रिती पोकळी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
17 Dec 2009 - 9:50 pm

रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?

प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची

कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?

गझल

प्रतिक्रिया

भानस's picture

17 Dec 2009 - 10:08 pm | भानस

क्या बात हैं! शेवटचा खासच.

नेहमी प्रमाणेच अप्रतीम गझल
"इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?".....हे बाकी आगदी खर बघा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

18 Dec 2009 - 9:36 am | मदनबाण

व्वा... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विजुभाऊ's picture

18 Dec 2009 - 9:45 am | विजुभाऊ

सन्माननीय क्रान्ती तै जी शीर्षक जरा चुकलय कवितेचे. त्यात द्विरुक्ती अलंकार का डोकावतोय?
पितांबर हा पिवळाच असतो ( पीत अंबर = पिवळे वस्त्र)
पोकळी ही रीती च असते. ( भरलेली असेल तर ती पोकळी कशी राहील?)
असो .मराठी भाषा वर्धिष्णु व्हावी म्हणून आपण कविता करता ते प्रयत्न स्तुत्य आहेत.

क्रान्ति's picture

18 Dec 2009 - 7:47 pm | क्रान्ति

आपली शंका तशी बरोबर आहे, पण पोकळी रिती नसते, तिच्यात अंधार असतो, हवा असते, जी दिसत नाही. इथे तर तेही नाही, इतकं प्रचंड रितेपण आलेलं आहे या अर्थाने ती पोकळी रिती आहे.

क्रान्ति
अग्निसखा

विजुभाऊ's picture

19 Dec 2009 - 10:03 am | विजुभाऊ

पण पोकळी रिती नसते, तिच्यात अंधार असतो
काय कळले नाही बॉ. भौतीक शास्त्रानुसार प्रकाशाचे आस्तित्व नसणे म्हणजे अंधार. अंधाराला स्वतंत्र आस्तित्व नसते.
अन्यथा प्रकाश पाडण्यासाठी जसे बल्ब ट्यूब आहेत तसे अंधार करण्यासाठीही डिव्हाईसेस निघाले असते.

श्रावण मोडक's picture

18 Dec 2009 - 10:35 am | श्रावण मोडक

तिसरी आणि पाचवी द्विपदी सकस!

विशाल कुलकर्णी's picture

18 Dec 2009 - 1:45 pm | विशाल कुलकर्णी

क्रांतीतै....,
लै भारी, आवाडली बर्का :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन's picture

18 Dec 2009 - 7:44 pm | दशानन

सुरेख !!!!

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

सुधीर काळे's picture

18 Dec 2009 - 8:36 pm | सुधीर काळे

क्रांती,
मलाही दुसरा व पाचवा 'शेर' आवडला! खरं तर सगळेच शेर अर्थपूर्ण आहेत.
इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची

व्वा! झकास!!
काका
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

प्राजु's picture

19 Dec 2009 - 10:13 am | प्राजु

नितांत सुंदर गझल.
प्रत्येक शेर आवडला.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

दिपक's picture

19 Dec 2009 - 12:37 pm | दिपक

अप्रतिम!!

कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?

व्वा मस्तच. खुप आवडली

परिकथेतील राजकुमार's picture

19 Dec 2009 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार

खुबसुरत !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य