प्रित माझी कळेना..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
28 Jan 2010 - 11:08 am

या प्रियकराला,प्रित माझी कळेना..
अधरी अडकति शब्द ..भाषा डोळ्यांची उमजेना

मास श्रावणाचा .,शशी तेवतो नभि
ते चांदणे हि शितल..पण तनुदाह सोसवेना

सुकुन गेले अधर..,कोमेजली काया.
कसा कठोर हा..मम दुःख्ख त्यास कळेना,,

आठवता छबी..विज तनुत कल्लोळे
रात्रभर ना डोळ्यास डोळा..ना पापणी मिटेना

वाटते असे..हे गुपित त्यास वदावे
हि लाज गडे मुलखाचि..पाठ माझी सोडेचना

Avinash

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Jan 2010 - 11:58 am | विजुभाऊ

प्रीत ,डोळ्यांची ,शशी ,नभी ,वीज ,छबी , ही, शीतल हे शब्द नीट लिहावेत.
प्रत्येक वेलांटी दीर्घ आहे.
सुकुन हा शब्द सुकून असा आहे
दु:ख्ख हा शब्द दु:ख असा लिहीला तर वाचता येतो.
कविता अतीसामान्य आहे.