ती समीप माझ्या येते, निसटुन जाते
मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते
ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना
जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना
संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते
तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा
तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा
ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते
मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही
ते मनासारखे कधीच उमटत नाही
ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते
ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी,
ती कविता, आराधना, साधना माझी
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
प्रतिक्रिया
5 Jan 2010 - 10:24 pm | चतुरंग
ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी,
ती कविता, आराधना, साधना माझी
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
वा वा!! सुंदर कविता.
(आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचता येईलच! ;) )
चतुरंग
5 Jan 2010 - 11:22 pm | jaypal
दर्जा कविता.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
2 Feb 2010 - 10:38 pm | मेघवेडा
दर्जा! वरचा क्लास!!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
5 Jan 2010 - 11:23 pm | प्रमोद देव
मस्त आहे काव्यकल्पना.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
6 Jan 2010 - 7:44 am | सहज
मस्त आहे काव्यकल्पना.
6 Jan 2010 - 12:46 pm | sneharani
सूंदर...!
:)
6 Jan 2010 - 7:53 pm | टोळभैरव
सूंदर...!
मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
2 Feb 2010 - 10:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर...!
6 Jan 2010 - 1:35 pm | श्रावण मोडक
वा...!
6 Jan 2010 - 1:38 pm | प्रभो
नादलेस..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
6 Jan 2010 - 2:46 pm | ज्ञानेश...
सुरेख कविता, क्रांतीताई.
6 Jan 2010 - 4:39 pm | फ्रॅक्चर बंड्या
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
खरेच छान आहे कविता...
binarybandya™
8 Jan 2010 - 11:52 am | उदय सप्रे
क्रांतिताई,
एकदम नादमय आहे !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
उदय सप्रेम
8 Jan 2010 - 7:53 pm | मदनबाण
मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही
ते मनासारखे कधीच उमटत नाही
ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते
व्वा... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
2 Feb 2010 - 9:48 pm | शुचि
मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही
ते मनासारखे कधीच उमटत नाही
............ अलास!! लॉस्ट इन ट्रान्स्लेशन .... दॅट फीलींग!!!
...... अहाहा काय सुंदर कविता आहे क्रांती.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
2 Feb 2010 - 9:55 pm | प्राजु
ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी,
ती कविता, आराधना, साधना माझी
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
क्लास!!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
2 Feb 2010 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते
क्रांतिताई... क्या बात है... वाहव्वा!!
बिपिन कार्यकर्ते
3 Feb 2010 - 12:45 am | ऋषिकेश
वा!! अप्रतिम!!!
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.