पाठीवर घेउन उगवती,
रान वाट ही पळते सरते,
सुवर्णकण कवडशांमधुनी,
देवाचे ऐश्वर्य उसळते..
काठावरच्या झाडावरुनी,
पक्षी मंजुळ स्वरास गाती..
गवताच्या पात्यावर हलके,
सोन्याचे हे थेम्ब चमकती..
मंद मंद वा-याचे गुंजन,
ऐकून सारे चित्र डोलते ...
सुवर्ण कण कवडशा मधुनी,
देवाचे ऐश्वर्य उसळते..
बैसुनी थोड़े निवांत व्हावे,
मनातले झाकोळ पुसावे
वाटेला या गुज सांगावे,
वाटे फिरुनी इथेच यावे
विश्व हे सारे आनंदाचे,
जगण्या पुन्हा उमेद देते
पाठीवर घेउन उगवती,
रान वाट ही पळते सरते,
सुवर्ण कण कवडशा,
मधुनी देवाचे ऐश्वर्य उसळते..
-- सागर लहरी १४-८-२००९ ,