छंद दे..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
12 Jan 2010 - 11:32 pm

गर्दकाळी रात्र सारी, तेवणारा चंद्र दे
जीवघेणी ही निराशा, जीवनाला स्पंद दे..

ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे..

नको कोसळ भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..

बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू?
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..

रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..

मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..

स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..

- प्राजु

कविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

13 Jan 2010 - 12:14 am | श्रावण मोडक

तिसरी आणि पाचवी द्विपदी वगळून परत वाचली. त्या दोन द्विपदी कुठं तरी गुणगुणताना खटकल्या. 'आक्रंद' हा शब्दही नेमका त्या द्विपदीत काय अर्थाने येतो हे कळले नाही. हे अपवाद सोडले तर...
रचना आवडली.

प्राजु's picture

14 Jan 2010 - 9:19 pm | प्राजु

श्रावणजी,
कदाचित व्यक्त करताना मी कमी पडले असेन.

भावाना आता बोथट होत आहेत, ते मला नको आहे. जी काही वेदना, दु:ख आहे ते व्यक्त करण्यासाठी माझ्या उरी आक्रंद दे..

तापलेला भूमीला तृप्त करणारा पावसाचा धो धो कोसळ नको.. पण चार शिंतोडे उडले तरी खुलून येईल असा मृदगंध दे..
असं मागणं आहे. थोडक्यात बस इतना सा ख्वाब है!

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

श्रावण मोडक's picture

14 Jan 2010 - 9:44 pm | श्रावण मोडक

आक्रंद पूर्ण उमगला आता. कोसळ शब्दावर अडलो, अर्थात, तुम्हाला काय म्हणायचे आहे तो भाव मात्र पूर्ण लक्षात आला. आत्ता आक्रंद पुन्हा वाचताना रचना आवडली या प्रतिक्रियेत वाढ झाली.

प्राजु's picture

14 Jan 2010 - 10:10 pm | प्राजु

:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रशांत उदय मनोहर's picture

15 Jan 2010 - 1:13 pm | प्रशांत उदय मनोहर

प्राजक्ता,

कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..

इथे मात्रांची संख्या बरोबर आहे पण यतिभंग झाल्यामुळे लोच्या झालाय.
पहिल्या ओळीत "कोसळ नको" ऐवजी "नको कोसळ" केल्यास ताल सुधारेल.

श्रावण मोडक,

रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..

या कडव्यात ताल बिघडलेला नाही. पहिल्या ओळीत "जोडूनी" या शब्दाकडे नीट लक्ष्य द्या. तो "जोडुनी"सारखा वाचल्यास लोच्या होईल. (जो च्या २, डू च्या २ आणि नी च्या २ मात्रा आहेत त्या तशाच वाचल्या तर तालात बसतंय.)
दुसर्‍या ओळीत "प्रेमऽबंध" मधला "ऽ" महत्त्वाचा आहे. मात्रांचं गणित या अवग्रहामुळेच जमतं.

असो. कविता आवडली.

आपला,
(छंदबद्ध) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्राजु's picture

16 Jan 2010 - 2:50 am | प्राजु

धन्यवाद प्रशांत.
नको कोसळ.. हे एकदम जमते आहे.
सुधारणा करते.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रभो's picture

13 Jan 2010 - 6:24 am | प्रभो

मस्त गं...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

मीनल's picture

13 Jan 2010 - 6:28 am | मीनल

छंद फावल्या वेळात करतात.
ती आवड असते.
तेच जिवन झाल तर त्यापेक्षा उत्तम ते काय?
मीनल.

पाषाणभेद's picture

13 Jan 2010 - 7:38 am | पाषाणभेद

छान आहे काव्य.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

मदनबाण's picture

14 Jan 2010 - 12:10 am | मदनबाण

रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..

सुंदर रचना... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

sneharani's picture

14 Jan 2010 - 11:27 am | sneharani

अतिशय सूंदर रचना...
आवडली...!

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Jan 2010 - 1:36 pm | चन्द्रशेखर गोखले

भावोत्कट रचना आवडली ....अप्रतिम
मला छंदाबिंदात काही जमत नाही हो काय करावं...?

प्राजु's picture

14 Jan 2010 - 8:17 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

सागरलहरी's picture

14 Jan 2010 - 10:11 pm | सागरलहरी

कविता अत्यंत आवडली.. भावना फारच तरल आहेत.. आणि शेवटच्या ओळीतला ट्विस्ट तर छान च आहे...
(अवांतर - छंद फावल्या वेळातला हा एक अर्थ झाला... कधी कधी तो सारे आयुष्य देखील व्यापतो.. उदा. लागलासे छंद.. मुखी गोविंद गोविंद..)

श्रावण जींच्या प्रतिक्रिये वरुन खालील सुचले..
अर्थात कवयित्रि ची प्रथम क्षमा मागतो कारण मी काही सुचवावे हा माझा अधिकार मुळीच नाही.. फक्त जे सुचले ते लिहिले..

कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..

-- झोड हस्ताची नको रे, तापलेल्या या धरेला ..
चार थेंबानी खुले तो, आगळा मृदगंध दे..

बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू?
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..

-- वेदनेच्या कंपनांनी, बधीर ना व्हावे कधी,
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..

रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..

-- रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
दरवळे जो जीवनी तो, प्रेम-रस मकरंद दे..

प्राजु's picture

14 Jan 2010 - 10:16 pm | प्राजु

सुचवणी आवडली.
मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jan 2010 - 11:34 pm | अविनाशकुलकर्णी

स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे.
सुंदर ..नेहमीप्रमाणे

jaypal's picture

16 Jan 2010 - 10:13 am | jaypal

"मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे.."
सुंदर ओळी :-)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमृतांजन's picture

16 Jan 2010 - 10:40 am | अमृतांजन

विडंबन सुधारण्यासाठी मलाही काही वरील प्रमाणे सुचना द्या!

आनंदयात्री's picture

18 Jan 2010 - 2:15 pm | आनंदयात्री

सुरेख कविता !

उदय सप्रे's picture

18 Jan 2010 - 4:59 pm | उदय सप्रे

शेवटचे कडवे :

स्तोम नाही प्रार्थनेचे , आसही कसलीच ना ,
लीन मी आजन्म व्हावे.....आगळा हा छंद दे !

मी तुम्हाला काहे सुचवणे हे म्हणजे काजव्याने सूर्याला जरा प्रकाश वाढव असे म्हणण्यासारखेच आहे नाही?

प्राजु's picture

18 Jan 2010 - 10:06 pm | प्राजु

आपण सुचवलेला बदल ही चांगला आहे. नक्की विचार करेन.
आनंदयात्री भाऊ, आपलेही आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2010 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..

क्या बात है !

-दिलीप बिरुटे