( वि. सु. चित्रपट परिक्षण लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मंडळी काही चुकल माकल तर माफ करा तस बघायला गेल तर
हे आमच पहिलेच व्हर्जिनल लिखाण आहे सुज्ञ मिपाकरांनी ओळखलच ;) असेल समजुन घ्या मायबाप वाचकहो)
नमस्कार मंडळी काल फर्स्ट डे फर्स्ट शो नटरंग हा सिनेमा पाहिला खरच केवळ अप्रतिम सिनेमा आहे नटरंग
कागल गावचा गुणा ऐका त्याची कहाणी ! हा हाSSSSS
रांगडा ज्याचा बाज आगळहुत पाणी ! हा हाSSSSS
पैलवानी तोरा त्याचा रुबाब राज्यावाणी ! हा हाSSSSS
कौतिक सांगु किती पठ्या बहुगुणी ! हा हाSSSSS
ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंगSSSS
त्याचा येगळाच ढंगSSSS
हाती हुन्नर डोसक्यामंदी झिंगSSSSSSSS
डोसक्यामंदी झिंगSSSSSSSS
ह्या कटाव्याने चित्रपटाची सुरुवात होते आणि टाळ्या शिट्याचा आवाज सिनेमागृहात गुंजायला लागतो पब्लिक पार बेहोश होते
हि कहाणी आहे कागल गावच्या गुणा कागलकर नावाच्या पहिलवान शेतमजुराची कथा ह्या रंजक पध्दतीने मांडली आहे ज्याला
तमाशाच भारी वेड असते. दिवसभराच्या मोलमजुरीतुन काही पैसे बाजुला काढुन तो त्याचे हे वेड जोपासत असतो .
ह्या सिनेमासाठी अतुल कुलकर्णी ह्याने ५० दिवसात १५ किलो वजन वाढविले होते आणी ५२ दिवसात
१६ किलो वजन कमी केले होते.
ऐके दिवशी त्याला कळते कि गावातील एक सधन शेतकरी त्याच्या विहीरिवर ईंजिंन बसविणार आहे त्यामुळे त्याची मजुरी बुडणार असते
मग गुणा आणी त्याचे काही साथीदार ठरवतात कि आपण तमाशाचा फड उभा करु कारण प्रत्येकात काही ना काही कला असते कोणाला
चांगली ढोलकी वाजवता येत असते तर कोणाला पेटी पण ईथुनच सुरु होते त्यांची धडपड तमाशाच्या फडासाठी प्रॉपर्टी गोळा करताना
कशी धडपड होते त्यात तमाशासाठी नाचणारी बाईची शोधाशोध कशी करतात हे दाखविले आहे
मग सुरु होतो प्रवास एका पहिलवानाचा नाच्या बनण्याचा एक प्रवास कारण तमाशात नाच्याशिवाय नाचणार नाही अशी अट नयना कोल्हापुरकरीण
( सोनाली कुलकर्णी ) घालते मग सुरु होते नाच्याची शोधाशोध पन खुप प्रयत्न करुणही त्याना नाच्याचे काम करण्यासाठी कोणीच सापडत नाही आणी आता
आपल तमाशा काढण्याच आणी कलेची सेवा करण्याच स्वप्न वाया जाणार म्हणुन गुणा कागलकर नाच्या व्हायला तयार होते ईथच जाणवते ती अतुल ने वजन कमी
करण्यावर घेतलेली मेहनत नाच्या झाल्यावर घरी बापाचे सासर्याचे ऐकुन घ्यावे लागलेले बोल तरी पण आपल्या निर्णयावर ठाम राहिलेला एक कलेचा उपासक
अस मस्त दंद्व ईथे रंगले आहे
गावोगावी सुपार्या घेउन अवघ्या चार महीन्यात राज्यशासनाकडुन मिळविलेला पुरस्कार आणी तमाशाच्या सुपारीसाठी लोकांना नाच्या बनवुन वेड लावलेला प्रसंग अशा घटना ह्यात खुप सुटसुटीत मांडल्या आहेत त्यानंतर गलिच्छ राजकारणातुन उध्दवस्त होणारा तमाशाचा फड आणी एका नाच्यावर झालेला बलात्कार अशा काही घटना ह्यात चित्रीत केल्या आहेत.
दिग्दर्शक रवी हरिश्चंद्र जाधव ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे मुळ आनंद यादव ह्यांच्या नटरंग ह्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे पण कोठेही ह्यात दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवत नाही त्यामुळे चित्रपट रटाळ होत नाही अजय - अतुल ह्यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे चित्रपटात दोन लावण्या एक गवळण तीन कटवा अशी एकुण आठ गाणी आहेत आणी सगळी गाणी आज उभ्या महाराष्ट्रात गाजत आहे गुरु ठाकुरने सुध्दा कमाल केली आहे गीतकार संवाद लेखन आणी अभिनेता अशा तीन
आघाड्या बहाद्दराने यशस्वीरित्या पेलल्या आहेत सोनाली कुलकर्णी नयना कोल्हापुरकरणीच्या भुमिकेत शोभुन दिसली आहे किशोर कदम ह्यांच काम ही खुप चोख झाल आहे
तर मंडळी आपण सिनेमागृहात जाउन पहावा असा एक उत्क्रूष्ट चित्रपट म्हणजे नटरंग!!!
आगमी आकर्षण
झेंडा
शिक्षणाच्या आयचा घो
हरीषचंद्राची फॅक्टरी
प्रतिक्रिया
2 Jan 2010 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नटरंगची ओळख मस्त करुन दिली आहे. चित्रपट पाहिलाच पाहिजे असे वाटले.
'तमाशा’ कलाप्रकार जवळ-जवळ संपत आला आहे. आहे त्याचे स्वरुपही बदलले आहे. चित्रपटातून 'तमाशाचा फड' उभं करतांना पाहणे मनोरंजक ठरेल.
अवांतर : ज्या चित्रपटांमुळे 'तमाशा'कलाप्रकाराला उतरती कळा लागली. त्याच चित्रपटात तमाशातील कलाकारांच्या विषय येतो. गम्मतच आहे.
घाशीराम कोतवाल सेठ, परिक्षणाबद्दल आभार...!
-दिलीप बिरुटे
2 Jan 2010 - 3:25 pm | सुनील
परीक्षण चांगले केले आहे. चित्रपट पहायला हवा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Jan 2010 - 10:18 pm | रेवती
आता मात्र फारच उत्सुकता वाढलीये......नटरंग पहायलाच हवा!
तुम्ही चांगले लिहिले आहे परिक्षण!
रेवती
3 Jan 2010 - 12:24 am | मी-सौरभ
ते सुद्धा थिएटरमधे जाउन.....
-----
सौरभ :)
3 Jan 2010 - 1:50 am | टुकुल
मस्तच लिहिलय परिक्षण, चित्रपटा बद्दल ऐकुन होतो थोडफार. आता हे वाचल्यावर तर नक्कि बघणार हा चित्रपट.
--टुकुल
3 Jan 2010 - 10:59 am | भडकमकर मास्तर
मला जाउद्या ना घरी
आता वाजले की बारा
ही लावणी फार आवडली..
परवा सारेगमप मध्ये एका स्पर्धक मुलीने गायली..
अजय अतुलचे संगीत भन्नाट आहे..
त्यासाठी हा सिनेमा पाहणार आहे...
3 Jan 2010 - 5:30 pm | बापु देवकर
ऐकुन आहे...बघु कधि येतो सिनेमा दुबईत..
बाकी परिक्षण मस्तच...
4 Jan 2010 - 10:41 am | विशाल कुलकर्णी
'अप्सरा.....' (लावणी... सोनाली नव्हे) वेड लावते अक्षरशः....
कालच पाहीला, मस्तच आहे पिक्चर ! अतुलचा गणा तर सर्वांग सुंदरच !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
4 Jan 2010 - 10:55 am | श्रावण मोडक
सोनाली लावत नाही वेड? ह्या... मग तिचा आख्खा रोल वाया गेला म्हणायचा राव!!! ;)
4 Jan 2010 - 11:42 am | जे.पी.मॉर्गन
गेल्या वीकांताला पुण्यात २-३ चित्रपटगृहांवर चौकशी केली. सर्व ठिकाणी नटरंगचे खेळ हाऊसफुल्ल होते ! थोडा हिरमोड झाला पण खरंतर अशी परिस्थिती (मराठी चित्रपटाची तिकिटं न मिळण्याची) उद्भवली ह्याबद्दल मनापासून आनंद वाटला.
4 Jan 2010 - 3:49 pm | टुकुल
वाचुन लै आनंद झाला, लै भारी.
असेच दिवस येत राहोत, अजुन "झेंडा" पण यायचा बाकी आहे, तु नळी वरचा प्रोमो पण चांगला वाटला.
विठ्ठला गाण तर १ नंबर.
http://www.youtube.com/watch?v=cqZxno8dk1k&feature=related
--टुकुल
5 Jan 2010 - 10:00 am | उमेश__
नटरंग चित्रपटातील गाणी हवी आहेत..कोणी सांगेल का नेट वर कुठे मिळेल???
5 Jan 2010 - 11:22 am | जे.पी.मॉर्गन
तुम्हाला नटरंगची गाणी ह्या दुव्यावर सापडतील. पण शक्यतो सीडी विकत घेऊन ऐकावी असं वाटतं. नटरंग आणि २०-२५ इतर गाण्यांची अधिकृत MP3 रु. ४५/- ला मिळते.
8 Jan 2010 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कलाकाराचे कलेवरील प्रेम. आणि तमाशा कलाकाराची परवड,केवळ सुरेख
अतुल कुलकर्णीचा अभिनय केवळ लाजवाब.......!
सोनाली कुलकर्णी लै भारी. :)
चित्रपटाच्या शेवटी 'गुणा' पुन्हा तमाशा सुरु करायचो ठरवतो, तेव्हा त्याचे मित्र त्याच्या सोबत येत नाही. तो एकटाच पुढे जाऊ लागतो आणि तेव्हाच त्याच्या खांद्यावर एक हात येतो..त्या प्रसंगाला आम्ही जरा हळवे झालो राव...!
मनस्वी कलाकाराचा नटरंग
-दिलीप बिरुटे
9 Jan 2010 - 1:49 pm | प्रशु
२ आठवड्या पुर्वी नटरंग ची ध्वनीचकती (सीडी) विकत घेतली. तेव्हा पासुन झिंगलोय सगळी गाणी ए॑कुन.....
पहिला गण तर केवळ अप्रतिम...
"नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग" हे गुरु चे शब्द जितके सुंदर आहेत तितकेच " "किरपेचं दानं द्यावं जी" वर येणारा संगीताचा तुकडा पण अप्रतिम....
"बाराची गाडी" तर तुफान सुटलीय...... कोरस ने उच्छाद मांडलाय..
प्रवाहा विरुध्द पोहणार्याची व्यथा मांडणारं 'खेळ मांडला' आणि त्याच्या शेवटी येणारा संगीताचा तुकडा मस्तच.....
गवळणीतील विरह ही तितकाच गहिरा आणी अप्सरा बद्द्ल काय बोलावं !!!!!!
मराठी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगाच्या पुन:रागमनाची नांदी केल्या बद्द्ल नटरंग च्या संपुर्ण परिवाराला धन्यवाद.......
11 Jan 2010 - 10:52 am | जे.पी.मॉर्गन
>>मराठी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगाच्या पुन:रागमनाची नांदी केल्या बद्द्ल नटरंग च्या संपुर्ण परिवाराला धन्यवाद<<
माझे पण !
वाजले की बारा मधल्या "हिला भेटा की येत्या बाजारी" च्यावेळचा आवाज, अंतर्याच्या सुरुवातीला अनपेक्षित येणारे संतूरचे सूर, हे अजय-अतुलच्या सुपीक "डोस्क्यातुनच" निघू शकतात. "खेळ मांडला" च्या शेवटचं लेहर्याचं संगीत... त्यातला काठी हवेत फिरवल्यावर येतो तसा तो आवाज, "अप्सरा आली" मधला र्हिदम ... सगळंच अत्युच्च !
चित्रपटात अतुल कुलकर्णी #१ ! पण तांत्रिक सफाई, पटकथा थोडी कमी पडल्यासारखी वाटते ! (आपल्या कुठे कळतंय त्यातलं !). पण ओव्हरऑल चित्रपट एकदम झकास !
10 Jan 2010 - 10:04 am | अविनाशकुलकर्णी
आज पाहिला.................... अतुल कुलकर्णी ला तोड नाहि..मस्त काम केले आहे...
10 Jan 2010 - 10:44 pm | बट्ट्याबोळ
खरंच ल्हयभार्री आहे !!
मी निलायम ला पाहिला ... तिथे किवा लक्ष्मीनारायण ला पाहण्यातच मजा आहे.
इतर ठिकाणी लोक कोणितरी मेल्यासारखी चित्रपट बघतात !!
11 Jan 2010 - 11:44 am | अविनाशकुलकर्णी
तमाशा उधळतात..व कनाति पेटवुन नाच्याला पळवतात..पण बाया माणसाना कसे सोडतात??..हे असे कसे?
11 Jan 2010 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>बाया माणसाना कसे सोडतात??
बायामाणसांना पकडले असे दाखवले नसले तरी, त्यांच्याबद्दलही पेप्रात बातमी छापून येते, असे दाखवले आहे.
नटरंग मधील 'खेळ मांडला’ हे गाणं लैच भारी झालं आहे. संगीत,गीताचे बोल, आणि गायलंही जबरा आहे.
-दिलीप बिरुटे
11 Jan 2010 - 5:37 pm | घाशीराम कोतवाल १.२
तमाशा उधळतात..व कनाति पेटवुन नाच्याला पळवतात..पण बाया माणसाना कसे सोडतात??..हे असे कसे?
कारण तमाशाचा मुळ मालक असतो गुणा कागलकर त्याने मानेच्या
पी ए च्या कानफाटात मारलेली असते त्याचा वचपा काढुन गुणा कागलकरला धडा शिकवण्यासाठी त्याला पळवुन नेउण
त्याच्यावर बलात्कार करतात
11 Jan 2010 - 10:59 pm | ऋषिकेश
छान ओळख.. बघेनच
या विकांताला मुंबईत ३ मल्टीप्लेक्स मधे विचारणा केली हाऊसफुल्ल होता
आता येत्या विकांताला बघु
--ऋषिकेश
13 Jan 2010 - 9:35 pm | अनुप्रिया
चित्रपट अतिशय सुंदर.........
प्रेक्षणीय व श्रवणीय असल्याने एकदम तिकीट वसूल..........हा हा हा !!!
शिट्ट्या टाळ्या
नवरंग टीम ला ३ चीअर्स
13 Jan 2010 - 10:38 pm | संदीप चित्रे
धागा चांगला आहे पण नटरंगची कथा /सीन्स सांगणं टाळायचा प्रयत्न करा ही विनंती.
14 Jan 2010 - 6:51 pm | jaypal
मला तरी आवडला नाही. चांगली कथा पण भरभर गुंडाळल्यासारखी वाटते.
गीत आणि संगीत खुप छान.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/