परी

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
4 Jan 2010 - 10:41 pm

परीच्या गावची अबोल राणी
शांत असे जस नितळ पाणी
नितळ पाण्याच्या गाभ्यात काय?
उजाड़ रानात मन झोके खाय ..

राणीचे गाणे अबोलीचे लेणे..
कुण्या राव्याचे अंतरीचे देणे..
अंतरीचे देणे असे फिटेल काय ?
उजाड़ रानात मन झोके खाय ..

सूर्य सांजावला अन धुके दाटले
मळभ उरी , मनी आर्त साठले ,
राव्याला हे आर्त असे कळेल काय?
उजाड़ रानात मन झोके खाय ..
-- सागर लहरी ०४-०१-२०१०

कविता

प्रतिक्रिया

चित्रा's picture

5 Jan 2010 - 7:02 am | चित्रा

कविता विंदा करंदीकरांची आणि भातुकलीच्या खेळातल्या राणीची का कोण जाणे आठवण देऊन गेली.