सोनपावले ही तुझी...

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जे न देखे रवी...
13 Jan 2010 - 10:44 am

सोनपावले ही तुझी...

काळे ढग नैराश्याचे
होते जीवनात माझ्या.
हर्ष घेउनिया आली
सोनपावले ही तुझी.

होतो एकटा प्रवासी
वाटेवरी या जगाच्या.
आली वसंत घेउनी
सोनपावले ही तुझी.

अंधारात या निशेच्या
डोळे शोधती प्रकाश.
झाली मंगल प्रभात
सोनपावले ही तुझी.

होतो प्रेमाच्या शोधात
मरुभुमीत वैराण.
झाले मृण्मयी किनारे
सोनपावले ही तुझी.

कविता

प्रतिक्रिया

विदेश's picture

15 Jan 2010 - 7:11 pm | विदेश

आली वसंत घेउनी
सोनपावले ही तुझी.

कवितेचा आशय छानच आहे.
तरी सुचवावे वाटते म्हणून-

आली सोबत होउनी
सोनपावले ही तुझी.

अंकुश चव्हाण's picture

21 Jan 2010 - 2:08 pm | अंकुश चव्हाण

आली वसंत घेउनी
सोनपावले ही तुझी.

परफेक्ट... या ओळी त्या कडव्यासाठी एकदम योग्य आहेत.
धन्यवाद मित्रा...

फ्रॅक्चर बंड्या's picture

22 Jan 2010 - 7:49 pm | फ्रॅक्चर बंड्या


झाले मृण्मयी किनारे
सोनपावले ही तुझी.

मस्तच

binarybandya™