आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण आता काही करवत नाही
पूर्वीगत अन आता काही झेपत नाही
भेटलो तर हल्ली आम्ही चोरून भेटतो
गळ्यात आम्ही गळे घालुनी हिंडत नाही
बंद घेतली करून आधी खिडक्या दारे
जरासुद्धा मज जोखिम हल्ली घेवत नाही
खरेच मग आम्ही इतके निर्धास्त जाहलो
खरेच हा आवाज कुणाला पोचत नाही
खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी
चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही
हाच फायदा इतक्या साऱ्या तडजोडींचा
तिच्या कधी बापास सुगावा लागत नाही
जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती
उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही
पुढे व्हायचे काय परी सापडल्यावरती
किती बडवले कुणास आता सांगत नाही
कशास "केश्या" करतो असली विडंबने तू
कसे चांगले काही तुजला बघवत नाही
प्रतिक्रिया
2 Jan 2010 - 9:41 am | सहज
वाट पहात होतो.
सही!!
2 Jan 2010 - 11:21 am | टारझन
वाट लावली आहे.
अंगठा!!
2 Jan 2010 - 12:08 pm | दशानन
पाठ शेकली आहे.
करंगळी !!
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
3 Jan 2010 - 1:19 am | Nile
तंगड मोडलं आहे.
नडगी!!
2 Jan 2010 - 11:15 am | वेताळ
मस्तच..... =))
वेताळ
2 Jan 2010 - 2:54 pm | टुकुल
कहर..
नाद खुळा..
अजुन जास्त काही सुचत नाही.
--टुकुल
4 Jan 2010 - 1:52 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार