अश्वत्थ

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
3 Jan 2010 - 2:47 pm

अश्वत्थ

अश्वत्थाच्या अखंड सळसळी मधे
अजुन एक पान गळून पडले आहे
अश्वत्थ तसाच सळसळतो आहे
अखंड हसतो आहे.

पान गळून जाण्याचा
कधी होतो उत्सव
तर कधी आक्रोश ...

अश्वत्थाला त्याचे काहीच नसते
जशी पाने गळतात ...
तसेच धुमारेही फुटत राहतात ...
.... अश्वत्थाला त्याचेही काही नसते

हां ... तुम्ही मात्र
त्या अटळ अश्वत्थाचे अस्तित्व
कधी विसरता,
कधी टाळता,
तर कधी वापरता..
अश्वत्थाला त्याचेही काही नसते

अश्वत्थ हसतो
सळसळतो
तुमच्या अस्तित्वाला गाडून
त्याचे ख़त नवा बहर देते अश्वत्थाला

तेव्हा मात्र अश्वत्थ हसतो

अश्वत्थाच्या अखंड सळसळी मधे ...
अजुन एक पान गळून पडले आहे ..
अश्वत्थ तसाच सळसळतो आहे
अखंड हसतो आहे.
-- सागर लहरी ०२-१-२०१०

कविता

प्रतिक्रिया

jaypal's picture

4 Jan 2010 - 11:19 am | jaypal

विषेशतः
"अश्वत्थाला त्याचे काहीच नसते
जशी पाने गळतात ...
तसेच धुमारेही फुटत राहतात ...
.... अश्वत्थाला त्याचेही काही नसते"

गौतमाची विपशना साधना आठवली

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/