खव्याची पोळी
साहित्यः १ वाटी खवा, १/२ वाटी बेसन पीठ, तुप, १ चंमचा खसखस, १ चंमचा तीळ, २ चंमचे सुखे खोबरे, ३/४ वाटी साखर, वेलचीपुड
३/४ वाटी कणीक, ३/४ वाटी मैदा, मीठ, १ मोठा चमचा बटर, तेल.
कृती: कणीक , मैदा, मीठ मिसळुन घ्या. बटर गरम करुन या पीठात घाला. पाणी घालुन पीठ मळुन घ्या. पोळयांच्या पीठा पेक्षा किंचित
घट्ट मळा. तेल लाऊन १०-१५ मिनिटे झाकुन ठेवा.
तुपावर खवा गुलाबी रंगावर परतुन घ्या. बेसन पण तुपावर खमंग भजुन घ्या. हे दोन्ही वेगवेगळे भाजायचे आणि थंड करत ठेवायचे.
खसखस , तीळ , सुखे खोबरे वेगवेगळे भाजुन एकत्र पुङ करुन घ्या. आता खवा, साखर, खसखस तीळ खोबरे पुड, बेसन , वेलची पुड
एकत्र करुन निट मिसळुन घ्या. मिश्रणात गुठळ्या राहता नयेत.
कणकेच्या दोन छोट्या पार्या लाटुन त्याच्या मध्ये या मिश्रण घालुन बंद करा. हलक्या हाताने मैद्यावर या पोळ्या लाटा व मध्यम आचेवर
तव्यावर तुप लावुन भाजुन घ्या.

वाचन
5432
प्रतिक्रिया
7