पाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे? तर तो म्हणाला ५-६ किमी आहे काही गुंफा आहेत बाकी नाही कशाला जाता तिकडे कोणी जात पण नाही, ह्या सीझन मध्ये तर कोणी गेलेले मी पाहिलेच नाही तिकडे बघा तुमची इच्छा असेल तर जा. सुरवातीलाच असा निराशवादी सल्ला मिळेल असे वाटले नव्हते, मी परत महाबळेश्वर रोड कडे जाण्यासाठी वळलो पण मनात काही आले म्हणून जशी वळवली होती बाइक तशीच पुन्हा वळवून सरळ राजापूर रस्त्यावर चालू लागलो.
उतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक खडीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श! पोहचलो एकदाचे.
गावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.
आता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर? असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).
वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.
गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.
************
************
प्रतिक्रिया
28 Dec 2009 - 1:18 pm | अवलिया
श्री रा रा राजेजीसाहेब
आपला लेख वाचला. वेगवेगळ्या स्थानांना भेट देवुन तेथील भावलेल्या गोष्टींचे आपण वर्णन करता आणि अतिशय आस्थेने आपण केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे मनापासुन सांगता हे पाहुन आपले फार कौतुक वाटते. आपल्यासारख्या माणसांची आज जगाला गरज आहे. समाजाला गरज आहे. मिपाला गरज आहे. आपले समाजावरचे ऋण कधीही न फिटणारे आहेत.
आपण दिलेला बारिक रेतीवरुन गाडी हळु चालवा हा सल्ला केवळ राजापुरच नव्हे तर विजापुर, गाणगापुर, श्रीरामपुर, नवापुर अशा अनेक पुरांमधे (सिंगापुर सोडुन तिथे रस्ते चकचकित असतात असे ऐकले आहे) तसेच बादामधे (जसे औरंगाबाद, अहमदाबाद, अलाहाबाद) तसेच किरकोळ शहरे जसे मुंबई, पुणे, दिल्ली वगैरे (न्युयार्क, वाशिंग्टन, जकार्ता नाही) इथे उपयोगी पडेल. आपला लेख सर्वकालीक मार्गदर्शक असुन वाचनखुण म्हणुन मी साठवला आहे.
चर्चेत जसजशी भर पडेल तसतसा विदा खुप उपयोगी पडेल म्हणुन मी विकीपिडीयावर पण टाकण्याच्या विचारात आहे, परंतु ते कसे करायचे हे माहित नसल्याने आमच्या एका मित्राला विनंती करणार आहे, जो (केवळ हेच काम करण्यात) तज्ञ आहे असे त्याचे मत आहे.
आपल्याला पर्यटनासाठी शुभेच्छा !
धन्यवाद.
--अवलिया
28 Dec 2009 - 1:18 pm | प्रसन्न केसकर
बर्याच वर्षापुर्वी एकदा गेलो होतो राजापुरला. तेव्हा पायर्या वगैरे नव्हत्या.
पुन्हा गेलात तर वासोटा वगैरे करुन या. मायणी पण या सीझनमधे बरे वाटते.
28 Dec 2009 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते
राज्या लेका आता मात्र तुझा लै हेवा वाटायला लागलाय बघ. मस्त भटकतो आहेस यार !!!
बिपिन कार्यकर्ते
28 Dec 2009 - 2:27 pm | दशानन
तुमच्या सारख्या देव'तुल्य लोकांचा आशिर्वाद.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 1:19 pm | प्रभो
श्री. राजे-जी,
निषेध निषेध निषेध!!
आपणांस पुण्यास येऊन ही जी दर आठवडा बाजारी भटकायची सवय लागलेली आहे ती काही बरी नाही...ह्या सवयीपायी (क्षमा असावी गाडीपायी) आपण या देशाचे किती पेट्रोल वाया घालवत आहात ह्याची आपणास काही काळजी आहे का नाही....निषेध निषेध निषेध!!
असो..आता धागा उघडलाच आहे तर तू आपला मित्र म्हणून प्रतिसाद दिला...
फोटो के व ळ अ प्र ति म!!!!
पहिला, दुसर्या ओळीतला चौथा आणी मधल्या ओळीच्या ओळीखालच्या ओळीतला दुसर्या फोटोच्या बाजुचा तिसरा फोटो मस्त...
टीपः हे फोटो लिंक मधले आहेत.. :)
--चाकssssफिरवा
28 Dec 2009 - 1:36 pm | निखिल देशपांडे
ऑफिसातुन फोटो दिसए नाहिएत...
घरि जाउन पाहतो...
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे
तुमचा फिरण्याचा अवाका जबरदस्त आहे
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
28 Dec 2009 - 1:47 pm | दशानन
ह्म्म्म.
ऑफिस मधून चोरुन फोटो कसे पहावेत हे आम्हाला तुम्हाला सुचवावे लागेल हे पाहून नवल वाटले.
असो,
फोटो दिसल्यावर पुर्ण प्रतिसाद शुध्द भाषेत लिहा, वर चार ओळीमध्ये चार चुका आहेत.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 1:50 pm | अवलिया
शुध्द भाषेत
शुध्द नाही शुद्ध हा योग्य शब्द आहे. असो.
--अवलिया
28 Dec 2009 - 1:51 pm | अमोल केळकर
पाचगणी जवळ पण राजापूर आहे हे माहित नव्हते. आतापर्यंत राजापुरची गंगा हाच वाक्यप्रयोग माहित होता.
बाकी राजापुची गुंफा मस्तच आहे.
( अवांतर : वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतलेत का ? )
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
28 Dec 2009 - 1:53 pm | दशानन
>>( अवांतर : वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतलेत का ? )
तेथे जाणे जमले नाही रात्र झाली होती महाबळेश्वर वरुन खाली येण्यासाठी. पुढील वेळी नक्की.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 1:59 pm | खादाड
छान फोटो !=D>
तुमच्या उत्साहाला सलाम ! =D>
28 Dec 2009 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजे, आपल्या भटकंतीमधील राजापूरची छायाचित्रे मस्त. गुहेतील वेगवेगळे कुंड, दगडावर कोरलेली शिल्प, डोंगर,जंगल, छायाचित्रांमुळे राजापूर आपल्या डोळ्याने पाहता आले. वर्णन वाचायला मजा आली. आपले आभार.
मात्र माहितीचा तपशील अपूर्ण आहे, असे वाटते. गुगलून पाहिल्यावर 'राजापूर' बद्दल बरीच माहिती कळते जी तुमच्या लेखात नाही. राजापूर गंगेचे स्थान मानल्या जाते. तिथेच गरम पाण्याचे कुंडही आहेत. तसेच, विष्णुमुर्तीवरुन पांडवकालीन संदर्भ स्पष्ट होत नाही.
गुंफा,कब्जा,प्रजाती, वगैरे शब्द दिसलेत पण त्यांच्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष केले. :)
असो, अजून वर्णन येऊ द्या. अगदी तपशिलवार...![म्हणजे, जमलेच तर मराठी विकिपीडियात भर घालीन]
-दिलीप बिरुटे
28 Dec 2009 - 3:16 pm | दशानन
>>गुगलून पाहिल्यावर 'राजापूर' बद्दल बरीच माहिती कळते जी तुमच्या लेखात नाही. राजापूर गंगेचे स्थान मानल्या जाते. तिथेच गरम पाण्याचे कुंडही आहेत.
अहो,
ते राजापुर वेगळे हे इनमीन चार घरटी असलेले छोटे खाणी वाई तालुक्यातलं गाव आहे साहेब.
>>विष्णुमुर्तीवरुन पांडवकालीन संदर्भ स्पष्ट होत नाही.
वर दिलेल्या फोटो संग्रहामधील भिंती शिल्पांचे फोटो जर व्यवस्थीत पाहीले गेले तर पांचाली व पाच पांडव, श्री कृष्णाचा हात इत्यादी दिसेल ( गावातील लोकांनी देखील सांगितले की गुंफा पांडव कालीन आहेत काही वर्षामागे विश्व हिंदु परिषद तर्फे काही संशोधन तेथे आले होते त्यांचे देखील असेच मत होते. हे देखील गावातील व्यक्तीनेच सांगितले.)
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 3:24 pm | JAGOMOHANPYARE
मूर्त्या शक्यतो त्या व्यक्तीच्या निर्वाणानंतर लोक उभे करतात. ( मायावतीबाई अपवाद) .. त्यामुळे पांडव्/कृष्ण दिसत असतील तर त्या मुर्ती त्या नंतरच्या काळातील असाव्यात एवढाच अंदाज निघू शकतो.
राजेसाहेब पिकासो फोटो दिसत नाही आहेत.
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
28 Dec 2009 - 3:27 pm | दशानन
ह्यावर मी काही लोकांशी इमेल संवाद चालू केला आहे जास्त माहीती मिळाली की देतो.
फोटो दिसत नाही आहेत :(
बॆन असेल तुमच्या कार्यालयात.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 3:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>राजापुर वेगळे हे इनमीन चार घरटी असलेले छोटे खाणी वाई तालुक्यातलं गाव आहे साहेब.
हम्म, तसे होऊ शकते राव. सॉरी सेठ. [रत्नागिरीतल्या राजापूरात गरम पाण्याचे झरे असावेत]
>>वर दिलेल्या फोटो संग्रहामधील भिंती शिल्पांचे फोटो जर व्यवस्थीत पाहीले गेले तर पांचाली व पाच पांडव, श्री कृष्णाचा हात इत्यादी दिसेल
तस्सं नसतं राजं, फोटोवरुन पांडवकालीन ठरवणे तसे कठीण वाटते. काही ऐतिहासिक उल्लेख असले की त्याचा काळ ठरवता येतो. काहीएक हजार वर्षापुर्वीची शिल्प इतकी सुव्यवस्थित राहणे जरा अशक्य वाटते. उदा. साठी पाहा मी एक फोटो डकवतोय. अहिल्याबाई होळकरांच्या काळातील आहे. त्यांनी जी मंदिरं उभी केलीत त्या मंदिरातील सजावटीत एक शिल्प कोरलेले आहे. फोटो वरुन त्याला मी कृष्णकाळातील म्हणनार नाही. :)
असो, पुढील प्रवासवर्णनासाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे
28 Dec 2009 - 4:06 pm | दशानन
ती पांडवकालीन लेणी आहेत अशी लोककथा मी ऐकली (वर प्रतिसादामध्ये दिला आहे संदर्भ) आणि अन्य साधनं उपलब्ध नसतील तेव्हा लोककथा हा ऐतिहासिक संदर्भ समजला जातो.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
28 Dec 2009 - 3:09 pm | sneharani
छान वर्णन केलयं...
फोटोचा स्लाईड शो सुध्दा मस्त झालाय.
आवडले.
(स्वगत : असा वेळ मिळत असता तर भटकायला...)
28 Dec 2009 - 3:45 pm | ब्रिटिश टिंग्या
ठीक आहे!
28 Dec 2009 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार
लेख छान आहे.
टिंग्याची प्रतिक्रीया बरी आहे.
(सविस्तर चिरफाड लवकरच करु.)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
28 Dec 2009 - 5:17 pm | झकासराव
राजे फोटो चांगले आहेत.
ह्या गुफा नेहमीच्यापेक्षा वेगळ्या दिसतात.
:)
28 Dec 2009 - 5:36 pm | सुनील
आडवाटेने जाऊन फारशी माहित नसलेली ठिकाणे पाहण्याची तुमची उमेद थक्क करणारी आहे. असेच अजून फिरा (आणि लेख लिहा).
गुंफा ह्या मराठी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तुम्हाला गुहा असे म्हणायचे आहे, असे मी समजतो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Dec 2009 - 5:55 pm | स्वाती२
छान स्लाईड शो!
28 Dec 2009 - 8:20 pm | वेताळ
पांडव कालिन गुंफा म्हणजे काय? गुंफा काय फक्त पांडव कालीन लोकच खोदत होते का? गुंफा पांडव कालीन होत्या ह्याला पुरावा काय? तुम्ही पुरातन विभागात कामाला आहात काय? असे बरेच प्रश्न पडले आहेत.त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
आपली गाडी अशीच देवाच्या भरोश्यावर कुठे ही लावु नका. असेच एकदा भटकताना मी गाडी एका गावात दुकाना शेजारी पार्क केली. आल्या नंतर परत गाडी चालु करतो तर ती चालु झाली नाही. सगळे चेक केले पण सर्व काही व्यवस्थित होते. जवळच्या मिस्त्री कडे गेल्यावर समजले कि माझ्या गाडी चा नवा प्लग काढुन तिथे जुना प्लुग बसवला आहे.तेव्हा फिरताना काळजी घ्या.
वेताळ
29 Dec 2009 - 9:40 pm | निमीत्त मात्र
उर्वरीत प्रतिसादात सातत्याने व्यक्तिगत आरोप दिसत असल्याने संपादीत करण्यात येत आहे.
- मिपा संपादक
30 Dec 2009 - 11:57 am | निमीत्त मात्र
खुलाश्या बद्दल आभारी आहे.
पण लाल शाईत लिहिणारा\री हा\ही कोण बरे संपादक? मिपावर संपादक कोण आहेत ही जाहीर गोष्ट आहे असे असताना निनावी संपादन करण्याची काय बरे गरज पडावी? पारदर्शकता ठेवल्यास उलट गैरसमज पसरत नाहीत
29 Dec 2009 - 1:59 am | टुकुल
राजे, मस्त फिरत आहात.
फोटो मस्त आले आहेत, कुंडाचा फोटओ खास आवडला.
अजुन फिरा आणी अजुन लिहा.
--टुकुल
29 Dec 2009 - 4:22 pm | दशानन
हो नक्की नक्की.
आता परत ३ दिवस सुट्टी आहेच ;)
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
29 Dec 2009 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटो बरे दिसत आहेत, सवडीने वाचून सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.
अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.
29 Dec 2009 - 7:03 pm | चित्रा
छान आले आहेत. दगडाची झीज पटकन होत असल्याने बहुदा शिल्पे चांगल्या अवस्थेत नाहीत.
स्लाईड-शो मध्ये दोन सतीचे दगड दिसतात ( हात असलेला), तसेच काही शिल्पे ही योगिनींची असावीत असे वाटले.
तुमच्या भटकंतीचा फायदा आम्हाला असाच होत राहू दे!
29 Dec 2009 - 7:08 pm | दशानन
>>>दोन सतीचे दगड दिसतात
अरे बरोबर.
खुपदा शोधाशोध केली पण योग्य माहीती मिळत नव्हती त्या हाता बद्दल. (मला श्री कृष्णांचा हात असावा असे वाटत होते) पण नाही ते सतीचे हात आहेत.
जाभ्या खडकामध्ये कोरले असल्यामुळे त्यांचे अस्तित्व पण ठिसुळच आहे, त्यासाठीच त्याची जपवणूक करणे आवश्यक आहे.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
29 Dec 2009 - 11:24 pm | बिपिन कार्यकर्ते
तसेच त्यात काही वीरगळही आहेत का? वाटते आहे.
बिपिन कार्यकर्ते
31 Dec 2009 - 3:10 pm | दशानन
वीरगळ म्हणजे काय ???
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©