पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
1 Jan 2010 - 8:14 pm

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही

भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही

काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही

पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही

असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही

खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही

गझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2010 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही

भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही

व्वा ! वरील ओळी एकदम झकास.

-दिलीप बिरुटे
[बोथट]

चतुरंग's picture

2 Jan 2010 - 6:41 am | चतुरंग

नवीन वर्षाच्या स्वागताची अंतर्मुख करणारी गजल आवडली! :)

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

2 Jan 2010 - 12:10 pm | स्वाती दिनेश

असेच म्हणते,
स्वाती

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jan 2010 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

वा! नीरीच्छ भावांच उत्कट नीरुपण
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

2 Jan 2010 - 9:40 am | सहज

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही

असे कसे, तुम्ही लिहीत नाही याचे आम्हा कविताद्वेष्ट्यांना बरे वाटते हो!

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

ओ तुमचे बोथट, आवाज आतबाहेर तुम्हाला लखलाभ! आम्ही अजुन धारधार आहोत बोलायचे काम नाही. समस्या असल्यास मास्तरांना भेटा.

बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही

हॅ हॅ हॅ काहीपण.. येतं कोण तुम्हाला भेटायला?

भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही

हॅ हॅ हॅ पुन्हा तेच...

काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही

बां*** भां** कसल्या तडजोडी करता? अरे आपल्या मर्जीचे मालक होउन जगा. मग बघा हिशोब ठेवायला ब्लॉग निघतात!

पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही

देर आये दुरुस्त आये!

असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही

खुलाशाबद्दल धन्यवाद!

खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही

हे हे हे कल्जी घेणे!

आणि हो, कविता छान पण केसु आमचे महान. हेपी न्यु इयर हो! ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2010 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बां*** भां** कसल्या तडजोडी करता? अरे आपल्या मर्जीचे मालक होउन जगा. मग बघा हिशोब ठेवायला ब्लॉग निघतात!

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

2 Jan 2010 - 10:15 am | वेताळ

कळायला व गुणगुणायला एकदम सोप्पी ,पण खुप काही सांगुन जाणारी. अजुन अश्याच कविता येवुद्यात अनिरुध्द साहेब,वाचायला आवडतील.
असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही

खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही

एकदम झक्कास...अगदीच मनातले.
वेताळ

धनंजय's picture

2 Jan 2010 - 10:04 pm | धनंजय

बर्‍याच दिवसांनी लिहायला घेतलेत खरे, पण छान लिहिलेत.

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Jan 2010 - 12:04 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री अभ्यंकर, चांगला प्रयत्न. कवितेतील 'मी' इतक्या वेळा भेटला आहे की तो कितीही कळवळला तरीही बोथट वाटतो.

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

4 Jan 2010 - 1:54 pm | अनिरुद्ध अभ्यंकर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर