शनिवारचा उतारा - (कृष्ण-ए-कमळ)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
19 Dec 2009 - 8:26 pm

हे घ्या वाचकहो, शेवटी न राहवून एक विडंबन पाडलंच. प्रेरणा कृष्णकमळ

मादक बंदरी
रूप घाबरवी
सोबत रसोई
छंद फंद

जन हे टवाळ
मेंदूही गहाळ
दंगा न कल्लोळ
दंग दंग

सजल गरळ
निबंध बरळ
न कोणी सरळ
अंगी कळा

अबोल अबोल
टिआरपी घटेल
हे संकेतस्थळ
शांत आहे

करुणविडंबन

प्रतिक्रिया

jaypal's picture

19 Dec 2009 - 8:55 pm | jaypal

"अबोल अबोल
टिआरपी घटेल
हे संकेतस्थळ
शांत आहे"

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2009 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अबोल अबोल
टिआरपी घटेल
हे संकेतस्थळ
शांत आहे

अंहं, तस्स काय नाय...! :S
संकेतस्थळावरील बंद असलेल्या खरडवह्या, व्य.नी. चालू झाले की टिआरपी वाढेल. :)

-दिलीप बिरुटे

सौरभ.बोंगाळे's picture

20 Dec 2009 - 2:13 am | सौरभ.बोंगाळे

हाहाहा... छान...

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2009 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे

उतारा म्हणुन सुडंबन आवडले :|
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नंदन's picture

20 Dec 2009 - 10:22 am | नंदन

झकास विडंबन! बूंद से गयी वो... ही म्हण आठवली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

20 Dec 2009 - 10:30 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

श्रावण मोडक's picture

20 Dec 2009 - 5:17 pm | श्रावण मोडक

+२

Nile's picture

20 Dec 2009 - 7:05 pm | Nile

हौदसे नही आती.

विनायक प्रभू's picture

20 Dec 2009 - 10:29 am | विनायक प्रभू

पापं

नंदू's picture

20 Dec 2009 - 3:09 pm | नंदू

सुंदर.

अदितीजी कविता आवडली.
सांप्रत परिस्थितीचं यतार्थ वर्णन.
सुडंबन....! घाटपांडेंशी सहमत.

नंदू

प्रसन्न केसकर's picture

20 Dec 2009 - 4:19 pm | प्रसन्न केसकर

अश्या भावना मनी येतात अनेकदा अन ते साहजिकच आहे. मनुष्य बहुतेकदा स्थितीप्रिय असतो म्हणुन बदल होताना असे होते. पण असा माणुस देखिल बदल हळुहळू का होईना स्वीकारतो हे देखिल सत्यच आहे. बदल होत असताना ज्या भावना मनी उमटतात त्यांचे यथार्थ चित्रण या कवितेत केले आहे. त्याबद्दल आपले कौतुक आणि सभोवताली होणारे बदल समजण्यासाठी व स्वीकारण्यासाठी शुभेच्छा!

अमृतांजन's picture

20 Dec 2009 - 5:02 pm | अमृतांजन

कवियत्रीला ह्या काव्यातून मनातील खोलवर रुतलेल्या व्यथा फार सामर्थ्याने शब्दरुपी वेलीवर चमेलीच्या फुलांप्रमाणे उमलवल्या आहेत.

त्यांनी चपखलतेने कळणारही नाही अशा लालित्यांने ज्या "चंपी-चंपी राम राम" सारख्या टपला मारल्या आहेत त्या खावुन गुदगुल्या झाल्या की वेदना हेच मुळात कळत नाही व काव्यरसिक टपला खात-खातच काव्यात दंग होऊन जातो.

काही प्रतिसादकांनी ह्या काव्यप्रकाराला "सुडंबन" असे उचित नाव दिलेच आहे; त्या विषेशणाची प्रचिती ह्याच नव्हे तर कवियित्रीच्या इतर काव्यातूनही ठायी-ठायी दिसून येते.

लवकरच त्यांनी एखादे काव्यपुष्पगुच्छ रसिकांच्या समोर ठेवावे अशी त्यांनी कळकळीची विनंती (किंमत मात्र रुपये ४० च्या वर असू नये).

सुबक ठेंगणी's picture

20 Dec 2009 - 5:53 pm | सुबक ठेंगणी

शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ
कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण
=)) आवडलं सुडंबन =))

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Dec 2009 - 6:01 pm | बिपिन कार्यकर्ते

शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ
कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

20 Dec 2009 - 6:05 pm | श्रावण मोडक

+१

चतुरंग's picture

20 Dec 2009 - 8:19 pm | चतुरंग

(विडंबक्-ए-कविता)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2009 - 9:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ
कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण

=)) =)) =))
हे फारच भारी सुबक!

अदिती

नंदन's picture

21 Dec 2009 - 9:30 am | नंदन

सहमत आहे. बाकी काही ठिकाणी ए च्या ऐवजी इ चालू शकेल काय? उर्दूअरबीफारसी तज्ञांनी यावर नूर टाकल्यास बहार येईल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

21 Dec 2009 - 1:13 pm | श्रावण मोडक

उर्दूअरबीफारसी तज्ञांनी यावर नूर टाकल्यास बहार येईल.
हाहाहाहा... इथंच दोन आहेत. मध्ये तू लटकलेला आहेस. पाहू काय होतं ते?

धमाल मुलगा's picture

21 Dec 2009 - 3:52 pm | धमाल मुलगा

मोडक रॉक्स... (ऑन द रॉक्स नव्हे! ;) )
वरच्या सगळ्यांशी कुठे सहमत तर कुठे असहमत!

अदिती-जी,
आपल्या कवितेच्या नादमयतेमुळे कविता आवडली. त्यातील अर्थपुर्ण रचनेला लाल सलाम!

बाकी, नंदनशेठ, एकदा तुम्ही उर्दु-अरबी-फारसी ह्यांच्या फरकावर अभ्यास कराच.

केफ हाल? खुल्लु तमाम? ;)
(अल् तमाम) धमाल खलिफा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ
कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण

लैच भारी.

-दिलीप बिरुटे

दशानन's picture

21 Dec 2009 - 9:36 am | दशानन

+ १

>>शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ
कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

चन्द्रशेखर गोखले's picture

20 Dec 2009 - 8:13 pm | चन्द्रशेखर गोखले

अफलातून, च्या मारी उचलून फट्याक का काय ते !!

निखिल देशपांडे's picture

21 Dec 2009 - 9:51 am | निखिल देशपांडे

माफ करा स्पष्ट बोलतोय, पण विडंबन जमले नाही.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

दशानन's picture

21 Dec 2009 - 10:04 am | दशानन

तुम्हाला अजूनकविता निट समजत नाही,
मग तुम्हाला विडंबने कधी पासून समजायला लागली देशपांडे :?

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

निखिल देशपांडे's picture

21 Dec 2009 - 10:15 am | निखिल देशपांडे

आमचि वैयक्तिक कुवत काढायचे ईथे काहिच कारण नव्हते.
खरे पाहता आणिबाणीत सुद्धा विडंबन आवडले का नाही हे जाहिररित्या सांगायचा अधिकार आम्हाला आहे.
आता हे विडंबन आम्हाला आवडले नाही हे आमचे व्यक्तिगत मत होते. त्यात आमची समज काढायचा तुमचा उद्देश नाही कळाला. केवळ वैयक्तिक आकसापोटी आपण आम्हाला वरचा प्रश्न विचारला आहे असे वाटते. चालायचेच असो
विडंबन नाही आवडले तद्दन गल्लाभरु वाटले हे आमचे मत आम्ही नाहि बदलणार

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अवलिया's picture

21 Dec 2009 - 10:46 am | अवलिया

माननीय अदितीजी

आपण हल्ली केवळ शनिवारचा उतारा टाकायचा म्हणुन काहीतरी टंकुन टाकता असे वाटते. आपली प्रतिभा पुर्वीसारखी राहिली नाही असे वाटते. तरी आपण काही दिवस सुटी काढुन जगभर फिरुन यावे, कदाचित आपल्या प्रतिभेला नवघुमारे फुटतील असे वाटते. मात्र वेळोवेळी आपण कोठे आहात हे कळवत जावे जेणेकरुन आम्ही तो भाग टाळत जावु.

धन्यवाद.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2009 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

माननीय श्री. अवलिया-जी ह्यांच्याशी तहे-दिल सहमत आहे. उगाच बोटांना चाळा म्हणुन कळफलक बडवावा आणी त्यातुन कहितरी निष्पन्न झाले की त्यास विडंबन म्हणावे हे पटत नाही.

असो..

मादक बंदरी
रूप घाबरवी
सोबत रसोई
छंद फंद

वरील शब्द मात्र आम्हाला आमच्या एका फावल्या वेळात छंद फंद जोपासणार्‍या बिलंदरीची आठवण देउन गेले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

समंजस's picture

21 Dec 2009 - 11:13 am | समंजस

@)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Dec 2009 - 12:00 pm | llपुण्याचे पेशवेll

अबोल अबोल
टिआरपी घटेल
हे संकेतस्थळ
शांत आहे

कविता अप्रतिमच. ओशो महर्षींच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचा प्रवास सं*गाकडून समाधीकडे व्हायला हवा. माणसाचा होतो का नाही ते माहीत नाही पण पूर्वीचे आणि आताचे हे संकेतस्थळ पाहता संकेतस्थळांचा होतो असे वाटते. हेच या शेवटच्या कडव्यात प्रतित होत आहे असे वाटते.

(समाधिस्थ संस्थळ सदस्य)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

छोटा डॉन's picture

21 Dec 2009 - 12:07 pm | छोटा डॉन

पेशव्यांची प्रतिक्रिया मजेशीर वाटली.
बाकी सवडीने

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विशाल कुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 12:44 pm | विशाल कुलकर्णी

तै लै भारी :T

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विजुभाऊ's picture

29 Dec 2009 - 1:12 pm | विजुभाऊ

राजेकाका परादादा आणि अवलियामामांशी सहमत.