मराठी भाषेच्या संदर्भातील एका कार्यक्रमानिमीत्त घेण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत.
स्थळ- गांधी भवन, कोथरुड, पुणे, ता. ३१ जानेवारी, वेळ- स. १०.०० ते सं ६.००
लघुलिपी येणे हे आवश्यक नसुन बैठकींचा सारांश काढता येण्याची कुशलता जास्त महत्वाची आहे.
आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा ९८९०१ २८९२२) साधावा.
प्रतिक्रिया
26 Jan 2010 - 8:51 am | हैयो हैयैयो
न्यायविषयक दैनंदिन कार्यकाजासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी व्यक्ति हवी आहे. आकर्षक वेतनासह जाण्यायेण्याच्या मासिक पासची व्यवस्था विचाराधीन.
स्थळ : वीरादेसाई रस्ता, अंधेरी; मुंबई.
आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा haiyohaiyaiyo@gmail.com) साधावा.
हैयो हैयैयो!
26 Jan 2010 - 9:20 pm | बंडू बावळट
कारण कळू शकेल काय?
बंड्या.
26 Jan 2010 - 9:45 pm | बंडू बावळट
वरील दोन बाबींची पूर्तता करू शकत असल्यास उत्तर भारतीयाला बंदी का? इतका द्वेष बरा नव्हे असे वाटते. अन्यथा सार्वभौम भारतापासून उत्तर भारत तोडावा/वेगळा काढावा अशी सरळ सरळ इच्छा का नाही प्रकट करत????
बंड्या.
26 Jan 2010 - 9:28 pm | चिरोटा
माझे दोन मित्र आहेत. एक दिल्लीला आहे पण मराठी.(ह्याला उत्तर भारतिय समजायचे का?) दुसरा चेन्नईला आहे पण हिंदी भाषिक्(हा दाक्षिणात्य का?).
दोघेही मुंबईला यायला तयार आहेत.
भेंडी
P = NP
26 Jan 2010 - 10:07 pm | अजय भागवत
ह्या धाग्याची चांगलीच वाट लागली. मला मिपावर मदत मिळेल अशी अपेक्षा होती! असो.