लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...

दशानन's picture
दशानन in कलादालन
17 Dec 2009 - 12:58 pm

कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा घ्यावा म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला छोटासाच. बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर आत गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम. बाईक तेथेच उभी केली व सरळ समोर दिसणारा डोंगरावर नजर टाकली तर येथे कुठे लेणी असावीत अशी अंधूकशी पण शक्यता दिसत नव्हती पण तरी आलोच आहोत तर चढू वरती व पाहू असा विचार केला व डोंगर चढायला सुरवात केली. अर्धा-एक तासामध्येच वर माथ्यावर आलो व नजर फिरवली तर समोरच्या डोंगरामध्ये लपलेल्या लेणी दिसू लागल्या. कप्पाळाला हात मारुन परड डोंगर उतरलो व समोरचा डोंगर चढावयास सुरवात केली. जसे जसे लेणी जवळ येत गेल्या तस तसे त्यांचे सौंदर्य खुलून दिसू लागले आता ते शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे त्यांचे फोटो देत आहे तुम्हीच पहा. एकून २६ लेणी आहेत. काहीपुर्ण आहे तर काही अपुर्ण. थोडे फार अतिक्रमण येथे पण झाले आहे पण ते विठल-रुक्माई ने केले आहे म्हणून आपण माफ करु त्यांना. हे बौध्दांचे पुजास्थळ + विश्रामगृह असावे असा माझा कयास आहे. ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही नेट वर ही थोडी शोधाशोध केली तरी हातात काहीच गवसले नाही त्यामुळे फोटो सोडून जास्त काही माहीती देउ शकत नाही.

हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता.

ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत.

ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक.

देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/)

शान की सवारी ;)

परतीचा प्रवास चलो पुणे.

प्रवास

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 1:09 pm | पर्नल नेने मराठे

मस्तच.....
चुचु

दशानन's picture

17 Dec 2009 - 1:15 pm | दशानन

पर्नल नेने मराठे -जी,

तुम्हाला फोटो आवडले हे पाहून खुप आनंद झाला.
अजून खुप फोटो आहेत ते ही येथे चिटकवेन पुढे कधी तरी.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

टारझन's picture

17 Dec 2009 - 4:31 pm | टारझन

राजे .. तुझी चित्रकला एवढी छाण आहे .. हे माहितंच नव्हतं =))
सगळी चित्र छाण आली आहेत. :)

- सुर्यदिप चित्रे

दशानन's picture

17 Dec 2009 - 4:35 pm | दशानन

श्री टारझन -जी,

ह्याला चित्रकला नाही म्हणत, ह्याला छायाचित्रण असे मराठी मध्ये तर फोटोग्राफी असे इंग्रजी मध्ये म्हणतात, लवकरच एक छायाचित्रण कसे करावे ह्यावर लेख लिहणार आहे तो तुम्ही नक्कीच वाचा व प्रतिसाद द्या.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2009 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या लेखास "आणि मी छायाचित्रकार झालो" असे नाव मी सुचवत आहे.

©º°¨¨°º© परायक पाचकळ ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2009 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll

राजे-जी माझा हा प्रतिसाद फार खालती जाऊन मला तुमची पोच मिळणार नाही असे वाटले म्हणून इथे घुसखोरी करत आहे. पण सध्या प्रतिसादांचा सुकाळ चालू असल्याने तुमची पोच नक्की मिळेल अशी आशा करतो आणि प्वॉईंटचा मुद्दा बोलतो.

१. प्रकाशचित्रे छान आहेत. कॅमेरा कोनता वापरला.
२. गाडी पण मस्त व दणदणीत आहे. कितीला घेतली. पूर्वी मी अमेरिकेत असताना अशी एक गाडी पाहीली होती. पण खिशात दमड्या नसल्याने घेतली नव्हती.
३. दिवसाउजेडी फोटो घेतल्याने छान आले आहेत. कोणत्या दिवशी गेला होतात आपण?
४. लेण्या उंचावर आहेत का? असतील किती फूट उंचीवर आहेत समुद्रसपाटीपासून.

वरील सर्व प्रश्नांसाठी व्यनि करणार होतो पण या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा फायदा सर्वाना असल्याने प्रश्न प्रकट विचारले. असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

चतुरंग's picture

17 Dec 2009 - 5:40 pm | चतुरंग

'शुद्धलेखनाला फाट्यावर मारा!' हा आपल्या मिसळपावचा नियम पहिल्याच फोटोवरच्या पाटीत 'बुद्धकालीण लेणी' असे लिहून महाराष्ट्र शासनानेही पाळलेला आहे हे बघून मण भरुण आले! :''(
बाकी पुढे बदामातील अनिल काळे नामक प्रेमवीराने आपण इथे येऊन शेण खाल्ले ह्याचा पुरावा इतक्या सुवाच्च अक्षरात ठेवावा ह्यानेही पुन्हा एकदा डोळे भरुण आले! :''(

(हतबुद्ध)चतुरंग

दशानन's picture

17 Dec 2009 - 5:45 pm | दशानन

श्री चतुरंग -जी,

तुम्हाला होत असलेल्या अतीव दुखःची जाणीव तुमचा प्रतिसाद करुन देत आहे ह्यातच सर्वकाही समावलेले आहे.

असो,

तुम्हाला फोटो आवडले असे लिहलेत तुम्ही त्यामुळे तुमचे ही आभार मानतो.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

आकडा's picture

17 Dec 2009 - 10:18 pm | आकडा

राजेसाहेब, आपण बौद्धकालीन लेणी पाहून आलात पण बहा'ई समाजाच्या लेण्यांचा त्यात अजिबात उल्लेख नाही ही बाब खटकली. सबब छायाचित्रांना प्रतिसाद देणे होणार नाही.

sneharani's picture

17 Dec 2009 - 1:11 pm | sneharani

फोटो छान आलेत. तिथवर जायचा रस्ता असाच पाणीसदृश्य आहे की काय?

दशानन's picture

17 Dec 2009 - 1:18 pm | दशानन

स्नेहारानी -जी,

हो पुर्ण चारकिलोमीटरचा रस्त्ता असा पाण्यातूनच जातो, बाईक जाऊ शकते पण कार इत्यादी जाउ शकत नाही त्यामुळे कार घेऊन जाउ नका.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 1:11 pm | विजुभाऊ

राजे जी तुम्ही लेखा ला जे शीर्षक दिले आहे उडवा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...
ते अत्यंत चुकीचे आहे.
उडवा मौज हे तुम्ही जे लिहिले आहे ते मजाक उडाईये या अर्थाप्रमाने होते.
तुम्हाला "मजे लिजीये". या अर्थाने लिहायचे असेल तर ते
मजा घ्या सफरीची असे लिहा.
अवांतरः "मजा मारा" असे लिहाल तर त्याचा अती भलता अर्थ होतो. ;)
शीर्षक बदलावे ही विनन्ती.

दशानन's picture

17 Dec 2009 - 1:21 pm | दशानन

श्री विजुभाऊ -जी,

तुम्ही जो सल्ला दिला आहात तो योग्यच आहे, ह्यावर विचार करुन मी नावात बदल करेन.

असो,

पण वरील फोटो बाबत तुमची काही प्रतिक्रिया नाही हे पाहून अमंळ दुखावलो.

धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2009 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो, लै भारी.

-दिलीप बिरुटे

दशानन's picture

17 Dec 2009 - 1:32 pm | दशानन

श्री प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -जी,

तुमचा प्रतिसाद माझ्या लेखाला पाहून डोळे पाणावले.
अमंळ तुमचा प्रतिसाद काळजाला भिडला.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2009 - 1:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>तुमचा प्रतिसाद माझ्या लेखाला पाहून डोळे पाणावले
काढून टाकू का ? [डोळे भरु नये म्हणून विचारतो]

डोळ्यातले पाणी जास्त झाल्यामुळेच रस्त्यावर पाणी साचलेले दिसते.
असो, उपप्रतिसाद लिहिल्याबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2009 - 1:42 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय राजे-जी,

अतिशय सुंदर अशा स्थळाचा परिचय करुन दिल्याबद्दल आपले अनेक आभार. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारी अशी अनेक रत्ने, माणके आज दुर्लक्षीत अवस्थेत आहेत ह्यावर आपण जो प्रकाश टाकल आहेत तो बघुन आपल्या बद्दलचा आदर दुणावला. ह्या प्रकाराबद्दल आपण त्वरीत शासनाशी काहि पत्रव्यवहार करावात अशी मी आपणास विनंती करतो. तो आपला आणी फक्त आपलाच अधीकार आहे.

फोटुमधील खांबावर अनिल काळे ह्यांचे नाव बघुन तसेच तुमची बौद्धकालीन दुचाकी बघुन हेलावलो.

हेलावलेला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दशानन's picture

17 Dec 2009 - 1:52 pm | दशानन

श्री परिकथेतील राजकुमार -जी,

तुम्ही जी सुचना दिली आहे त्यावर मी अमंलबजावणी त्याच आठवड्यात केली होती, १२ पानी एक सुचनावजा पत्र भारतीय पुरातन वास्तु संरक्षण खात्यास पाठवले होते पण ते दुस-याच आठवड्यात सभार परत आले , त्यामुळे अमंळ मी रागावलो आहे व आता मी सरळ राष्ट्रपती मॅडम, प्रधानमंत्री व त्यांच्या मॅडम व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायवती ह्यांना त्याची कॉपी पाठवणार आहे, ती १२ पाने येथे पब्लिश करण्याचा मानस देखील आहे लवकरच तुम्हाला काही भागामध्ये ती पत्रे येथे प्रकाशीत होतील. मागील आठवड्यात नर्‍हे पत्रिकामध्ये त्याचे काही भाग छापून पण आले आहेत हे आपणास ज्ञात असावेच.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.
आपल्या सारखेच रसीक असल्यामुळे माझा उत्साह दुणावतो नाही तर रामरक्षा व गिता पठण करण्याच्या वयात असे बाईकवरुन फिरणे झेपत नाहीच मला तरी ही आता पुढील ट्रीप पण अशीच अनोळखी ठीकाणी काढेन जेणे करुन मिपाकरांना लुफ्त उठवता येईल माझ्या सफरीचा.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विशाल कुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 1:43 pm | विशाल कुलकर्णी

श्रीयुत राजेजी, लेणी आणि फोटो छानच आहेत. लेणी बघताना एका ठिकाणी थोडेसे पुसट झालेले त्या कलावंताचे नावही बघायला मिळाले. अनिल काळे.
इतक्या वर्षानंतरही ते नाव तसेच स्पष्टपणे टिकुन राहीलेले पाहुन गहिवरुन आले. केवढी उच्च दर्जाची शिल्पकला होती त्याकाळी देखील आपल्याकडे. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन's picture

17 Dec 2009 - 1:57 pm | दशानन

श्री विशाल कुलकर्णी -जी,

ते जे अनिल काळे असे नाव दिसत आहे ते लेणी निर्माण करणा-या कारागीराचे असावे असे मलाही वाटले होते पण बदाम चिन्हामध्ये अनिल काळे + #### त्याच्या प्रियसीचे नाव अनेक खडकावर दिसले त्यावरुन मी असा विचार केला की तो अनिल काळे हा शक्यतो कारागीर नसावा प्रेमी असावा त्याकाळचा.

असो,

तुम्ही आर्जवून प्रतिसाद लिहलात ह्यासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

17 Dec 2009 - 1:48 pm | अवलिया

श्री रा रा राजेजीसाहेब

आपण आपल्या प्रकाशचित्रण करणा-या यंत्राच्या सहाय्याने बौद्ध लेण्यांची सहल घडवुन आणलीत त्याबद्दल आपला आभारी आहे. सर्वात पहिल्या फोटोत असलेला जखीणवाडी - २ किमी या उल्लेखामुळे त्याबद्दल खुलासा असेल असे वाटले होते परंतु पदरी निराशा पडली. कदाचित जखीणवाडीत काही जखीणी डाकीणी असल्यामुळे भयभीत होवुन आपण तिकडे गेला नसाल असे वाटते.

मधल्या एका चित्रासमोर "देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/"" असा उल्लेख केला आहे. केवळ पुजा-याच्या सांगण्यावर विश्वास ठेवुन आपण अतिक्रमण असा उल्लेख करण्याचे प्रयोजन समजले नाही. कदाचित बौद्ध कालापुर्वी वैदिक अनुयायांचे पूजास्थान असुन नंतर बौद्धांनी बळकावले असेल किंवा बौद्धांनी वादविवादात पराजित होवुन त्या स्थानावरुन आपला हक्क सोडला असेल किंवा अजुन काही घटना घडल्या असतील. भारतीय पुरातत्व खाते, इतिहासतज्ञ यांच्याकडुन माहिती घेवुन आपण असा उल्लेख केला असता तर ते योग्य ठरते. विनाकारण दोन धर्मानुयायांमधे वरील विषयामुळे तेढ वाढु शकते असे मला वाटते. तरी आपण योग्य तो बदल करावा.

ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही

विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी कपडे काढुन आत जावे लागते की काय असा विचार मनात आला, कारण प्रकाशचित्रामधे सदरा आणि विजार बाहेर लटकत आहेत. आणि आजुबाजुला कुणीही मनुष्य नाही असे आपण लिहिले आहे.

आपण काढलेले फोटो पाहुन मन सुखावले, परंतु हे फोटो आपणच काढले आहेत याच्या पुराव्यादाखल एका तरी फोटोत आपले दर्शन झाले असते तर बरे झाले असते.

--अवलिया

दशानन's picture

17 Dec 2009 - 2:05 pm | दशानन

देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/"" असा उल्लेख केला आहे. केवळ पुजा-याच्या सांगण्यावर विश्वास ठेवुन आपण अतिक्रमण असा उल्लेख करण्याचे प्रयोजन समजले नाही. कदाचित बौद्ध कालापुर्वी वैदिक अनुयायांचे पूजास्थान असुन नंतर बौद्धांनी बळकावले असेल किंवा बौद्धांनी वादविवादात पराजित होवुन त्या स्थानावरुन आपला हक्क सोडला असेल किंवा अजुन काही घटना घडल्या असतील

श्री अवलिया -जी,

तुमचे मत मला पटते पण जे माझ्या मनात आले तेच लिहले आहे.
बाकी मी विठलाला एक पत्र लिहीत आहे व ह्यावर त्याचे काय मत आहे हे जाणून घेतो व मग योग्य तो बद्ल करेन.

विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी कपडे काढुन आत जावे लागते की काय असा विचार मनात आला, कारण प्रकाशचित्रामधे सदरा आणि विजार बाहेर लटकत आहेत. आणि आजुबाजुला कुणीही मनुष्य नाही असे आपण लिहिले आहे.

अहो मी आधी तेथे पोहचलो तेव्हा कोणीच दिसले नाही त्यामुळे वरती कोणी मनुष्यप्राणी दिसला नाही असे म्हणालो होतो कपडे दिसले तेव्हा हा जीव दिसला मला पण हा मनुष्यप्राणी आहे की आदिमानव ह्यावर विचार मत पक्के झाले नाही म्हणून मी त्याचा उल्लेख टाळला.

असो,

तुम्ही दिलेल्या सुचनांच्यावर मी नक्की विचार करेन व पुढील जो भाग लिहीत आहे त्यात बदल करेन.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

17 Dec 2009 - 2:15 pm | अवलिया

श्री रा रा राजेजी

आपण केलेल्या त्वरीत खुलाशाबद्दल आभारी आहे.

अहो मी आधी तेथे पोहचलो तेव्हा कोणीच दिसले नाही त्यामुळे वरती कोणी मनुष्यप्राणी दिसला नाही असे म्हणालो होतो कपडे दिसले तेव्हा हा जीव दिसला मला पण हा मनुष्यप्राणी आहे की आदिमानव ह्यावर विचार मत पक्के झाले नाही म्हणून मी त्याचा उल्लेख टाळला

यावर मिपावरील विचारवंत प्रकाश टाकतील अशी आशा आहे.

धन्यवाद !

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 3:05 pm | पर्नल नेने मराठे

राजे काका सोरी हं,.,,,,,मे उगाचच तुम्हाला अरे तुरे केले.
आता फोतो पाहिला मग लक्शात आले तुम्चे वय :(
चुचु

दशानन's picture

17 Dec 2009 - 4:48 pm | दशानन

चुचु -जी,

अहो त्यात स्वारी काय म्हणायचे.
मी वयाने जरी मोठा असलो तरी बुध्दीने लहानच आहे की .

असो,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

मस्त कलंदर's picture

17 Dec 2009 - 1:56 pm | मस्त कलंदर

श्री. राजेजी..,

अशा एका दुर्लक्षित पण अतिशय सुंदर स्थळाचा परिचय करून देण्याचा तुमचा उपक्रम मनास भावला.. काही दिवसांपूर्वी तुम्ही सिंहगडाच्या सफरीबद्दलही लिहिल्याचे आठवते.. त्यावरून तुमच्याकडे वेळबाहुल्य फार असल्याचेही जाणवते.
लेख चांगला झाला आहे असे म्हटले असते.. पण काही गोष्टींकडे लक्ष पुरवाल तर अधिक बरे लिहू शकाल..

१. >>कुठेतरी चहा मारु म्हणून
या संस्थळावर शुद्धलेखनास फाट्यावर मारले जाते इतपत माहिती होती... पण थेट भाषेलाच...????

२. >>>छोटासाच बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण.
म्हणजे नक्की काय??? छोटासा बाण की छोटीशी लेणी??? की आधीच्या वाक्यात विरामचिह्ने राहून गेली आहेत???
शुद्धलेखन सोडा.. पण निदान विरामचिह्ने तरी नीट वापरत जा.

३.उगाच ३४-४० शब्दांची लांबलचक वाक्ये बनवण्यापेक्षा छोटी-छोटी वाक्ये बनवली असतीत तर लेख आणखी वाचनीय झाला असता असे वाटते!!!

असो.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2009 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय राजे-जी ,

आपण स्वतःचा अमुल्य वेळ, पैसा आणी पेटतेल खर्च करुन, दुर्लक्षीत गतवैभवाचे सर्वांना ज्ञान व्हावे म्हणुन जे कष्ट घेतलेत ते आपल्या ह्या धाग्यातुन जाणवत आहेत.

ह्या संस्थळावर काहि कु-मार्गी व्यक्ती ह्या सतत आपल्या कंपुबाहेरील लेखकाचे खच्चीकरण करणे, लहान-सहान चुकांचे भांडवल करुन त्या लेखकास नाउमेद करणे असे प्रकार करताना दिसतात. तुम्ही ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करुन असेच भटकत रहावे व ह्या मिसळपाव संस्थळाच्या माध्यमातुन आम्हालाही ह्या गतवभवाचे दर्शन घडवत रहावेत.

माननीय राजे-जीं सारख्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थळाचे मालक , संपादक (जेष्ठ व कनिष्ठ), यांचे आभार.

सुस्त बंदर
टांगा पलटी झालेला माणुस ही बाटली संपल्याची पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

17 Dec 2009 - 2:48 pm | मस्त कलंदर

प्र का टा आ

मस्त कलंदर's picture

17 Dec 2009 - 2:45 pm | मस्त कलंदर

श्री रा रा राजकुमारजी...

लेख बरा असल्याचे आम्ही मान्य केले होतेच.. पण पुन्हा खटकलेल्या काही बाबी निर्मळ मनाने निदर्शनास आणून दिल्याचा तुम्हांस इतका राग का यावा याचा उलगडा झाला नाही... यापूर्वीचा काहीही संदर्भ नसताना आपण आमची " संस्थळावर काहि कु-मार्गी व्यक्ती" यामध्ये गणना करावी याचा अंमळ विषाद वाटला!!

कंपूबाजीबद्दल ऐकले होतेच नि आपण एकाच कंपूमध्ये आहोत असा भ्रम होता.. पण आपण आता आतले आणि बाहेरचे असा 'नसलेला' वाद निर्माण करत आहात असेच उपरोक्त प्रतिसादावरून वाटते.. असो.. मांडलेला मुद्दा न सोडता "तुम्ही (पक्षी: श्री रा रा राजे-जी यांनी) ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करुन असेच भटकत रहावे व ह्या मिसळपाव संस्थळाच्या माध्यमातुन आम्हालाही ह्या गतवभवाचे दर्शन (जनसामान्यांना कळेल अशा शुद्ध व अहिंदीमिश्रित शुद्ध मराठी माषेत )घडवत रहावेत." असेच म्हणेन!!!

©º°¨¨°º© झरा ©º°¨¨°º©

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2009 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय कु. मस्त कलंदर-जी,

लेख बरा असल्याचे आम्ही मान्य केले होतेच.. पण पुन्हा खटकलेल्या काही बाबी निर्मळ मनाने निदर्शनास आणून दिल्याचा तुम्हांस इतका राग का यावा याचा उलगडा झाला नाही...

आपले मन जर निर्मळ असते तर आपण खटकलेल्या बाबी व्यनी अथवा खरडीद्वारे कळवल्या असत्या. परंतु आपण त्याची जाहिर चर्चा करुन एक प्रकारे लेखकावर सुडच उगवला आहेत असे वाटते.

माननीय मालकांनी अनेक खस्ता खाऊन हे संस्थळ उभे केले आहे आणी अनेक संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) वेळात वेळ काढुन ह्याचे संगोपन करत आहेत ते केवळ आणी केवळ नवलेखकांना वाव मिळावा, साहित्य शारदेची सेवा घडावी म्हणुनच. अशा समयी आपण लहान-सहान चुकांचे भांडवल न करता लेखकाच्या ह्या लेखनामागील भावना समजुन घ्याव्यात अशी एक सामान्य मिपाकर म्हणुन आम्ही तुमच्याकडुन ठेवलेली अपेक्षा रास्त नाहि काय?

आपले एक मित्र माननीय श्री. निखिल देशपांडे-जी ह्यांची व माननीय श्री. राजे-जी ह्यांची काहि एक कुरबुर चालु आहे असे कळते. त्याचा राग तर इथे काढला गेला नाहिये ना ?

माननीय संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी ह्या विषयात तातडीने लक्ष घालुन नवलेखकांना हतबद्ध करणारे हे प्रयत्न वेळीच थांबवुन संबंधीत सदस्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती करतो.

जांबुवंत सुंदर

मस्त कलंदर's picture

17 Dec 2009 - 4:39 pm | मस्त कलंदर

आपले मन जर निर्मळ असते तर आपण खटकलेल्या बाबी व्यनी अथवा खरडीद्वारे कळवल्या असत्या. परंतु आपण त्याची जाहिर चर्चा करुन एक प्रकारे लेखकावर सुडच उगवला आहेत असे वाटते.

मन तर निर्मळ आहेच... श्री. रा रा राजे-जी यांनी या संस्थळावर १५० हून अधिक लेख लिहिले आहेत. व ते वाचताना त्यांना बर्‍याच मिपाकरांनी त्यांच्या हिंदीच्या वापराबद्दल सूचना केल्या होत्या. बहुधा त्या मनावर घेऊन त्यांनी आपल्या नांव लौकिकाला न साजेल असा लेख लिहिल्यावर खुद्द संपादकांनीही श्री राजे-जी यांची पाठ थोपटली होती... त्याचबरोबर, परवाच्या पुणेफेरीत श्री. राजे-जी यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतही त्यांचे लेख व शुद्धलेखन यावर उहापोह झाला होता.यावरून ते थोडे सुधारतील व 'शहाण्याला शब्दांचा मार' ही उक्ती त्यांच्याबाबतीत खरी ठरेल अशी आशा होती. पण असे असतानाही ते जर अशुद्ध भाषेतील लेख मिपाकरांच्या माथी मारत असतील, तर त्यांना जाहिररीत्या समज मिळणे आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही सूडबुद्धी नाही याची श्री. रा रा राजकुमारजी यांनी दखल घ्यावी!!!

अशा समयी आपण लहान-सहान चुकांचे भांडवल न करता लेखकाच्या ह्या लेखनामागील भावना समजुन घ्याव्यात अशी एक सामान्य मिपाकर म्हणुन आम्ही तुमच्याकडुन ठेवलेली अपेक्षा रास्त नाहि काय?

उपरोक्त निर्दिष्ट केल्याप्रमाणे आजवर सामान्य मिपाकरांनी १५० हून अधिक वेळा माननीय श्री राजे-जी यांच्या अशुद्ध लेखनाचा अत्याचार सहन केला आहे. तेव्हा जर आज त्यांनी श्री राजे-जी यांच्याकडून अशा सहान चुका न होण्याची अपेक्षा केली, तर बिघडले कुठे???

आपले एक मित्र माननीय श्री. निखिल देशपांडे-जी ह्यांची व माननीय श्री. राजे-जी ह्यांची काहि एक कुरबुर चालु आहे असे कळते. त्याचा राग तर इथे काढला गेला नाहिये ना ?

संस्थळावर सारेच आपले मित्र.. या न्यायाने मी आपणांसही माझे मित्रच समजते. पण ते समजून घेण्याची तुमची बौद्धिक कुवत मला निदान इथेतरी दिसत नाही.. असो. श्री. निखिलरावजी देशपांडे-जी यांना त्यांचे वैयक्तिक हेवेदावे अशा प्रकारे काढायची गरज पडत नसावी.

माननीय संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी ह्या विषयात तातडीने लक्ष घालुन नवलेखकांना हतबद्ध करणारे हे प्रयत्न वेळीच थांबवुन संबंधीत सदस्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती करतो.

एकदम सहमत.
वर आपणच उल्लेखलेले आमचे मित्र माननीय श्री. निखिल देशपांडे-जी यांनी केलेल्या पहिल्या-वहिल्या कवितेची आपण चिरफाड केली होती. आमच्या मध्ये इतकी सहनशीलता आहे की राजे यांना १५० हून अधिकवेळा सहन केल्यावर त्यांना काही सूचना केल्या होत्या.... इथे तर तुम्ही नमनालाच त्यांना मिरच्यांची धुरी दिलीत.... तेव्हा माननीय संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी ह्या विषयात तातडीने लक्ष घालुन नवलेखकांना हतबद्ध करणारे हे प्रयत्न वेळीच थांबवुन संबंधीत सदस्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी कळकळीची विनंती करते.

मस्त कलंदर!!!

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 5:08 pm | विजुभाऊ

श्री. रा रा राजे-जी यांनी या संस्थळावर १५० हून अधिक लेख लिहिले आहेत. व ते वाचताना त्यांना बर्‍याच मिपाकरांनी त्यांच्या हिंदीच्या वापराबद्दल सूचना केल्या होत्या
त्याचा काहीही उपयोग झालेला नाहिय्ये. :(
श्रीमान राजे जी
लेखाच्या शीर्षकासंदर्भात मी एक तक्रार कळवली होते. त्या हिंदीमिश्रीत शीर्षकाचा वेगळाच अर्थ होतो हे देखील कळवले होते.
त्या ची आपण काहीच दखल न घेता केवळ खिल्ली ( हिंदीत मजाक) उडवली. योग्य मराठीत शीर्षक द्यावे या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. त्यावरून आपण दिल्लीत पुरते मुरलेले असून मराठी मनाबद्दल आपणास काय वाटते ते न सांगतादेखील समजले. :(

धमाल मुलगा's picture

17 Dec 2009 - 5:15 pm | धमाल मुलगा

मला वाटते, श्री.राजे-जी ह्यांनी सुरु केलेल्या ह्या प्रवासवर्णनामध्ये ह्या विषयावरुन झालेल्या मतभेदांचा उपक्रम सदस्यांनी आपापसात मिटवावा हे योग्य.
माझी आपणांस विनंती आहे की कृपया चर्चेला गालबोट लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

बाकी, पर्‍या आजकाल फार पियाला लागला आहे असं मोडककाका म्हणत होते. त्यामुळे चर्चेत येणारा अभिनिवेश समजु शकतो. परंतु थोडं शांत व्हा दोघेही.

श्री. राजे-जी,
आपली ही १३वी सफर आवडली.
सदर बौध्दलेण्यांमध्ये शांतचित्ताने बसले असता आपणांस काय अनुभुती झाली ह्याबद्दलही कृपया लिहावे. काय आपणांस ह्या लेण्यांमध्ये बसुन मलेशिया-सिंगापुरातील बौध्द मंदीरांची आठवण झाली काय? तिथल्या व इथल्या अनुभुतीमध्ये, त्या भावनांमध्ये काही फरक होता काय? ह्यावर आपले अधिक भाष्य जाणुन घ्यायला आवडेल.

ह्या प्रवासवर्णनाद्वारे आपली फिरस्तीची बालपणीची आवड आपण अजुनही तितक्याच प्रेमाने जपुन ठेवली आहे हे जाणवते.

असेच फिरा व आम्हाला मिपावर आपल्या सफरींमध्ये सामील करुन घ्या.

दशानन's picture

17 Dec 2009 - 5:20 pm | दशानन

श्री धमाल मुलगा -जी,

बौध्दांच्या पार्थनागृहामध्ये जी मानसिक शांती मिळते त्यांना शब्दबध मी नाही करु शकणार पण तरी ही तुम्ही म्हणत आहात तर एक लेख लिहीन मी ह्यावर. बाकी ह्यावर सविस्तर चर्चा आपण व्यनीतून करु.

असो,

प्ततिसादाबद्दल धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2009 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

मन तर निर्मळ आहेच... श्री. रा रा राजे-जी यांनी या संस्थळावर १५० हून अधिक लेख लिहिले आहेत. व ते वाचताना त्यांना बर्‍याच मिपाकरांनी त्यांच्या हिंदीच्या वापराबद्दल सूचना केल्या होत्या. बहुधा त्या मनावर घेऊन त्यांनी आपल्या नांव लौकिकाला न साजेल असा लेख लिहिल्यावर खुद्द संपादकांनीही श्री राजे-जी यांची पाठ थोपटली होती... त्याचबरोबर, परवाच्या पुणेफेरीत श्री. राजे-जी यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतही त्यांचे लेख व शुद्धलेखन यावर उहापोह झाला होता.यावरून ते थोडे सुधारतील व 'शहाण्याला शब्दांचा मार' ही उक्ती त्यांच्याबाबतीत खरी ठरेल अशी आशा होती. पण असे असतानाही ते जर अशुद्ध भाषेतील लेख मिपाकरांच्या माथी मारत असतील, तर त्यांना जाहिररीत्या समज मिळणे आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही सूडबुद्धी नाही याची श्री. रा रा राजकुमारजी यांनी दखल घ्यावी!!!

'शहाण्याला शब्दांचा मार' ह्या आपल्या वाक्यातुन लेखकाविषयीच्या आपल्या जहरी भावना समजुन येतात. शब्दाने का होईना पण लेखकाला बदडुन काढण्याचे एक मानसीक समाधान आपल्याला हवे आहे असे जाणवते.

परवाच्या पुणे फेरीत आपण माननीय श्री. राजे-जी ह्यांच्याशी उपापोह केलात असे आपण म्हणाता. आपल्या सारख्या विदुषींच्या मौलीक ज्ञानाचा फायदा त्यांना होईलच. परंतु आपल्याशी झालेल्या एका भेटीतच लेखकाची भाषा लगेच शुद्ध व्हायला पाहिजे असा अट्टाहास का ? "पी हळद आणी हो गोरी" हा वाक्यप्रचार आठवला. आपल्या एका भेटीतच जर आपल्या प्रभावाने लेखकाची भाषा सुधारत नसेल तर हा आपल्या ज्ञानाचा वैयक्तीक पराभव न्हवे काय ? आपल्या ह्या कडक शब्दातील प्रतिसादाला 'वैषम्य' म्हणावे काय ?

उपरोक्त निर्दिष्ट केल्याप्रमाणे आजवर सामान्य मिपाकरांनी १५० हून अधिक वेळा माननीय श्री राजे-जी यांच्या अशुद्ध लेखनाचा अत्याचार सहन केला आहे. तेव्हा जर आज त्यांनी श्री राजे-जी यांच्याकडून अशा सहान चुका न होण्याची अपेक्षा केली, तर बिघडले कुठे???

आपण स्वतःला सामान्य मिपाकरांच्या स्वयंघोषीत नेत्या समजत आहात काय ? १५० पेक्षा जास्ती असलेल्या लेखात कधिही कुठेही लेखकानी लेखनाद्वारे आपल्यावर अत्याचार केल्याची भावना एकाही सदस्याने व्यक्त केलेली माझ्या पाहण्यात नाही. उलट "क्रमशः का टाकले ?" , "पुढचे लेखन येउ द्या पटापटा" अशा प्रकारच्या प्रतिसादांनी हे लेख भरभरुन वाहताना दिसतात. लेखकानी हि एकप्रकारे सदस्यांच्या मनाची आपल्या लेखनाने घेतलेली पकडच न्हवे काय ?

संस्थळावर सारेच आपले मित्र.. या न्यायाने मी आपणांसही माझे मित्रच समजते. पण ते समजून घेण्याची तुमची बौद्धिक कुवत मला निदान इथेतरी दिसत नाही.. असो. श्री. निखिलरावजी देशपांडे-जी यांना त्यांचे वैयक्तिक हेवेदावे अशा प्रकारे काढायची गरज पडत नसावी.

हे फारच वैयक्तीक होत आहे. माझी बौद्धीक कुवत काढण्याची इथे काहिच आवश्यकता न्हवती. सर्व मुद्दे संपतात तेंव्हा माणुस वैयक्तीक पातळीवर उतरुन चिखलफेक करतो.

वर आपणच उल्लेखलेले आमचे मित्र माननीय श्री. निखिल देशपांडे-जी यांनी केलेल्या पहिल्या-वहिल्या कवितेची आपण चिरफाड केली होती. आमच्या मध्ये इतकी सहनशीलता आहे की राजे यांना १५० हून अधिकवेळा सहन केल्यावर त्यांना काही सूचना केल्या होत्या.... इथे तर तुम्ही नमनालाच त्यांना मिरच्यांची धुरी दिलीत.... तेव्हा माननीय संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी ह्या विषयात तातडीने लक्ष घालुन नवलेखकांना हतबद्ध करणारे हे प्रयत्न वेळीच थांबवुन संबंधीत सदस्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी कळकळीची विनंती करते.

अच्छा अच्छा तो कवितेचा राग असा काढला गेला आहे होय. बर बर !

स्वस्त डांबर

मस्त कलंदर's picture

17 Dec 2009 - 7:49 pm | मस्त कलंदर

ही भेट हा एकमेव यत्न होता असे मी विधान केले नाही. यापूर्वीही यासंबंधात संभाषण झाले होते. व तेव्हा श्री रा रा राजे-जी यांची बोलीभाषा सुधारण्यात अंमळ यश आले होते. आता त्यांना निदान काय भेटते व काय मिळते यातला फरक तरी कळतो. पण लेखनशुद्धतेच्या बाबतीत त्यांना विशेष गती नाही असे दिसते आहे.

आपल्या एका भेटीतच जर आपल्या प्रभावाने लेखकाची भाषा सुधारत नसेल तर हा आपल्या ज्ञानाचा वैयक्तीक पराभव न्हवे काय ?

याला आम्ही आमच्या ज्ञानाचा वैयक्तिक पराभव समजत नाही. घोड्याला तळ्यापर्यंत आणणे आमच्या हातात होते. पण जर त्याला आडमुठेपणाने पाणी प्यायचेच नसेल, तर त्यास आमचा नाईलाज आहे.

आपल्या ह्या कडक शब्दातील प्रतिसादाला 'वैषम्य' म्हणावे काय ?

इथे आपल्या मित्राचा 'ढ' पणा पाहून तुम्हांस राग येणे व तो अशा प्रकारे बाहेर पडणे साहजिक आहे.

१५० पेक्षा जास्ती असलेल्या लेखात कधिही कुठेही लेखकानी लेखनाद्वारे आपल्यावर अत्याचार केल्याची भावना एकाही सदस्याने व्यक्त केलेली माझ्या पाहण्यात नाही.

सुजन प्रत्येक गोष्ट बोलून दाखवत नाहीत, याचा अर्थ असा नव्हे की त्यांना तसे काही म्हणायचे नव्हते. माननीय श्री. राजे-जी यांनी एक लेख अतिशय शुद्ध लिहिला. बर्‍याच जणांना ते आवडले नि त्यांनी ती बाब श्री. राजे-जी यांच्या निदर्शनास आणूनही दिली.. याचा अर्थ आधी त्यांना या गोष्टी खटकल्या होत्या असा होत नाही काय??? यापूर्वी वाचकांनी अर्थच पाहिला, त्याचे सादरीकरण नाही पण म्हणून काय श्वानपुच्छासारखे वाकडेच वर्तन करायचे???

हे फारच वैयक्तीक होत आहे. माझी बौद्धीक कुवत काढण्याची इथे काहिच आवश्यकता न्हवती. सर्व मुद्दे संपतात तेंव्हा माणुस वैयक्तीक पातळीवर उतरुन चिखलफेक करतो.

काही मुद्दे सार्वजनिकरित्या मान्य करणे अवघड असते व त्यांस तुम्हीही अपवाद नाही आहात. तेव्हा अशा गोष्टींचा चिखलफेक म्हणून तुम्ही निषेध करणे साहजिक आहे....


अच्छा अच्छा तो कवितेचा राग असा काढला गेला आहे होय. बर बर !

हा कवितेवरचा राग खचितच नाही.तुमच्या विरोधात ताजे पुरावे हाती होतेच ते दिल्याने तुमचा अंमळ तिळपापड झालेला दिसतोय. असो..

©º°¨¨°º© चित्रकथेतील बडबडकुमार ©º°¨¨°º©

दशानन's picture

17 Dec 2009 - 2:14 pm | दशानन

मस्त कलन्दर -जी,

तुम्ही दिलेल्या सर्व सुचना मी अमलात आणल्या आहेत व तुम्ही सुचवलेले व्याकरणातील बदल योग्य पध्दतीने ठीक केल आहेत.
तुम्ही दिलेल्या सल्लाबद्दल धन्यवाद.

असो,

मी जिवनाचा खुप काळ मराठीपासून दुर राहून काढला त्यामुळे व्याकरणात चुका होतात तेव्हा तुम्ही वेळोवेळी मला मदत कराल अशी अपेक्षा. पुढील १५-१६ लेख तयार आहेत ते तुम्हाला व्यनी करतो कृपया व्याकरणातील चुका शोधून लेख परत द्या. मागे एकाला लेख दिला होता व्याकरण दुरुस्तीसाठी परत मिळालाच नाही उलट काही दिवसांनी त्याच्याच नावाने प्रसिध्द होतो की काय अशी धास्ती वाटत होती.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

मस्त कलंदर's picture

17 Dec 2009 - 5:04 pm | मस्त कलंदर

श्री. राजेजी..,

>>>मी जिवनाचा खुप काळ मराठीपासून दुर राहून काढला

आपण काही वर्षे मराठी मातीपासून दूर असाल, पण मराठी ही आपली मातृभाषा आहे, तिच्यापासून दूर कसे असाल??? आज बरेच मिपाकर परदेशात राहूनही अस्खलित मराठी लिहितात, असे असताना हिंदी भाषिक परिसरात राहिल्याने आपली मराठी भ्रष्ट झाल्याचा कांगावा खरोखरीच हास्यास्पद आहे.

तुम्ही व्याकरणातील चुका सुधारण्याचे मनावर घेतले आहे हा त्यातल्या त्यात एक दिलासा!!!!
बाकी, तुमच्या लेखांतील व्याकरणाच्या चुका सुधारण्याविषयी: आपल्याकडे सध्या काहीच काम दिसत नाही पण आमच्याकडे लष्कराच्या भाकरी भाजण्यांस वेळ नाही.. असो.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

झकासराव's picture

17 Dec 2009 - 2:13 pm | झकासराव

राजेजी
आभार. खुप छान फोटो आणि वर्णन. :)
जायचा पाणीदार रस्ता आवडला.
कोल्हापुरला तुम्ही दुचाकीवर गेलात हे वाचुन तुमच्याविषयीचा आदर दुणावला.
(ह्या वयात हे धाडस?? :D )

<<ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे>>
सगळीकडे हेच असत राजे. कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी फक्त संरक्षीत स्मारकचाच बोर्ड असतो. माहितीदर्शक फलक लावल्यास फाउल धरुन लावणार्‍याच्या फायलीत लाल शाईत शेरा मिळतो म्हणे. :)

लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळ्मानाने ऐकीवात असलेली गोष्ट अशी की पुरातन काली बौध भिक्षु हे धर्मप्रचार / प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळने सुलभ व्हावे, धर्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्षुंची राहण्या/ खाण्याची सोय सुलभतेन व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदुन घेतली आहेत. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे येथेदेखील पाहण्यास मिळतील. :)

दशानन's picture

17 Dec 2009 - 2:27 pm | दशानन

श्री झकासराव -जी,


कोल्हापुरला तुम्ही दुचाकीवर गेलात हे वाचुन तुमच्याविषयीचा आदर दुणावला.
(ह्या वयात हे धाडस?? )

हे धाडस नेहमीच करतो मी. आता ह्याच शनिवारी कुठे जावे ह्याचा प्लान करत आहे.
मागे जेव्हा बाहमीयामध्ये होतो तेव्हा देखील मी असे काही तरी धाडस केले होते त्यावर देखील एक लेख लिहीत आहे पण सध्या संगीत शिकण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे लिहला नाही, आता आठवण झाली लगेच पत्रे लिहून झाली की लिहतोच.


सगळीकडे हेच असत राजे. कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी फक्त संरक्षीत स्मारकचाच बोर्ड असतो. माहितीदर्शक फलक लावल्यास फाउल धरुन लावणार्‍याच्या फायलीत लाल शाईत शेरा मिळतो म्हणे

पण परेदेशामध्ये असे नसते ना.
तेथे सर्वत्र योग्य पध्दतीने बोर्ड लावलेले असतात, मागे मी फिजी ला गेलो होतो तेथील बोर्ड अजून ही माझ्या डोळ्यासमोर आहेत.


लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळ्मानाने ऐकीवात असलेली गोष्ट अशी की पुरातन काली बौध भिक्षु हे धर्मप्रचार / प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळने सुलभ व्हावे, धर्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्षुंची राहण्या/ खाण्याची सोय सुलभतेन व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदुन घेतली आहेत. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे येथेदेखील पाहण्यास मिळतील

ह्या महत्वपुर्ण माहीती साठी तुमचे आभार कसे मानू ? एक सिग्नेचर आहे घरी या कधी तरी बसू मग तुमचे आभार मानतो व्यवस्थीत ;)
जुन्नर परिसर, कार्ले, भाजे हा येरिया कुठे आहे ? पुणे जवळ आहे का ?
शनीवारी जाऊन परत येऊ शकतो का एका दिवसात ?

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Dec 2009 - 5:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे जुन्नर परिसर,
पुणे - नाशिक हायवे पासुन १५ किमी वर लेण्याद्री जवळ

कार्ले मुंबई पुणे हायवे पासुन २० किमी लोणावळ्याजवळ

भाजे ह्या स्थाना बद्दल माहित नाही साहेब जर गडकिल्यांबद्दल माहिती हवी आहे तर
http://www.raanvata.com/index.html ही साईट पहा जरा

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Dec 2009 - 5:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे जुन्नर परिसर,
पुणे - नाशिक हायवे पासुन १५ किमी वर लेण्याद्री जवळ

कार्ले मुंबई पुणे हायवे पासुन २० किमी लोणावळ्याजवळ

भाजे ह्या स्थाना बद्दल माहित नाही साहेब जर गडकिल्यांबद्दल माहिती हवी आहे तर
http://www.raanvata.com/index.html ही साईट पहा जरा

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

छोटा डॉन's picture

17 Dec 2009 - 2:20 pm | छोटा डॉन

श्री. रा. रा. अलवियाचंद्रसाहेबरावांच्या प्रतिसादाशी सहमत आहे ...

लेख आणि त्यासोबतची छायाचित्रे मन सुखाऊन गेली.
कसाबकालीन श्री. रा. रा. राजे यांची बौद्धकालीन स्कुटर घेऊन पांडवकालीन लेण्यांपासुन ते थेट पेशवेकालीन लेण्या पालथे घालण्याची तडफ पाहुन मन भरुन आले. त्यांचे हे भीमप्रयत्न असेच चालु राहिले तर आंतरजालावरचे ब.मो.पुरंदरे म्हणुन ओळखले जातील असे आम्ही आग्रहाने नमुद करु इच्छितो.
असो. तुर्तास एवढीच स्तुती आम्ही करु शकतो.

आता काही लेखाबद्दल आणि लेखातल्या छायाचित्रांबद्दल.
१. पहिल्याच छायाचित्रात दिशादर्शक फलक आणि त्याच्या पार्श्वभुमीवर उभी असलेल्या काही व्यक्ती ह्यांच्या आकार-उकारात काहीतरी गल्लत होत आहे. व्यक्ती अंमळ लहानशा वाटत आहे, कदाचित आपल्या प्रकाशचित्रण करणार्‍या यंत्राची ती गंमत असेल. आम्हाला त्यातले जास्त काही कळत नाही. पण उगाच आपला "नील आर्मस्ट्राँग खरच चंद्रावर गेला होता का ? " ही कथा आठवली.

२. सर्कारी मालकी दाखवणार्‍या फलकावर स्थानिक मराठी भाषेला स्थान नसल्याचे पाहुन सखेद आश्चर्य वाटले.
मला वाटते की श्री.रा.रा. राजे यांनी आपल्या संपुर्ण प्रवासादरम्यान असा ठळक अन्यायाची सबुतांची एक फाईल करुन ती आम्हाला पाठवावी, आम्ही आमच्या मार्गाने योग्य ती कॄती करु.
( मंत्री झाला म्हणजे काय सोन्याचं शेपुटं आलं का हिर्‍याचं शिंग, निवडुन कुनी दिला त्याला ? )

३. कुठल्याच छायचित्रात अजिबातच जाणवत नसणारी गर्दी व त्यामुळे अपसुकच उपस्थित असलेले फळफळावळ विक्रेते वगैरेंमुळे हे स्थान अत्यंत दुर्लक्षित असणार ह्याची खात्री पटली.
मग ह्या परिस्थीतीवर इथे खाण्यापिण्याची सोय काय आहे ? पिण्यास किमान शुद्ध पाणी मिळते का ह्यासंबंधी काहीच माहिती उपरोक्त लेखात आढळत नाही. नव-भटक्यांना ह्या सर्व गोष्टींची माहिती अत्यावश्यक असते अन्यथा त्यांना धोका उत्पन्न होऊ शकतो ह्याची श्री.रा.रा. राजे ह्यांना कल्पना नाही का ?
मग असा हालगर्जीपणा कशासाठी ? वारंवार असे लेख टाकुन स्वतःचे आंतरजालावर कौतुक करुन घेणार्‍या एका जबाबदार व्यक्तिमत्वाकडुन अशी अपेक्षा नव्हती. असो, पुढे सुधरा.

४. छायाचित्रांच्या अनुषंगाने आलेल्या काही कमेट्स जसे की "देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले.)" किंवा लेण्यांच्या दर्शनी भागावर आढणार्‍या चिन्हांवरुन त्याचा काळ व त्या काळातली राजवट इत्यादींवर काही भाष्य नसणे, लेण्यांच्या खोदकामांच्या शैलीबद्दल अनभिज्ञता इत्यादी बाबी अभ्यासाची कमतरता दर्शवितात.
आम्ही मागे एकदा श्री.रा.,रा. राजे ह्यांना "तुमचा व्यासंग कमी पडतो आहे" असे सुनावले होते, अजुन त्यांनी त्यात सुधारणा घडवुन आणली नसल्याचे पाहुन पुन्हा एकदा सखेद आश्चर्य वाटले.
असो, आता अतिरिक्त संतापामुळे आमचा किबोर्ड थरथर कापत असल्याने आम्ही इथेच थांबतो.

पुढिल प्रवासास शुभेच्छा ...

टीप : इकडे कर्नाटकात इतके चांगले स्थलसौंदर्य नाही, त्यामुळे इकडे नाही फिरकलात तरी चालेल. आवर्जुन येण्याची आवश्यकता नाही.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

दशानन's picture

17 Dec 2009 - 3:50 pm | दशानन

श्री छोटा डॉन -जी,

तुमचा एवढा भला मोठा प्रतिसाद माझा लेखावर पाहून मी भारावून गेलो आहे. काही गोष्टी चुकत आहेत ह्याची जाणीव आहे मला मी ह्या संदर्भात तुमच्याशी व्यवस्थीत पत्र व्यवहार करेनच लवकरात लवकर.

असो,

तुमची तळमळ समजली मी माझ्या विमान प्रवासात वाचलेले "बदला आपल्या स्वतःला" ह्या पुस्तकाची आठवण झाली चांगले पुस्तक आहे.
पुढील वेळी मागच्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घेऊनच
पण तुम्ही सुकाळजी घेत आहात आमची पाहून आमची छाती दोन इंच वाढली हे देखील नमुद करतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Dec 2009 - 2:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

राजे,
कराड च्या भोवती चार डोंगर आहेत. अगाशिव, पाल किंवा पाली, सदाशीवगड आणि वसंतगड.

आपण ज्या डोंगरावर गेला होता तो अगाशिवाचा डोंगर. शंकराचे एक देउळ ही आहे या डोंगरावर. त्यावरुनच या डोंगराला अगाशिवाचा डोंगर असे नाव पडले. दर वर्षी तेथे यात्रा असते. यात्रे च्या वेळी येथे भरपुर वर्दळ असते. मलकापुर मधुनही या लेण्यांकडे जाणारा रस्ता आहे. तो बर्‍यापैकी चांगला आहे.

सदाशीवगड, वसंतगड, पाल ही पण एकदा तरी भेट द्यावी अशी ठिकाणे आहेत. प्रत्येकाला स्वःतचा इतिहास आहे.

जखिणवाडी हे कराड पासुन साधारण २ किमी अंतरावर असलेले एक टुमदार गाव आहे. साधारण १००० लोकवस्ती असलेले. गावात मळाई देवीचे प्राचीन मंदीर आहे. जवळच दत्ताचे एक नविन देउळ आहे. ते पण पहाण्या सारखे आहे.

पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

दशानन's picture

17 Dec 2009 - 2:55 pm | दशानन

ज्ञानोबाचे पैजार -जी,

तुमच्या प्रतिसादातून खुपच मोलाची माहीती मिळाली.
अमंळ मी वाट वाकडीकरुन आत शिरल्यामुळे जास्त माहीती गोळा करता आली नाही ह्या बदल मनात थोडे चलबिचल होतेच पण तुमच्यामुळे पुर्ण माहीती मिळाली.

असो,

वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला प्रतिसाद लिहलात ह्या बद्दल तुमचे आभार. जर अजून काही पाहण्यासारखे असेल तर सांगा मी अवश्य जाईन, थोडे वय झाले आहे पण उत्साह तरुणाला लाजवेल असाच आहे, मागे मी मीनी मॅरेथॉन मध्ये देखील भाग घेतला होता त्याचे ही फोटो लवकरच टाकतो .

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

भटकंती अनलिमिटेड's picture

17 Dec 2009 - 2:58 pm | भटकंती अनलिमिटेड

अप्रतिम माहिती दिली आहे. पुढल्या भटकंतीच्या यादीमध्ये हे ठिकाण टाकायलाच हवे. फोटोपण छान आहेत. अधिक माहिती मिळाल्यास जरुर पुरवा.

या माहितीबद्दल धन्यवाद.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

दशानन's picture

17 Dec 2009 - 3:05 pm | दशानन

श्री पंकज झरेकर -जी,

आपल्याला फोटो व स्थळ आवडले हे पाहून आनंद झाला.
लवकर मुर्हुर्त ठरवा व एक चक्कर तिकडे टाका तुम्हाला अत्यानंद होईल व द-या खो-यामध्ये पसरलेल्या महाराष्ट्राचे विहंम दर्शन देखील होईल.
प्रवास करताना देव आपल्या पाठीशी आहे ह्याची आधी खात्री करुन घ्या जेणे करुन प्रवासामध्ये वाहन बंद पडणे, खाण्यापिण्याची अबाळ होणे ह्या गोष्टी टळतील.

असो,

तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

भटकंती अनलिमिटेड's picture

17 Dec 2009 - 3:54 pm | भटकंती अनलिमिटेड

प्रवास करताना देव नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आहे आजवर. फक्त हेल्मेटचा नियम आणि या दुव्यातले नियम आम्ही कसोशीने पाळतो. लवकरच तिकडे चक्कर टाकणार. तसा महाराष्ट्रातल्या द-या खो-यामध्येच आम्हांला घरच्यांनी ओवाळून टाकलंय. आजवरचा अनुभव "फक्त" ३५-४० हजार किमी मोटारसायकलचा आणि ५२ किल्ल्यांचा आहे. अन्य लेणी आणि मुळशीच्या नेहमीच्या सफरी वेगळ्या.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

दशानन's picture

17 Dec 2009 - 4:01 pm | दशानन

श्री पंकज झरेकर -जी,

तुमचा ह्या प्रकारच्या भटकंती मधला व्यासंग खुपच दांडगा दिसत आहे, छान छान.

तुमची देखील कधी तरी भेट होईलच भटकता भटकता.

असो,

जर वेळ मिळा कधीमधी तर आपण नक्की भेटू व तुम्ही आपले अनुभव वर्णन येथे लिहावे व मिपाचे कलादालनाला एक वेगळाच उत्साह द्यावा शी मी तुम्हाला विनंती करतो .

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Dec 2009 - 3:05 pm | ब्रिटिश टिंग्या

श्री राजे-जी,

आपण या क्षेत्राची ओळख करुन दिल्याबद्दल आपले आभार!

परंतु आपण आजकाल मिपावर लिहीलेल्या प्रतिसादांची इतर संस्थळांवर खिल्ली उडवित असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल आपला जाहीर निषेध!
मी या निषेधार्थ मिपा प्रशासनास एक विनंतीवजा तक्रारपत्र लिहीण्याच्या विचाराधीन आहे!
योग्य वेळेस ते पत्र मिपावरदेखील जाहीर केले जाईल!

*****

ब्रिटिश टिंग्या, सध्या धायरी, पुणे येथे मुक्काम

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 3:08 pm | विजुभाऊ

१५३ वाचने.
एकूण २३ पैकी८ प्रतिसाद केवळ राजे जी यांचेच.
GO राजे GO ( हे जीओ राजे जीओ असेच वाचावे)

शिप्रा's picture

17 Dec 2009 - 3:27 pm | शिप्रा

राज जी सर्वच फोटो खुपच सुदर आले आहेत्...अजुन काहि फोटो टाकणार आहात्..लवकर येऊ दे...
पुफोशु

दशानन's picture

17 Dec 2009 - 3:42 pm | दशानन

धन्यवाद शिप्रा -जी.
अजून काही फोटो तयार करत आहे तयार झाले की येथे चिटकवेनच नक्की.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

प्रसन्न केसकर's picture

17 Dec 2009 - 3:41 pm | प्रसन्न केसकर

सुंदर फोटो. खांबावर कोरलेली नावे बघुन वाईट वाटले. ठाणे-पुणे-सातारा-कोल्हापुर भागात बौद्ध संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार फिरत्या व्यापारी व भिख्खुंनी केला होता त्यामुळे अशी लेणी बरीच आहेत असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

दशानन's picture

17 Dec 2009 - 3:53 pm | दशानन

श्री पुनेरी -जी,

ह्या संदर्भात आपण कालच बोललो होतो व्यनीतून.
असो,
आता ह्या शनीवारी जवळपास कुठे भटकता येते का पाहतो.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

भटकंती अनलिमिटेड's picture

17 Dec 2009 - 3:58 pm | भटकंती अनलिमिटेड

या शनिवार साठी पुणे मुळशी, माले, पिंप्रीची दरी, सिक्रेट लेक, तेलबैला पायथा, कोराईगड, लोणावळा, पुणे असा बेत मी सुचवू शकतो.

(बाकी वरती अजून एक प्रतिसाद लिहिला आहेच).

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

दशानन's picture

17 Dec 2009 - 4:56 pm | दशानन

श्री झरेकर -जी,

तुम्ही चांगला मार्ग सुचवलात.
आताच मॅप शोधतो व प्रवासवर्णान पुस्तकांचा गठ्ठा अजून घरी पडलाच आहे तो देखील बाहेर काढतो एखादे पुस्तक वाचून जावे म्हणतो तेवढाच आधार.

असो,

तुम्ही आपुलकीने दिलेल्या नावांबद्दल आभार.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

दिपक's picture

17 Dec 2009 - 4:14 pm | दिपक

राजे -जी
छान दर्शन घडवलेत बौद्धलेण्यांचे. मागे लेण्याद्रीला गेलो होतो त्याची याद ताजा केलीत. पुढेही तुम्ही असेच महाराष्ट्रातील चांगल्या ठिकाणांचे वर्णन आणि चित्रांचे दर्शन घडवाल अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या पुढील भटकतींस शुभेच्छा.

दशानन's picture

17 Dec 2009 - 4:19 pm | दशानन

श्री दिपक -जी,

तुमचा प्रतिसाद वाचून अजून हुरुप वाढला आहे माझा.
मी लवकरच एखादा गड अथवा डोंगर चढाई करेन व त्याचे फोटो येथे चिटकवेन.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

कुंदन's picture

17 Dec 2009 - 4:37 pm | कुंदन

सुंदर वर्णन केले आहे राजे.
अजुन येउ द्यात अशीच प्रवास वर्णने.

दशानन's picture

17 Dec 2009 - 5:07 pm | दशानन

श्री कुंदन -जी,

अहोभाग्य माझे तुम्ही आपला अमुल्य वेळ खर्ची घालून माझ्या लेखावर प्रतिसाद लिहलात हे पाहून अमंळ हळवा झालो.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

शक्तिमान's picture

17 Dec 2009 - 4:44 pm | शक्तिमान

एका दुर्लक्षित स्मारकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद राजे!

बाकी पहिला मार्गदर्शक फलक टारझनने तयार केला असावा, असे वाटायला जागा आहे. ("बुद्धकाली" लेणी)

आणि स्मारकापेक्षा, "हे स्मारक संरक्षित आहे" असे सांगणारा फलकच जास्त सुरक्षित दिसत आहे...

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Dec 2009 - 4:59 pm | ब्रिटिश टिंग्या

>>("बुद्धकाली" लेणी)

आमचे परममित्र श्री टारझन-जी हे इतके छुपे रुस्तम-ए-हिंद निघतील असे वाटले नव्हते!
त्यांनी तयार केलेला मार्गदर्शन फलक पाहुन डोळे अंमळ पाणावले!

श्री टारझन-जी यांचे जाहीर आभार!
धन्यवाद!

- फलकवडी

स्वाती२'s picture

17 Dec 2009 - 6:44 pm | स्वाती२

फोटो आवडले.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Dec 2009 - 6:51 pm | प्रकाश घाटपांडे

ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही

पुरातत्व खात्याचा बोर्डच संरक्षित दिसतो. खर तर लेण्यांची माहिती अशाच बोर्डावर असायला हवी होती. अशा उपेक्षित ठिकाणी अचानक जाण्याचा योग उत्साही असतो.
बाकी जखीणवाडी अस्ती तशी हडळवाडी बी आसन कुटतरी!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मॅन्ड्रेक's picture

17 Dec 2009 - 6:51 pm | मॅन्ड्रेक

असेच पुढे जात रहा . शुभेच्छा.

at and post : Xanadu.

मॅन्ड्रेक's picture

17 Dec 2009 - 6:52 pm | मॅन्ड्रेक

असेच पुढे जात रहा . शुभेच्छा.

at and post : Xanadu.

वेताळ's picture

17 Dec 2009 - 7:14 pm | वेताळ

प्रत्येक प्रतिसादाला आपण दिलेला उस्फुर्त प्रतिसाद वाचुन मन अगदी भरुन आले. एव्हढी वाचकाची काळजी आजकाल कोण घेत नाही.आपला लेख सतत चर्चेत राहावा म्हणुन केलेला हा हट्टाहास आहे किंवा काळेकाकाची कॉपी करता असे जर कोणी म्हनत असेल तर त्या कडे कानाडोळा करावा.
भावी लेखनाला शुभेच्छा.

वेताळ

दशानन's picture

18 Dec 2009 - 10:46 am | दशानन

श्री वेताळ -जी,

तुम्हाला माझी कळकळ पोहचली हे पाहून आनंद झाला.
आम्हा लेखकांना कोणी आजकाल समजावूनच घेत नाही त्या काळात तुमच्यासारखा प्रतिसाद म्हणजे वळवाचा पाऊसच.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

हर्षद आनंदी's picture

18 Dec 2009 - 7:52 am | हर्षद आनंदी

श्री रा रा राजेजीसाहेब,

आपण स्वतःच्या दुचाकीवर स्वखर्चाने प्रवास करुन एवढा खटाटोप केलात. आपल्या एकूणच कष्टाबद्दल आम्ही आपले आभार मानतो.
भारतीय संस्कृतीतील मैलाचा दगड (मैला : योग्य अर्थ घ्यावा) ठरलेल्या अश्या पुरातन वास्तुंना भेट देऊन त्यांची सामान्य जनांना ओळख करुन द्यावी, ही तुमची कळकळ सरकार दरबारी पोचली असेलच. नसेल तर मारा फाट्यावर...
पुरातव्त खाते हे शेवटी एक खातेच असल्याने त्यांची नाराजी मनावर घेऊ नये.
शुध्दलेखन..भाषा..सर्वस्वी बाझवताना आपण आपल्या भावना (!) कमीत कमी शब्दात मांडुन आम्हाला कृतार्थ केले आहे, तसेच त्या प्रेमवीराचे नाव तुम्ही पुसुन टाकले असते, तर आम्हास आपला अधीक अभिमान वाटला असता, पण असो.

छायाचित्रण आवडले हे वेगळे सांगणे न लागे.
पुढच्या वाटचालीस शुभेच्छा..
तुम्ही मलेशियात नसुन महाराष्ट्रात आहात याचे भान ठेवुन दुचाकी चालवावी. ईथे माणसे फार स्वस्त आहेत.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

भटकंती अनलिमिटेड's picture

18 Dec 2009 - 11:10 am | भटकंती अनलिमिटेड

२-३ दिवसच झालेत मिपा'वर येऊन. मी कदाचित नवीन असेन इथे. किंवा हीच इथली रीत असेल. पण इथे काही सुंदर आणि उपयोगी माहिती दिली आहे, काहीतरी अनुभव शेअर केला आहे. फोटोचाही प्रयत्न स्तुत्य आहे. पण ती माहिती आत्मसात करणे आणि माहिती स्त्रोताचे आभार मानणे किंवा काही constructive feedback देणे यापेक्षा इतर गोष्टींवरच चर्चा अधिक झालेली/केलेली आढळते. थोडेफार गमतीदार प्रतिसाद समजू शकतो आपण. पण इथे काही सन्माननीय अपवाद वगळता बरेचसे प्रतिसाद लेखकाची (या लेखाच्या किंवा अन्य कुठल्याही) टर उडवणे या हेतूने टाकलेले दिसतात. त्याबद्दल काही सदस्यांना मी बोललोही होतो. दोन दिवसापासून कुठे लिहावे असा प्रश्न होता, पण ही पोस्ट अधिक 'हिट' आहे म्हणूनच इथे लिहिण्याचे प्रयोजन.

वाचकांची भूमिका राजहंसाची असावे असे माझे प्रामाणिक मत आहे. नीर-क्षीर विवेक जागृत ठेवून हवे ते घ्यावे, नको ते सोडून द्यावे. देणारानेही माहिती पुरवत राहावी, म्हणजे ज्या अपेक्षा घेऊन आम्ही या संकेतस्थळावर प्रवेश घेतला आहे त्या पूर्ण होतील याची खात्री वाटते. (ज्याअर्थी अगदी शुद्धलेखनापर्यंत वाचन झाले आहे त्याअर्थी) माहिती देणे आणि मिळवणे हे दोन्ही उद्देश इथे सफल झालेले आहेत. त्यामुळे या चर्चेबद्दल अजिबात खिन्नता न बाळगता पुढील पोस्ट देत राहणे. आम्ही (किमानपक्षी मी तरी) वाट पाहत आहोत.

आपलाच,
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

ता.क.: बिनकामाच्या किंवा अवांतर प्रतिसादांना (या प्रतिसादालासुद्धा) कचऱ्याचा डबा दाखवावा.

विमुक्त's picture

18 Dec 2009 - 11:30 am | विमुक्त

भटकंती, माहिती आणि फोटो सगळेच उत्तम... वरुन ३ रा फोटो एकदम बेस्ट...

Meghana's picture

18 Dec 2009 - 4:35 pm | Meghana

व चान्गले विवेचन

दशानन's picture

22 Dec 2009 - 11:30 pm | दशानन

दुनिया घेऊन येते आपला धागा वर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो.
उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;)

असो,

प्रतिसाद द्या.

=))

बदलीन.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©