साहित्यः १ वाटी खवा, १/२ वाटी बेसन पीठ, तुप, १ चंमचा खसखस, १ चंमचा तीळ, २ चंमचे सुखे खोबरे, ३/४ वाटी साखर, वेलचीपुड
३/४ वाटी कणीक, ३/४ वाटी मैदा, मीठ, १ मोठा चमचा बटर, तेल.
कृती: कणीक , मैदा, मीठ मिसळुन घ्या. बटर गरम करुन या पीठात घाला. पाणी घालुन पीठ मळुन घ्या. पोळयांच्या पीठा पेक्षा किंचित
घट्ट मळा. तेल लाऊन १०-१५ मिनिटे झाकुन ठेवा.
तुपावर खवा गुलाबी रंगावर परतुन घ्या. बेसन पण तुपावर खमंग भजुन घ्या. हे दोन्ही वेगवेगळे भाजायचे आणि थंड करत ठेवायचे.
खसखस , तीळ , सुखे खोबरे वेगवेगळे भाजुन एकत्र पुङ करुन घ्या. आता खवा, साखर, खसखस तीळ खोबरे पुड, बेसन , वेलची पुड
एकत्र करुन निट मिसळुन घ्या. मिश्रणात गुठळ्या राहता नयेत.
कणकेच्या दोन छोट्या पार्या लाटुन त्याच्या मध्ये या मिश्रण घालुन बंद करा. हलक्या हाताने मैद्यावर या पोळ्या लाटा व मध्यम आचेवर
तव्यावर तुप लावुन भाजुन घ्या.
प्रतिक्रिया
1 Jan 2010 - 2:22 am | श्रावण मोडक
कुठून धागा यावेळी उघडला असं झालं!!!
1 Jan 2010 - 4:24 am | शाहरुख
'आयत्या वेळेला गरम गरम सर्व्ह करुन तुपाची धार वरुन सोडावी' राहिले की :-)
1 Jan 2010 - 9:12 am | पाषाणभेद
पुरणाच्या पोळीचा आधूनिक अवतारच जणू. घ्या अन खा.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
16 Jan 2010 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पुरणाच्या पोळीचा आधूनिक अवतारच जणू. घ्या अन खा.
अगदी असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
[गुळोणीत यथेच्छ पुरणपोळी हादडणारा]
16 Jan 2010 - 7:22 am | अमृतांजन
चंद्राचे कांकणाकृती चंद्रग्रहण झाले तर ते असे दिसेल.
16 Jan 2010 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार
पटकन वाढायला घ्या बॉ !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
16 Jan 2010 - 6:26 pm | गणपा
अगदी अगदी आलोच हा पाणि आणि पायावर पाणी टाकुन ;)