उषा..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
1 Jan 2010 - 9:38 am

हळद माखूनी अंगावरती
लोभसवाणी सोन शलाका
पाण्यावरती उतरूनी अलगद
तरंग उठवी हलका हलका

घेता भरूनी ओंजळ अवघी
साज रूपेरी पाण्यामधला
डोकावूनी तो पहात राही
चांद सावळ्या नभामधला

सांज विसावे आकाशाच्या
कुशीमध्ये लाजून थोडी
रक्तिमगाली खळी पडूनी
अवीट होई रात्र वेडी

टिपूर तारे साक्षीला अन
चंद्रकोरही गोजिरवाणी
रात-दिनाच्या संयोगातून
जन्मा येते उषा देखणी

- प्राजु
(सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!)

कविता

प्रतिक्रिया

हळद माखूनी अंगावरती
लोभसवाणी सोन शलाका
पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका

रक्तिमगाली खळी पडूनी
अवीट होई रात्र वेडी

रात-दिनाच्या संयोगातून
जन्मा येते उषा देखणी

या सा-याच अतिशय भावसुंदर, चित्र-प्रत्यय देणा-या, आणि अतिशय तरल कल्पना आणि शब्द रचना देखील तितकीच कोमल.

कविता फारच आवड्ली... निसर्ग कवितेचा / भाव कवितेचा फारच देखणा संयोग आहे..

sneharani's picture

1 Jan 2010 - 11:11 am | sneharani

अतिशय सूंदर कविता...!
शब्दाशब्दातून भाव प्रकटन...!
आवडली.

चन्द्रशेखर गोखले's picture

3 Jan 2010 - 10:29 pm | चन्द्रशेखर गोखले

नव्या वर्षाची ताजीतवानी टवटवीत कविता.. सुंदर !!!

प्राजु's picture

4 Jan 2010 - 7:48 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

पाषाणभेद's picture

5 Jan 2010 - 2:47 am | पाषाणभेद

मस्त आहे.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

उदय सप्रे's picture

5 Jan 2010 - 11:45 am | उदय सप्रे

एकदम मस्त कविता प्राजुताई !
नवीन वर्षाच्या हर्दीक शुभच्छा !
उदय सप्रे....त्यो "येम्" हाय न्हवं का मांज्या नावातला , त्यो सायलेण्ट हाय बगा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2010 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांज विसावे आकाशाच्या
कुशीमध्ये लाजून थोडी
रक्तिमगाली खळी पडूनी
अवीट होई रात्र वेडी

'सांज विसावे आकाशाच्या कुशीत' हे तर खासच...!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

10 Jan 2010 - 2:40 am | मदनबाण

टिपूर तारे साक्षीला अन
चंद्रकोरही गोजिरवाणी
रात-दिनाच्या संयोगातून
जन्मा येते उषा देखणी

सुंदर... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

देवदत्त's picture

23 Mar 2010 - 8:43 am | देवदत्त

होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्लॉगर्सच्या प्रवाहावर दृष्टीक्षेप टाकत सकाळमध्ये लिहिलेल्या लेखात ह्या कवितेचा संदर्भ वाचून आनंद वाटला :)

अविनाशकुलकर्णी's picture

23 Mar 2010 - 10:31 am | अविनाशकुलकर्णी

हळद माखूनी अंगावरती
लोभसवाणी सोन शलाका
पाण्यावरती उतरूनी अलगद
तरंग उठवी हलका हलका
खुप सुदंर..तरल रचना

नंदू's picture

23 Mar 2010 - 10:58 am | नंदू

अप्रतिम.

विमुक्त's picture

23 Mar 2010 - 12:01 pm | विमुक्त

खूप छान...

प्राजु's picture

23 Mar 2010 - 6:49 pm | प्राजु

धन्यवाद.
देवदत्त जी, मनापासून आभारी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मीनल's picture

24 Mar 2010 - 4:58 am | मीनल

इ सकाळ ने या कवितेचा उल्लेख करावा ही आनंदाची बाब आहे .

मीनल.
http://myurmee.blogspot.com/