user

ओझी

आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी
खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी?

रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा
उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा
तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी

पाय-यांना ओलांडून थेट शिखराचा ध्यास
वेड्या पतंगासारखा उंच जाण्याचा हव्यास
जाग येते तेव्हा दशा होते पिसाटासारखी

बोल समजुतीचेही खुपतात जसे काटे
गणगोत, आप्त-मित्र कुणी आपले न वाटे
पिता प्रेमाचा भुकेला, माय मायेला पारखी

अपयश सोसवेना, येते पदरी निराशा
कुणी जाणून घेईना मूक आक्रोशाची भाषा
काही क्षणांची वेदना होते आयुष्याची सखी

उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस?
प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास
असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी?

मस्त

मस्त कविता....
गेल्या आठवड्यात केलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभुमीमुळे कविता एकदम मनाला भिडते....

उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस?
प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास
असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी?

हे कडवे खुपच खास

उमलत्या

उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस?
प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास
असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी?

१००% खरंय गं.
खूप आवडली कविता. खूपच आवडली.

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

वास्तव

वास्तव डोळ्यासमोर उभे केले आहे. कवितेने मनाला स्पर्श केला.

(अवांतर - थ्री इडियटस त्यातील सगळा अतिरंजितपणा/वेडेपणा बाजूला ठेवून प्रत्येक आईबापाने बघण्यासारखा आहे).

चांगली कविता

आवडली.

मस्त

मस्त कविता...
binarybandya™

रोज अंतहीन

रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा
उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा
तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी

सॉलिट्ट्ट्ट... Wink

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

आवडली

आवडली कविता!

आवडली

आवडली कविता !!

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

Wink

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

अप्रतिम

अप्रतिम!! नेमकी!!!!

--ऋषिकेश

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

Scroll to Top