आमची प्रेरणा प्राजुतैची ही सुंदर कविता.
बसे रुतूनिया | चाकात मध्यात ||
लोहाचा तो खिळा | काळाकुट्ट||
बसलेले चाक | चढणाची वाट||
सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई||
घाटाच्या मार्गात| वाहने सहस्र ||
एकही ना मात्र| उपयोगी||
मेकॅनिक राजे | रापट मळके ||
दाढीचे खाजणे | मधेच ते ||
आळशी ती जात| औजारे भंगार ||
वेळ काढी फार| क्रोध येई ||
फिरवले नट| काढी भराभरा ||
मागतो स्पॅनरा | माझ्याकडे ||
बुडवी टबांत | रेखोनी ठेवत||
काढी फटाफट | पंक्चरास||
हात पसरुनी| दुपटीने मागे||
पब्लिक ते रंगे| भांडणात||
नडीची ती वेळ| चालू पोरखेळ ||
सोडेना तो काळ | पैशा विना||
-पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
22 Dec 2009 - 9:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
झक्कास! वेगळाच विषय आणि मस्त विडंबन पेशवे.
अदिती
22 Dec 2009 - 9:51 am | प्राजु
हाहाहा...!
सह्ही! - प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Dec 2009 - 10:03 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री पेशवे, चांगला प्रयत्न.
खिळा घुसलेला असतांना रेखत बसण्याची काय गरज? हवा कशी भरली? असो.
ओढाताण करून टायर चाकावर बसवायलाच हवे.;)
22 Dec 2009 - 10:05 am | टारझन
=))
ठॉ !
22 Dec 2009 - 10:05 am | नंदन
वा! एक बदल म्हणून कारणांची मीमांसा न करता (धावत्या खेळाला खीळ का बसली?) केवळ परिस्थितीचे वर्णन करणारे (रुतलेल्या काळ्या खिळ्यामुळे) हे विडंबन अतिशय आवडले. रूपकाचा अर्थ लावण्याचे काम वाचकांनी आपापल्या अनुभव, मगदुर इ. प्रमाणे करावे हे कधीही उत्तमच.
--- क्या बात है! जिओ. ही ओळ वाचून अंमळ हळवा झालो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Dec 2009 - 10:17 am | ब्रिटिश टिंग्या
विडंबन वाटतयं!
मी २!
22 Dec 2009 - 11:22 am | llपुण्याचे पेशवेll
जियो नंदनराव.
;) अवघड वेळचा सामना कसा केला हे आपल्या नेमके लक्षात आले. :)
असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
22 Dec 2009 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार
माननीय श्री. पेशवे-जी,
आपल्या पद्यरचना कायमच जिवाला विरंगुळा देउन जातात. हि त्यापैकीच एक रचना.
वरिल काहि प्रतिक्रियात 'जिओ' हा शब्द आढळला. मुळ मालकास त्या शब्दरचनेबद्दल कोठेही धन्यवाद न दिलेले बघुन खेद जाहला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Dec 2009 - 7:14 pm | jaypal
करुण काव्य प्रकार आवडला. तुम्च्या बाबतित जे काही घडले त्या मागे नक्कीच काहीतरी दैवि संकेत असावा. अश्या दु:खद प्रसंगी देखिल फोटो टाकण्याचा मोह आवरता घेता येत नाही.क्षमस्व (काय करणार? वाघ्याचा पाग्या झाला पण त्याचा येळ्कोट काही जाईना)
पुढील / मागिल चाक पंक्चर झाल्यास
*************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयेंद्र पाटील, मुळ गाव:-बेडग , जि.सांगली सध्या ठाणे येथे मुक्काम ;-)
22 Dec 2009 - 6:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय योगायोग पेशवे ... आजच तुम्ही पंक्चरचं विडंबन टाकायला आणि आठातलं एक चाक पंक्चर व्हायला एकच गाठ पडली!
अदिती
22 Dec 2009 - 6:33 pm | श्रावण मोडक
खिळा 'लोहा'चा! स्टेप्नी!! वा. प्रतिभा उच्च कोटीची आहे आपली.
22 Dec 2009 - 6:36 pm | छोटा डॉन
=))
मजेशीर आहे विडंबन, आजकाल पेशव्यांची प्रतिभा फारच चमकायल लागली आहे.
अत्यंत वास्तवदर्शी ओळी.
जियो !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
22 Dec 2009 - 6:54 pm | धमाल मुलगा
=)) =))
बाकी पेशव्यांची प्रतिभा उच्चकोटीची आहे ह्याबद्दल दुमत नसावे :)
22 Dec 2009 - 6:56 pm | दशानन
+ १
असेच म्हणतो.
=))
©º°¨¨°º©©º°¨¨°º©--> राजे <-- ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
22 Dec 2009 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे..!
-दिलीप बिरुटे
22 Dec 2009 - 8:57 pm | चतुरंग
घोड्यांच्या नालाला खिळे मारण्यापासून ते गाडीच्या धांवेतला खिळा काढण्यापर्यंत गेलेली पाहून अंमळ हळवा झालो! ;)
"एखाद्याचा कात्रज करणे" ही म्हण साक्षात घाटातच धांवेस भोक पडून पुपेंसारख्या कुणी अनुभवावी हा नियतीचा खेळच (की खिळाच?)म्हणायला हवा! त्यांच्यासारख्या प्रतिभावंताने हे अनुभवले म्हणून त्यातून ह्या ओव्या स्फुरल्या, तुमच्या आमच्यासारख्या कुणा ऐर्यागैर्याच्या वाट्याला हे आले असते तर भंगारातून खिळे घरंगळावेत तशा शिव्या घरंगळल्या असत्या! (इथे पुलंच्या सखाराम गटणे मधल्या एका विधानाचा किंचित संदर्भ घेतलाय हे नमूद करतो - नाहीतर साहित्यिक हेर लग्गेच परप्रकाशित वाक्य म्हणून बोंबलायला लागतील! ;)
धाव पंक्चर होण्यात आणि ते काढून घेण्यातले किती बारकावे त्यांनी ह्या छोट्या कवितेत टिपावेत ह्याला काही सुमार!
बसलेले चाक | चढणाची वाट||
सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई||
वा वा!! ह्यातल्या दुसर्या वाक्यातला गर्भितार्थ ज्यांना समजलाय ना त्यांनाच आयुष्य किंचित समजलंय असं मी म्हणेन! ज्या स्टेपनीवर आपण वर्षानुवर्षे प्रेम करतो, तिला कधीही खराब होऊ देत नाही तिनेच ऐन वेळेला खीळ घालावी म्हणजे काय? वा!
जिथे इतर कवींची प्रतिभा पंक्चरते तिथे ह्यांची धाव सुरु होते - एवढे लिहून मी माझे दोन शब्द संपवतो!!
(समीक्षक)चतुरंग
22 Dec 2009 - 11:12 pm | अविनाशकुलकर्णी
एकदम छान आहे कविता....आवडली
23 Dec 2009 - 10:03 am | अमोल केळकर
मस्त विडंबन !
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा