीक आज कुठे आहेत? तुम्ही-आम्ही सामान्य नागरीक पुण्यात कशी मेट्रो पाहिजे आणि रस्ते कसे पाहिजे, शिक्षण कसे पाहिजे आणी पत्रकारीता कशी पाहिजे ह्याच्या चर्चेत गुंग आहोत. पर्यात सुचवतो आहोत; काहीतरी बदल हवेत म्हणतोय आपापल्या कुवतीप्रमाणे विचार व्यक्त करतोय.
ह्या आयायटी वाल्यांचे किती ब्लॉग आहेत? ते त्यावर काय लिहिताहेत? त्यांच्या त्या असामान्य ज्ञानाचा आमच्यासारख्यांना काय फायदा होतोय? हे लोक देशाच्या उभारणीत काय वाटा उचलताहेत? असे प्रश्न मी मला आज पडलेत ते उद्वेगाने- कदाचित त्यांच्या योगदानाची मला माहिती नसल्यामुळे मी हे विचारतेय; माझे चुकतही असेल पण मला माहिती करुन घ्यायची इच्छा आहे.
प्रतिक्रिया
30 Jan 2010 - 9:14 pm | बिपिन कार्यकर्ते
असंही असेल की कोणताही गाजावाजा न करता ते भरीव योगदान देत असतील... कुणी सांगावं?
माझ्या माहितीतले बरेच आयायटीवाले असं काही ना काही तरी करत आहेत. बाकी चालू द्या. :)
बिपिन कार्यकर्ते
30 Jan 2010 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण मिपावर, कोणत्या ब्लॉगवर चर्चा करतो, लेख लिहीतो म्हणजे मेट्रोच्या जडणघडणीत योगदान देतो या पहिल्या 'समजा'लाच आक्षेप. बाकी चालू द्या!
अदिती
30 Jan 2010 - 10:51 pm | शुचि
पूर्ण सहमत!!! माझ्याही मनात हेच्च!!!
दुसरी एक गोष्ट ..... फक्त आय आय टी वाले च मनात उ द्वेग कसा निर्माण करतात बुवा? त्यानी काय घोडं मारलं?
सरकार जर फार खर्च करत असेल आणि त्या बदल्यात मोबदला मिळत नसेल तर तसा करार लिवून घ्या पोरान कडनं की "योगदान करीनच"....... ज्याला पंख मिळणार तो भरारी घेणारच की. अर्थात फक्त परदेशातील भौतीक सुख म्हणजे भरारी असं म्हणण्याचा उद्देश नव्हे.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
30 Jan 2010 - 10:53 pm | अमृतांजन
तुमचा आक्षेप काय आहे आणि कशाला आहे हेच कळले नाही. जरा वरील काथ्याकुटातील नेमक्या वाक्याचा संदर्भ घेऊन ते सांगाल का?
31 Jan 2010 - 3:24 am | अमृतांजन
>>लेख लिहीतो म्हणजे मेट्रोच्या जडणघडणीत योगदान देतो>>>
लेखन, निर्भयतेने विचार करणे हे तुमच्या दृष्टीने योगदान नसते का? तुमची ह्यावरील उत्तरांची वाट पहात आहे.
31 Jan 2010 - 5:42 am | शुचि
ते विचार कोण किती गम्भीरतेनी घेतं त्यावर योगदानाचं मूल्यमापन ठरतं. टाईमपास चर्चा होत असेल तर योगदान नाही. ही चर्चा राजकर्त्यांपर्यंत पोचत असेल तर योगदान आहे.
(ती पोचते का नाही आणि नसेल पोचत तर कशी पोहोचवायची याचा उहापोह माझ्या कुवतीबाहेरचा आहे.) मी नवी आहे. मराठी वर passionately प्रेम करते हा ब्लॉग आवडला म्हणून इथे आहे, योगदान वगैरे करायला नाही.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
31 Jan 2010 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शुचिताईंशी सहमत. (शिवाय) ही चर्चा नुस्तीच त्यांच्यापर्यंत पोहोचूनही काहीही कृती होणार नसेल तर शब्द वापुडे ...
"गर्जेल तो वर्षेल काय" ही म्हण आठवली.
अदिती
10 Feb 2010 - 9:26 pm | प्राजु
१००% सहमत आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
31 Jan 2010 - 5:45 am | संदीप चित्रे
डिट्टो !
30 Jan 2010 - 9:24 pm | शुचि
असामान्य वगैरे फार काही नाही आहेत.
माझे काहीसे वर्गमित्र अमेरीकेत आहेत. संसारात गुंतलेले/ भरडून निघालेले. सामान्य नोकरी करणारे. एक जण झेवियर्स मधे प्राध्यापक आहे.
बरेच जण परदेशात आलेले आहेत. भारतासाठी योगदान काय ते विचारू नका.
माझा आय आय टी तला अनुभव असा - बी टेक ची मुलं मुली एकंदर हवेत असायची आणि परदेशात जाण्यास उत्सुक.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
30 Jan 2010 - 11:52 pm | चिरोटा
आयआयटीचे साधारण ३०% लोक परदेशात जातात.परदेशात जाण्याचे हे प्रमाण ८०च्या दशकात वाढले.आतापर्यंत रेल्वे संशोधन्,इस्रो,स्टील कंपन्या अशा संस्थांमध्येही आय आय टीचे लोक असायचे.काही वर्षे परदेशात राहून परतण्याची संख्याही बरीच आहे.ग्रामिण भागात सौर उर्जेचा प्रसार करणारे हरिश हांदे(http://en.wikipedia.org/wiki/Harish_Hande) असोत नाहीतर आर.बी.आय.चे गवर्नर सुब्बाराव,योगदानाचे प्रमाण इतरांपेक्षा कमी तरी दिसत नाही.!!
वर म्हंटल्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करणार्या लोकांची संख्याही बरीच आहे.
भेंडी
P = NP
31 Jan 2010 - 9:40 am | मितालि
विकीपिडिया वरील माहीती नुसार आय आय टी यन्स बरेच काही करताना दिसत आहेत..
Many IIT alumni have become entrepreneurs, including N.R. Narayana Murthy (co-founder and chairman of Infosys), Rajendra S. Pawar (Co-founder and Chairman of NIIT), Vinod Khosla (co-founder, Sun Microsystems), Anurag Dikshit (co-founder of PartyGaming) and Suhas S. Patil (founder and Chairman Emeritus Cirrus Logic Inc.). Other alumni have achieved leading positions in corporations, such as Rajat Gupta (former Managing Director, McKinsey), Arun Sarin (former CEO, Vodafone), Vijay K. Thadani (Co-founder and CEO of NIIT), Victor Menezes (Senior Vice Chairman, Citigroup), and Kanwal Rekhi (CTO, Novell) . IIT alumni have also pursued careers in politics; for example, Manohar Parrikar became the Chief Minister of Goa. Many alumni have gained national and international recognition: Sushantha Kumar Bhattacharyya was awarded the CBE, a knighthood, and Padma Bhushan; and V. C. Kulandaiswamy was awarded Padma Shri and Padma Bhushan. Narendra Karmarkar is also world-renowned for his work in applied mathematics. Many IITians have contributed a great deal to innovations in science and technology, such as Mani Lal Bhaumik who co-invented the LASIK eye surgery process. They have authored many books and hold many patents.
--
मितालि
(सध्या $ जमवणे.. अधुन मधुन पदार्थ बनवणे व पाककृती मि पा वर टाकणे.. या पलीकडे काहीच न करणारी .. सामान्य पण प्राउड टु बी आय आय टी यन्...)
31 Jan 2010 - 4:40 pm | chipatakhdumdum
अमृतांजन ला काय म्हणायचय ते पहील बघा. या आयायटी वाल्यांवर देशाचा खर्च किती होतो आणि त्या बदल्यात ते काय योगदान देतात ? काय गैर आहे या प्रश्नात ? मितालीने जी आणि जेव्हढी नाव दिली आहेत, त्याच्या दहा नव्हे शंभर पट आयायटी वाले आपापल योगदान देत आहेत अस गृहीत धरु. मग सांगा, गेल्या पंचवीस वर्षातल्या आयायटी वाल्यांच्या संख्येशी त्याच काय गुणोत्तर आहे? इतर क्षेत्रातल्या लोकांकडे बोट दाखवून ते तरी काय करताहेत अस विचारण म्हणजे विषयांतर करण. आयायटी वाले हे देशाच्या बुध्दीच क्रीम समजले जातात. मग काही जण वगळता बाकीच्यानी जगावर धार मारण ही काय दुर्लक्ष करण्याची बाब आहे काय ?
31 Jan 2010 - 6:38 pm | अमृतांजन
धन्यवाद!
31 Jan 2010 - 5:25 pm | शुचि
>>या आयायटी वाल्यांवर देशाचा खर्च किती होतो आणि त्या बदल्यात ते काय योगदान देतात ?>>
खर्च करायला कोणी सांगीतलं होतं? खर्चाची परतफेड करवून घेता येत नसेल तर ती चूक कोणाची?
तुम्ही इथे मेट्रोबद्दल काथ्याकूट करून अणि नीर्भिड विचार मांडून योगदान करता त्याच चालीवर बोलते बरेचसे आयआयटीअनस चांगलं काम करून परदेशात भारताची प्रतिमा उजळ तायत.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
31 Jan 2010 - 6:41 pm | अमृतांजन
"बरेचसे आयआयटीअनस चांगलं काम करून परदेशात भारताची प्रतिमा उजळ तायत."
ते जे काही करताहेत ते त्यांच्या साठी करताहेत की, लोकांना जे हवे आहे ते देताहेत? भारत सरकार्ने तर त्यांना त्या कामगिरीवर पाठवलेले नाही?
31 Jan 2010 - 7:46 pm | शुचि
निर्भीड मतं - मांडायला आणि लेख लिहायला जनतेनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे अस तुम्हाला म्हणायचय का? हे लेखही तुम्ही फार समाज सुधारणेच्या पुळक्यानी लिहीताय ? आसेल बॉ.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
31 Jan 2010 - 8:02 pm | अमृतांजन
मला हे म्हणायचंय- ते जे काही करताहेत ते त्यांच्या साठी करताहेत की, लोकांना जे हवे आहे ते देताहेत? भारत सरकार्ने तर त्यांना त्या कामगिरीवर पाठवलेले नाही?
तुम्हाला ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही घेतला आहे तसा असेल तर त्याला मी काहीच करु शकत नाही. :-)
31 Jan 2010 - 5:26 pm | चिरोटा
योगदानाची व्याख्या काय आहे ते स्पष्ट झाले पाहिजे.
१)निवडणूका जिंकणे,घसा फोडून भाषणे देणे.
२)साधे कपडे घालून समाजकार्य करणे किंवा तसे केल्याचा आव आणणे.
३)निदर्शनाला बसणे,आमरण उपोषण करणे.
४)समाजकार्याच्या निमित्ताने तोडफोड करणे.
माझ्यामते प्रामाणिकपणे नोकरी/धंदा करणे हे ही योगदानच आहे.भले त्याला इतरांच्या द्रूष्टिने फार किंमत नसेल.
पण त्यांनी काय करावे असे अपेक्षित आहे? नोकर्या/धंदे सोडून सर्वांनी समाजकार्याला वाहून घेणे?
भेंडी
P = NP
31 Jan 2010 - 8:06 pm | प्रसन्न केसकर
करतील हो. अन करतात पण. माझी आठवण बरोबर असेल तर दिल्लीत डेडीकेटेड बस लेन चे डिझाईन आय आय टी ने केले. पुण्यात पण बीआरटीचा प्लॅन आयआयटीने तयार केला. पण प्लॅनचे इंप्लीमेंटेशन त्यांच्या हातात नसते. अन बरेच घोळ इंप्लीमेंटेशन मधेच होतात. तिथे राजकारणी, नोकरशहा सगळे अनेकदा हात धुऊन घेतात, प्रोजेक्टचे स्वरुप सुद्धा बदलले जाऊ शकते. जनतेला सुरुवातीला कश्यातच रस नसतो. मग प्रोजेक्ट फेल गेला की लोक ओरडा करतात अन तेव्हा डिझाईन चुकीचे म्हणुन प्लॅनर वर खापर फोडले जाते.
1 Feb 2010 - 2:26 am | Nile
पुणेरींशी सहमत.
बेस्ट ची 'सीस्टीम' ही आय आय टी पवई ने डिसाइन केली होती.
असो, अमृतांजन यांच्या नेहमीप्रमाणे 'फक्त त्यांची हौस भागवणार्या' काथ्याकुटावर इतर अनेक प्रामाणिक लोकांचा वेळ जातो हे पाहुन दु:ख होते. हे बोलणे लागले असेल तर अमृतांजन पुढील वेळी पाश्वर्भुमीचा अभ्यास करुन थोडा संतुलित काथ्याकुट काढतील अशी अपेक्षा धरतो.
1 Feb 2010 - 7:46 pm | अमृतांजन
निळे, तुमचा फुकटचा सल्ला वाचला. आता फुकटचा सल्ला देण्याची माझी वेळ- माझा धागा, काथ्याकूट नाहे आवडला तर प्रतिसाद देण्याचेही कष्ट करु नये.
"अमृतांजन यांच्या नेहमीप्रमाणे 'फक्त त्यांची हौस भागवणार्या' काथ्याकुटावर इतर अनेक प्रामाणिक लोकांचा वेळ जातो हे पाहुन दु:ख होते."
तुमचाही गेला असे वाटत असल्यास, अमृतांजन असे लेखकाचे नाव असलेले धागे उसवूच नका. आणि हो, तुमचा सारखा माणूस प्रामाणिक आहे हे वाचून आनंद झाला.
31 Jan 2010 - 8:30 pm | स्वाती२
ब्लॉग वर लिहिले म्हणजेच योगदान केले का? बहूतेक आयआयटीयन्स दिवसाचे कमितकमी १५-१६ तास काम करतात. ऑफिसच्या वेळात ब्लॉग वगैरे वर वेळ न घालवून ते योगदान करतायत असा विचार का नाही करत?
अवांतर : सुवर्ण चतु:ष्कोण आणि एस. के. दुबे विसरलात?
31 Jan 2010 - 10:35 pm | विंजिनेर
माझ्या मित्रा,
तुला तुझी शंका भले रास्त/प्रामाणिक (वाटत!) असेल. पण ती मिसळपाववर विचारण्याचं प्रयोजन काय? म्हणजे असं बघ - तु हा प्रश्न विचारल्याने मिपाकर किंवा आयआयटीयन्स कशाचं योगदान करायला उद्युक्त होणार आहेत?
मिपाकरांच सोड. तु स्वतःपुरतं तरी सांगशिल? असं समजु घटकाभर की तुला (कुठुन का होईना) ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की "अमुक-अमुक इतके आयआयटीन तमुक तमुक योगदान (म्हणजे काय ते आहेच म्हणा!) करून देशाचा ढमुक-ढमुक फायदा करून देत आहेत." - बरं मग त्याचं पुढे काय? असा प्रश्न येणारच की नाही?
त्यापेकक्षा असा फुकाचा उद्वेग म्हणजे केवळ "पारावरच्या गप्पा आणि पानाच्या पिंका" होय. अर्थात तेव्हढंच या चर्चेतून तुला अपेक्षित असेल तर तसं किंचित स्पष्ट करायला हवं होतस. म्हणजे तुला तिरकस प्रतिसादतरी आले नसते.
असो. बाकी चालु द्या.
31 Jan 2010 - 11:05 pm | प्रिया देशपांडे
आता चालायचे काय राहीलय? चालु द्या म्हणणार्यांनीच धाग्याची वाट लावली. ऑ?
प्रिया
1 Feb 2010 - 7:50 pm | अमृतांजन
प्रिया ताई अगदी मनातले बोललात. हा धागा शुद्ध कंपूबाजीच्या बळी गेला आहे.
7 Feb 2010 - 9:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा, हा धागा बळी गेलेला आहे काय! नै काय आहे, मी आंतरजालावर नवीन असल्यामुळे या गोष्टी कोणी अशा समजावून सांगितल्या तर लगेच समजतात. असो. चालायचंच.
आणि हो, अजूनही तुमचा मूळ मुद्दा मला नीट समजलेला नाहीच आहे.
10 Feb 2010 - 6:17 am | अमृतांजन
>>आणि हो, अजूनही तुमचा मूळ मुद्दा मला नीट समजलेला नाहीच आहे.>>
होतं असं कधी-कधी.
7 Feb 2010 - 10:13 pm | टारझन
अरे वा , काय प्रिया कशी आहेस ?
बरेच दिवस दिसली नाहीस :)
कसे चालू आहे तुझे कॉलेज ? सायकॉलॉजी फार छान शिकवतेस म्हणे तु !
पुण्याला आलो की मस्त कटींग वगैरे पिउयात :)
- टारोबा ट्रॅकर
1 Feb 2010 - 11:19 am | विनायक प्रभू
जण उच्च मध्यमवर्गिय जीवन जगतात.
1 Feb 2010 - 12:07 pm | ऋषिकेश
हा हा हा.. भलताच मनोरंजक चर्चाविषय आहे... चालु द्या! ;)
--(कळबडव्या)ऋषिकेश
1 Feb 2010 - 6:41 pm | मृत्युन्जय
योग्य मुद्दा चुकीच्या पद्ध्तीने मांडला आहे एवढेच.
मला वाटते अमृतांजनला आय आय टी च्या विद्यार्थ्यांच्या "ब्रेन ड्रेन" बद्दल बोलायचे आहे.
आय आय टी चे विद्यार्थी जर सरकारच्या (म्हणजे आपल्याच) पैशाने शिक्षण घेउन परदेशात केवळ पैसा कमावण्यासाठी जाणार असतील तर ते योग्य नाही. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे
1 Feb 2010 - 7:53 pm | अमृतांजन
धागा चूकीच्या पद्धतीने जरी मांडला असेल तरी मिपावरील काही विद्वान त्याची ज्यापद्ध्तीने चिरफाड करतात त्याने असे वाटते की धागा कितीही चांगला लिहिला असता तरी कंपूबाजासमोर काहीही चालले नसते.
1 Feb 2010 - 8:28 pm | शुचि
च्या मारी .... योग्य नाही म्हणजे काय? जिथे नोकरी तिथे जायचं नाही का? भारतात किती स्पर्धा आहे त्या तुलनेत परदेशात लवकर नोकरी मिळाली, पैसा जास्त मिळाला, सुविधा मिळाल्या..
>>त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे>>
"इनडायरेक्ट्ली" भारताच्या अर्थव्यवस्थेवरील, लोकसन्ख्येवरील ताण कमी होतो आहेच. परदेशी चलन भारतात येतं आहेच. हा ज्ञानाचा नाही तर कशाचा साईड ईफेक्ट आहे? आणि एनि वे काही आय आय टी वाले भारतात आहेत सुदधा.
एवढं उपयोग पाहीजे तर काहीतरी उपक्रम राबवू द्या सरकारला...... आणि डिस्क्रिमिनेट करू द्या फक्त आय आय टी वाल्यांकरता. तसा पक्षपात केला तरी बोंबलतील इतर. त्याचं काय?
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
1 Feb 2010 - 9:41 pm | उपास
एवढं जर सरकारला वाटतं तर त्यांनी आयआयटी वाल्यांवर निर्बंध लावावेत जसे मेडीकल वाल्यांना गावात जाऊन २-३ वर्ष प्रॅक्टीस करावी लागते तसं काही. पण मग तसं केलं तर आयआयटी मध्ये क्रीम फीरकेल ह्याची ग्यारंटी नाहीच...
सगळ्यात म्हणजे दुसर्यांनी काय करावं हे सांगावच कशाला, आपली पातळी ओळखून आपण काम करावं नाहीतर पातळी वाढवायचा प्रयत्न करावा ;)
जे आयआयटीयन्सना लागू तेच आयआयएम्स ना.. तरीही माझ्या अत्तापर्यंतच्या आयुष्यात आयआयटीयन्स आणि आयआयेम्स चं एकूण योगदान भारताच्या विकासात वादातीत आहे.. भारतात तर त्यांनी काम केलच आहे पण भारताबाहेर जागतिक स्तरावरही केलेय.. शिवाय एका पातळीवर तुम्ही पोहोचलात की तुमच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग संपूर्ण जगास कसा होईल (एक संशोधक, शास्त्रद्न्य म्हणून) हे पहावच लागतं आणि तेव्हा देशाच्या सीमा गळून पडतात. शिवाय अमिरेकेत संशोधनाच्या संधी जास्त आहेत आणि भारतात त्या कमी आहेत ह्यात आयआयटी आणि आयआयएम वाल्यांचा काय दोष?
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
7 Feb 2010 - 11:43 am | अमृतांजन
"सगळ्यात म्हणजे दुसर्यांनी काय करावं हे सांगावच कशाला, आपली पातळी ओळखून आपण काम करावं नाहीतर पातळी वाढवायचा प्रयत्न करावा"
हे तुम्ही दुसर्यांना सांगता आहात म्हणजे...........
10 Feb 2010 - 12:26 am | उपास
अहो हे स्वगत आहे, लाऊड थिंकींग म्हणतात याला ;)
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
10 Feb 2010 - 7:02 am | अमृतांजन
>>अहो हे स्वगत आहे>>
ती शंका आलीच होती...खात्री केली.
7 Feb 2010 - 11:58 am | शुचि
आय आय टी चा प्रश्न चिघळत राहिल्याने - श्री. टारगटांना विनंती त्यांनी एकदा शिव्यांची सुमने उधळून या प्रश्नाचा निकाल लावावा. =)) =)) =))
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
7 Feb 2010 - 12:57 pm | टारझन
ह्हा ह्हा ह्हा ... अंमळ मौज वाटली एकेकाचे प्रतिसाद वाचून =)) =)) =))
जो तो आपापल्या हुद्द्याची पाठराखण करतो , स्वाभाविक आहे ..
पण म्हणून दुसर्याच्या हुद्द्याच्या नावाने गळे काढायला आणि आमुक आमुक फिल्ड वाला "काय भरिव कामगिरी करतो ? " असे काथ्याकुट काढायला कोणी मोकळा होत नाही , नव्हे त्याने तसे समजु ही नाही ... वर असल्या काथ्याकुटांवर कोणी वाकडे प्रतिसाद दिले तर मारे कंपुबाजीच्या गप्पा हे म्हणजे धावत्या गाढवास पाचारण करण्यासारखेच आहे ..
जो तो आपापल्या आवडीचं फिल्ड स्विकारतो .. आय.टी. म्हणाल तर ही सर्वांत व्हास्ट स्कोप असणारी सिस्टिम आहे :) जे लोकं ह्या फिल्ड मधे काम करतात त्यातले ९९.९९९९% लोकं नोकरीच करत असावेत , आणि अशातुन त्यांनी "नक्की काय केले म्हणजे भरीव कामगिरी होईल?" अशा प्रकारची ब्लुप्रिंट असलेला काथ्याकुट ह्या पेन बाम लोकांनी काढावा.
अशा धाग्यांमुळे पेन वाढतो आहे (अर्थात .. वाढवून घेतला तर )
वर कुठेसं बामराव म्हणत आहेत की माझे धागे उघडू नका .. अरे ? पब्लिक फोरम वर लिहीताय ना ? मग ?
असो .. आज लै बोर झालं होतं .. बोटांना ही खाज आली होती .. आणि "बाकी काही करण्यासारखं"ही नव्हतं म्हणून अंमळ मजेमजेत प्रतिसाद लिहीला =))
बाकी चर्चा चालू द्या ... =))
- दंतमंजन
मी देशासाठी फार भरिव कामगिरी केली आणि मग बाकिंच्या नावाने गळे काढले.
11 Feb 2010 - 1:46 pm | मदनबाण
आयटी वाल्यांच्या नावाने गळा काढणार्यांच्या बैलाला ढोल !!!
(२४X७ शिफ्ट करणारा आयटी हमाल)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 1:57 pm | अमृतांजन
फारजन गळा काढताहेत.
11 Feb 2010 - 2:00 pm | अमृतांजन
फारजन गळा काढताहेत.
11 Feb 2010 - 2:03 pm | अमृतांजन
फारजन गळा काढताहेत.
11 Feb 2010 - 7:36 pm | उपास
आयटी की आयआयटी ठरवा बुवा एकदा, मगच (योग्य त्या सूरात) गळे काढा..
उपास मार आणि उपासमार
11 Feb 2010 - 7:47 pm | मदनबाण
ह्म्म... नजर चूक झाली खरी.
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 9:45 pm | नावातकायआहे
आयला....आमच्या सारख्या I T I वाल्यांना कोणी विचारतच नाही राव.
कुठे जातात ते तर नाहिच नाही...(जाणार कुठे? फार तर MIDC) आमचे 'योगदान' काय हा सवाल आम्हालाही पडत नाही....
दहा तास काम, दोन टायम भत्ता आनी एक टायम दारु.. हेच आमचे जीवन.......
ITI- Helper cum Turner cum Fitter (Second Class Second Time)