नमस्कार
राजमाची येथील यशस्वी ट्रेक नंतर प्रोत्साहित होऊन आमचा - (team elegance) पुढचा ट्रेक लोहगड येथे निश्चित झाला शनिवारी ठरल्याप्रमाणे दुपारी १ वाजता ७ जण जमले. अनपेक्षितपणे आयत्यावेळि १ वीर यायला तयार झाले ( डॉ आनंद नातू)अखेर स्कोर्पिओ मध्ये सामानसुमान कोंबून दाटीवाटीने - ८ जणांची टीम ३ वाजता लोणावळ्याकडे निघाली . मळवली येथे १ फक्कडसा चहा पिऊन आम्ही लोहगडाकडे कूच केले.(वेळ सायंकाळचे ५)
खडकाळ रस्ता , वेडीवाकडी वळणे, उंचसखल टेकड्या पार करत आम्ही पुढे जात असतानाच एका वळणावर नान्दिबैलानी हल्ला बोल केले सर्वात पुढे असलेला वीर - नावात अजिंक्य असले तरीही - हरला . व काही काळ लपून बसला .आसपासचे गावकरी व शाळकरी मुलांच्या मदतीने तो प्रसंग निभावला. वय/ सवय ह्या factor चा विचार करता सचीनरावानी नांगी टाकली, पण सोबत्यांच्या प्रोत्साहनाने ते पुढे निघाले. ह्या वेळेस काही मंडळी लाकुड्फाटा व काटक्या गोळा करत होते.इथे सोबतीला एक श्वान आले. हळूहळू सूर्य पश्चिमेकडे झुकु लागला व संधिप्रकाश पसरला व आम्ही मार्गस्थ झालो .वाटा अंधारात बुडत असतानाच -७ वाजण्याच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड वाडीत पोहचलो. तेथील पहारेक्रयाने थोडी किरकिर केली परंतु मांडवली झाली व' हर हर महादेव' म्हणून गड चढू लागलो .बांधून काढलेली पायर्र्यांची वाट, सोबतीला अंधार , एका बाजूला दरी व दुसरीकडे उभा चढ. टप्याटप्याने २/३ वेळा क्षणिक विश्रांती घेवून ८ वाजण्याच्या सुमारास गडमाथ्यावर पोहोचलो. पहारेकर्याने दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्रथम पिण्याच्या पाण्याचा साठ शोधून काढला.व राहण्यासाठी गुहेचा शोध घेण्यास सुरवात केली.मिट्ट काळोखात 'लक्ष्मी गुहा' काही वेळातच सापडली व आमचा पाला तिथे पडला. ( मनात गुणगुण्त होतो गाणे - आता इथेच टाका तंबू)थोडीफार झाडलोट करून व बरोबर असलेल्या साहित्य वापरून रॉकेलच्या चिमणीने गुहा प्रकाशमान केली. त्याच वेळेस डॉ आनंद व अजिंक्य चूल मांडण्याची तयारी करत होते.- आता गुहा होती व चुलही पेटवून तयार होती - सुरुवात करायची होती स्वयंपाकाला .
डॉ आनंद व अजिंक्याच्या जोडीला होता सागर , तर सुदन , श्रीकांत सचिन व विक्रांत तयारी करत होते कांदा, बटाटा व टोमाटो कापण्याची.महेश भौनी - अजब प्रयोग केला - कात्रीने कोथिबीर कापणे - हाहाहः
गुहेत मसाला तयार होत होता तर बाहेर चुलीवर पाणी उकळू लागले होते. काही वेळातच सुंदरसा कांदा- बटाटा रस्सा तयार झाला. ह्या वेळेपर्यंत भूक मि म्हणायला लागली होती. रस्स्याचा घमघमाट पसरला होता , पण अजून खिचडी करायची बाकी होती . तो वर एक/एक पापड फस्त केला.अनवधानाने ओले लाकूड सर्पणात आल्याने चूल धुमसू लागली होती, अजिंक्यने आपला अनुभव पणाला लावून ह्यातून तोड काढली व आता खिचडी शिजू लागली होती. ह्या वेळेपर्यंत रात्रीचे १०.१५ वाजत आले होते. चतुर्थिचा चंद्रप्रकाश सर्वदूर पसरू लागला होता , थंड हवा , निशब्द शांतता गडावर रेंगाळत होती. अतृप्त आत्म्यांसाठी एक घास ठेवून आम्ही पंगत करून जेवायला बसलो.जेवतान किल्ले व पुढील ट्रेक ह्या संबंधीचे बोलणे चालू होते. जेवणानंतर ताट- वाट्या व परिसर स्वच्छ करून राजकारण ते प्रेम प्रकरण-गप्पांची मैफल रंगली ती रात्री १ वाजेपर्यंत . गार वारे वाहू लागले होते , गड पायथ्याचे दिवे मंदावू लागले होते व आम्ही गुहेत प्रवेश करते झालो.
कॅरी म्येंट व चादर अंथरून आम्ही झोपेच्या आधीन झालो. अचानक रात्री २.३०च्या सुमारास अजिंक्य व सुदन दोघानाही गुहेबाहेर चाहूल जाणवली , काळोखामुळे कोणीही दिसत नव्हते परंतु पावलांचा आवाज मात्र स्पष्ट येत होता. (टरकली हा एकच शब्द ) असे वर्णन रामसे बंधूच्या सिनेमात असते पण इथे तर लाईव्ह शो होता, असो रात्र सरली. गावाकडे स्त्रिया सुर्योदयाला पाणी भरण्यास जातात पण इथे मात्र श्रीकांत, सागर सचिन त्यापूर्वीच पाणी आणावयास निघाले.( वेळ सकाळची ६) सुर्व्यादेवांचे आगमन होताच आसमंतात दैदिप्यमान प्रकाश पसरला . आम्ही आपले cameras घेऊन सज्ज होतोच - लय बेष्ट सिनरी.
सागर , विक्रांतने केलेल्या , वाफाळत्या चहाची लज्जत घेत न्याहारीची तयारी सुरु केली
. मेन्यू होता - कांदे पोहे.
- पोहे तयार झाले होते - हाणले २/२ बश्या . पुन्हा चहा आलाच. - हा चहा ओम-स्नॅक्क्स च्या चहा पेक्षा २०० पट भारी होता.- वाह क्या बात हैं ! या नंतर आम्ही समान प्यॅक करून गुहेत ठेवले व गडावर भ्रमन्तीस निघालो. देऊळ, दर्गा , हत्ती टाक, व सोनकी फुलांचे ताटवे पार करून विंचू काट्याकडे निघालो. अवघड उतरण , बिकट वाट , मनाचा थरकाप उडवणारी दरी पार करत विन्चुकाट्यावर - डोलकाठीपाशी पोहोचलो.जय शिवाजी - जय भवानी (देखणे दृश्य होते हे )-.तिथेच काही काळ जुन्या आठवणीना उजाळा देत निसर्गाशी तद्रूप झालो.आता वेध लागले होते परतण्याचे , आल्या मार्गाने गुहेत आलो व थोडी विश्रांती घेत असतानाच गप्पांना परत उत आला ,मिश्कील , विनोदी, वात्रट व काही प्रमाणात चावट सुद्धा. . विश्रांती संपली व आम्ही गड उतरण्यास सुरु केले. मध्ये एका टपरीवर लिंबू सरबताचा आस्वाद घेतला. घनदाट झाडी , मातीने मळलेले रास्ते पायाखालून जात होते. निसर्ग पाहत मळवलीला पोहचलो- मिसळ व अंडा भुर्जी फस्त केली चहा संपवला व आमची स्कोर्पिओ पुण्याच्या दिशेने निघाली . मनात होत्या गडावरच्या आठवणी व पुढील ट्रेक - हरिश्चंद्रगड चे बेत .
जय महाराष्ट्र - .
पहिलाच प्रयत्न आहे .प्रकाशचित्र डकवता येत नाहियेत. योग्य ते मार्गदर्शन करावे.-
प्रतिक्रिया
17 Dec 2009 - 6:45 pm | भटकंती अनलिमिटेड
एकदम भन्नाट अनुभव आहे. मजा येते अशा ट्रेक्सना.
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
17 Dec 2009 - 6:48 pm | jaypal
हरिश्चंद्रगडला मला ही परत जायचे आहे.
बाकी फोटो साठी म्हणाल तर
फ्लिकर वर सिंगल फोटो वर क्लिक करा. मग तिथे Available Size चे ऑप्शन्स असतील. त्यातील मिडियम अथवा लार्ज साईज घ्या. मग खाली स्क्रोल केल्यास
To link to this photo on other websites you can either:
1. Copy and paste this HTML into your webpage:
असे दिसेल. त्याखाली जो HTML कोड आहे तो कॉपी करा. आता मिसळपाव वर तुम्ही जिथे ह्या फोटो संदर्भात लेखन केले आहे ते पान उघडा. तिथे 'गाभा ' ह्या भागात हा कोड पेस्ट करा.
असे सर्व फोटोंसाठी करा. आणि पूर्वदृष्य पाहून प्रकाशित करा.
फॅंट्म पाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Dec 2009 - 12:38 pm | विशाल कुलकर्णी
मस्त अनुभव ! ट्रेक्सची मजा काही औरच असते.
आम्ही देखील लोहगडचा ट्रेक खुप वेळा केलाय. मला वाटतं बटाटे आणि ट्रेक यांचे जन्म जन्मांतरीचे नाते असावे. ;-) तुम्ही कात्रीने कोथिंबीर कापली, आम्ही ती बटाट्यांवर चालवली होती, अर्थात त्याआधी बटाटे उकडुन घेतले होते. आमचा ट्रेक्सचा मेन्यु पिठले भात आणि उकडुन तेल मीठ तिखट लावलेले बटाटे असा असतो. गेली दहा वर्षे त्यात बदल झालेला नाही. अलिकडे नाष्ट्याला मॅगी किंवा ब्रेड बटर वापरतो, पण मेन कोर्स पिठले भातच. :-)
लोहगडावरील गोड पाण्याचे टाके आणि विंचुकाटा या दोन्ही गोष्टी अतिशय आवडत्या. टॉवेलला मधोमध छिद्र पाडुन तो एका पातेल्याच्या तोंडावर बांधुन त्याच्या साह्याने तेथील पाण्याच्या टाक्यातील मासे पकडण्याचा अफलातुन प्रयोग आम्ही केला होता. (सगळेच शाकाहारी असल्याने पकडलेले मासे परत पाण्यातच सोडुन दिले तो भाग वेगळा ;-) )
बाकी फोटो साठी वर जयपालभौंनी सांगितलेला पर्याय मस्तच. पण बर्याचशा ऑफीसात अगदी माझ्याही फ्लिकर ब्लॉक असते. तेव्हा पिकासा बेस्ट ऑप्शन. पुढील ट्रेकसाठी आणि वृत्तांतासाठीही शुभेच्छा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
17 Dec 2009 - 6:49 pm | पर्नल नेने मराठे
मस्तच...
चुचु
18 Dec 2009 - 3:29 am | पाषाणभेद
त्येच म्हंतू. बिगीबिगी फटू टाका.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
18 Dec 2009 - 8:52 am | मॅन्ड्रेक
at and post : Xanadu.
18 Dec 2009 - 1:01 pm | दशानन
छान लिहले आहे फोटो ही टाका नाही तर तिकडचा दुवा द्या आम्ही तिकडे जाऊन बघतो.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
18 Dec 2009 - 3:05 pm | शिप्रा
18 Dec 2009 - 3:11 pm | भटकंती अनलिमिटेड
थोडे अजून फोटो.
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
18 Dec 2009 - 3:30 pm | मॅन्ड्रेक
22 Dec 2009 - 10:04 am | विशाल कुलकर्णी
आमचा पण खारीचा वाटा ....
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
19 Dec 2009 - 1:31 pm | खादाड
=D> छान अनुभव!
21 Dec 2009 - 3:10 pm | सुप्रिया
वर्णन आवडले. असेच अनुभव लिहित रहा.