सप्रेम नमस्कार !
मंडळी , सहज मनात विचार आला , आपण जे सारखे तुलना करत असतो एकमेकांशी, प्रत्येकाला नेहेमीच वाटते , माझ्यापेक्षा याची (शेजार्याची)बायको / शेजारणीचा नवरा सुंदर आहे ! देअर ईज ऑल्वेज अ ग्रीनरी ऑन द अदर साईड ऑफ द फेन्स ! आणि मग वाटले हे प्रहर पण करत असतील का हो एकमेकांशी तुलना? ह्या विचारातून काही ओळी सुचल्या.....बघा पटतात का.....
प्रहरांचे दु:ख.....
हे भरले मळवट* भाळी मिरवते कशी ही उषा? * पहाटेचा लालिमा जणू लाल मळवट
तू सवत जणू की माझी , पहाटेस रात म्हणाली !
बघ साज लाल सोनेरी मिरवते कशी ही उषा
सौभाग्यवती मी कफल्लक , उषेस पहाट म्हणाली !
मी रणरणत्या दाहाचे का घालावे मंगळसूत्र?
बघ हाश्शहुश्श होणारी , पहाटेस दुपार म्हणाली !
मी परतुनी आणी सर्वां , सुखरूप आपल्या घरी
मम तुलना का मरणाशी? ** ती संध्याकाळ महणाली ! ** आयुष्याची संध्याकाळ म्हणजे जवळ आलेले मरण.
कां रोज हा दुरावा ? का क्रूर ही प्रणाली?
कलत्या उन्हांत छाया , माझी मला म्हणाली !
प्रतिक्रिया
27 Jan 2010 - 6:46 pm | मीनल
या ओळीतील अर्थ थोडाफार पटण्यासारखा आहे, पण वाक्यरचना, मांडणी परिणामकारक नाही असे मला वाटते.
अर्थ स्पेशली समजावून देण्याचा प्रयत्न नको होता. लेखनातील अर्थ सहज सोपा झाला आहे.
नुसत्या ओळीतूनच तो समजला असत तर चांगले झाले असते.
शिवाय सुरवातीलाही तुलनेबद्दल सांगितले आहे.
अजून बराच विचार केला आहे यावर. इथे लिहू की नको अस वाटतय.
अस वाटतय की किती चूका काढाव्यात? आवडल नाही /पटल नाही तर बस की गूमान!
:S
हे लेखन आवडेल की नाही याच उत्तर आत्ता माझ्याकडे नाही. पण यावर विचार केलेला आहे.
मीनल.
28 Jan 2010 - 9:42 am | उदय सप्रे
मीनल ताई,
तुमचे म्हणणे तुम्ही मांडणे यात काहीच गैर नाही ! तुमच्या सूचनांचे स्वागत आहे !
दुसरे असे की , "लेखक / कवी म्हणेल ते सगळेच वाचकाला पटेल असे नसते काही , हा अभिव्यक्तीचा भाग झाला" हे समजून घेतले की झाले !
बाकी प्रत्येकाचे म्हणणे हे सापेक्षच असते ते दुसर्या कुणाला पटेल असा अट्टाहास माझा नाहिये.तेंव्हा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही अगदी जरूर लिहा आणि सुचवा , शक्य तिथे सुधारणा करता येईल (म्हणजे पुढचच्या वेळी!)