बुधवारची कविता: (वाढदिवस - ३)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
17 Dec 2009 - 10:53 am

काही कामात व्यग्र असल्याने बरेच दिवसानी मिपावर आलो आणि हे सुचले. आमची प्रेरणा ओळखलीच असेल.

ही बुधवारी सदरे, पाडण्यात वेळ गेला
बाटली ठरे कपाटी, गिळण्यात वेळ गेला

उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे
परतता मिपावर, गणतीत वेळ गेला

लावून ठोकशाही अवांतर चेपताना
पडली कधीन रोशनी अंधारात तोल गेला

का बुधवारी न येते मज भान चढल्याचे
नशा उतरली परंतु गुरवारी वेळ गेला

सरसावूनी लेखणी कविता विडंबताना
पेशवाच राहीलो अन् गव्हर्नर कोणी झाला

करुणइतिहास

प्रतिक्रिया

टारझन's picture

17 Dec 2009 - 11:03 am | टारझन

अफलातुन !!!
=))

:B :B :B वेळवडी :B :B :B

स्वप्निल..'s picture

17 Dec 2009 - 11:10 am | स्वप्निल..

जबरदस्त =))

अवलिया's picture

17 Dec 2009 - 11:14 am | अवलिया

श्री रा रा पुण्याचेजी पेशवेजीसाहेब

आपली कविता वाचली, तिला आपण विडंबन म्हणत असाल तर ती चुक आहे. खरे तर एका विटंबनेची ती कविता आहे असे म्हटले तरी हरकत नाही. आपल्या कवितांमधून इतिहास समोर येतो. शेवटी इतिहास म्हणजे तरी काय ? तर असे असे घडले हे सांगणारी कथा ही इतिहास असते. इतिहासात केवळ सनावळ्या, जन्ममृत्युच्या नोंदी नसतात. तर कसे कसे का का कधी कधी घडले याचा खुलासा ज्यातुन होतो तो इतिहास. ब्रिटीश येण्यापुर्वी भारतात पुराणकथांच्या द्वारे पुर्वी कसे घडले, का घडले याचा निश्चित असा उहापोह करुन सांगितले जात असे. परंतु स्वातंत्र्य संपुन पारतंत्र्यात जेव्हा ब्रिटीशांची मनमानी सुरु झाली तेव्हा केवळ घटना कधी घडली यालाच महत्व उरले, का घडली, कशासाठी घडली, त्यामागची प्रेरणा काय होती या गोष्टी दुय्यम ठरत गेल्या. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर नवनिर्वाचित सरकारने जुनी पद्धत आणणे म्हणजे सर्वधर्मसमभावाच्या विपरीत वर्तन आहे असे समजुन आपण ज्या व्यक्तिंविरुद्ध, सत्तेविरुद्ध जीवाचे रान करुन लढलो होतो, ते विसरुन त्यांच्याच पद्धतीची शासनव्यवस्था आणली. हा सगळा इतिहासाचा भाग असतो. आणि हा इतिहास शालेय शिक्षणपद्धतीतुन सांगितला जात नसेल तर पुराणकथा, दंतकथा, सांगोवांगीतुन पसरत रहातो.

पेशवे यांच्या कवितांचे मुल्य या निकषावर पाहिले असता त्या कविता अशा अर्थाच्या इतिहासाचा प्रसार करण्यात प्रथम दर्जाच्या असुन त्या समजुन घेण्यासाठी निश्चितच पात्रता लागते. परंतु कोणतीही गोष्ट ही अनायासे समजली तर तिचे मुल्य रहात नाही त्यामुळे पेशव्यांच्या कविता समजण्यासाठी थोडे प्रयत्न केले तरी हरकत नाही.

अतिशय उत्तम कविता.

धन्यवाद.

--अवलिया

दशानन's picture

17 Dec 2009 - 11:48 am | दशानन

श्री पुण्याचे पेशवे -जी,

विडंबन छान आहे.
पण अश्या पध्दतीच्या विडंबनामध्ये आपली प्रतिभा वाया घालवू नये असे मला तरी मनापासून वाटते. हि & हि विडंबने म्हणजे उच्च कलाकृती कधीच ठरु शकणार नाहीत.

माझ्या सल्लाकडे लक्ष द्यावे अशी विनंती.

असो,

लोळून घेतो.

=))

=))

=))

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 12:18 pm | विजुभाऊ

श्री पुण्याचे पेशवे -जी,

विडंबन छान आहे.
पण अश्या पध्दतीच्या विडंबनामध्ये आपली प्रतिभा वाया घालवू नये असे मला तरी मनापासून वाटते

माननीय नवनिवासी पुणेकर राजेंशी ६२.७%सहमत आहे
विडंबन हा एक परोपजीवी काव्यप्रकार आहे त्यातून आद्य मराठी कवी श्री नारायणराव ठोसर उर्फ रामदासस्वामी याणी ३०० वर्षापूर्वी "टवाळा आवडे विनोद " असे म्हणून ठेवले आहे.
विडंबन काव्यात विनोद असतोच असे नाही. विडंबनकवितेतला विनोद आणि ठासणीच्या बंदुकीची दारु यात बरेच साम्य आहे . बार उडाला तर शिकार होते.अन्यथा शिकार्‍यावर स्वतःचीच शिकार होऊ नये म्हणून बंदूक टाकून झाडावरचढून बसण्याची पाळी येते .
वास्तावीक पहाता पेशवेजी नेहमीच विडंबन लिहायचे स्तुत्य असे प्रयत्न करायच्या प्रयत्नात असतात. प्रयत्न करणे आपल्या हातात असते त्या प्रयत्नाचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. माननीय पेशवेजी प्रयत्न करणे सोडत नाहीत हे स्तुत्य आहे. त्यांच्या कडून विडंबन कसे करावे हे शिकण्यासारखे नसले तरी प्रयत्न कसे करावे हे शिकण्यासारखे आहे .
या वाक्याचे निमित्य साधून पेशव्यानी शनिवार वाड्याच्या मागे सरदार बिनिवाले यांच्या वाड्याच्या आसपास त्याच्या करीयर गायडन्स शिकवण्या सुरु कराव्यात अशी त्याना विनन्तीवजा विनन्ती करायला हरकत नसावी

नंदन's picture

17 Dec 2009 - 11:50 am | नंदन

क्या बात है! प्रस्तुत कविता निव्वळ विडंबन नसून तिला स्वतंत्र काव्याचा दर्जा आहे या आणि श्री. अवलियांच्या प्रतिक्रियेतील इतर मतांशी सहमत आहे.

>>> उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे
ओहोहोहोहो, जियो पेशवे! 'दोन मोत्यें गळाली, सत्तावीस मोहरा हरविल्या, रुपये खुर्दा किती गेला याची तर गणतीच नाही' हे जुने ऐतिहासिक वाक्य आठवले आणि अंमळ...छ्या:! जाऊ द्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

17 Dec 2009 - 11:53 am | श्रावण मोडक

कुठं होता इतके दिवस? विडंबन भारीच. शब्दांवरची तुमची हुकमत दिसून येते!!!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2009 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय पुण्याचे पेशवे-जी अतिशय सुंदर अशी पद्य रचना. खरेतर आपण कोणा एक पद्यास ह्या मागची प्रेरणा म्हणले आहेत हा आपला विनय झाला. आपल्या सारखा प्रतिभावान दर्जेदार पद्यलेखक येव्हड्या विनम्रपणे वागतो हे बघुन हृदय भरुन आले.

आपल्या मौलीक रचना असाच वाचता वाचता हे डोळे मिटले जावेत, हिच प्रभुचरणी प्रार्थना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विशाल कुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 1:24 pm | विशाल कुलकर्णी

श्रीमंत कसल्या फंदात पडताय? अहो, तुम्ही तलवार चालवायची. शौक करायला आम्ही अहोत की ;-)

श्री श्री श्री अवलियाजींशी सहमत...
श्री श्री श्री राजेजी, तसेच विजुभाऊजी (इथे शेवटचा जी वेगळा वाचावा) आणि श्री श्री श्री पराजी (इथे 'र' गौण मानुन टाळायला हरकत नाही) या सर्वांनाच +१

कुणीतरी परंपरा चालवायला पाहीजे ना +१ ची ;-)

:O) :O) :O) :O) :O) :O) :O)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रमोद देव's picture

17 Dec 2009 - 12:09 pm | प्रमोद देव

:(
गुण फुकट घालवत आहात पेशवे महाराज.

लवंगी's picture

17 Dec 2009 - 12:12 pm | लवंगी

मस्त आहे कविता.. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Dec 2009 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll

लवंगीताई,
खरे आहे तुमचे. शेवटी काका तरी काय करणार, कविता कशीही असली तरी शेवटी 'चाल' करावीच लागते ना तिच्यावर.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

टुकुल's picture

17 Dec 2009 - 12:13 pm | टुकुल

पेशव्या...
आजपासुन मिपा तुझ जा.. :-)

--टुकुल

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 1:01 pm | पर्नल नेने मराठे

तात्याना नाव सान्गु का /:)
चुचु

टुकुल's picture

17 Dec 2009 - 1:45 pm | टुकुल

मालीक के जासुस कोने कोने मे फेले हुअ हे.. हा अह.

--टुकुल

या कवितेला मी विडंबन म्हणणार नाही. ही एक उस्फुर्त कविता आहे. (कविने, कशी कुचंबना होत आहे? हे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे मला जणवते आहे.) पेशवे आपण कुठेही कमी पडलात अथवा वाया गेलात असे मला वाटत नाही.अवलियांशी १००००% सहमत." ज्याच जळतं त्यालाच कळतं" म्हणुन एक मैत्रीचा सल्ला देतो.
कुणी निंदा अथवा वंदा
आपण कुरवाळावा आपल्या छंदा

"चित्रमय विचित्र प्रतिसादाची पद्धत जयपालने आंतरजालावर आणली"
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अवलिया's picture

17 Dec 2009 - 2:16 pm | अवलिया

श्री रा रा जयपालजीसाहेब

पेशवे आपण कुठेही कमी पडलात अथवा वाया गेलात असे मला वाटत नाही.अवलियांशी १००००% सहमत.

माझ्याशी सहमतीबद्दल मी आपला आभारी आहे.

आपण प्रत्येक धाग्यावर वेगवेगळी यथार्थ चित्रे टाकता याचे मला फार कौतुक वाटते. या धाग्यावरसुद्धा आपण टाकलेले चित्र अतिशय सुरेख आहे. खाली पडलेली व्यक्ती (कृपया माकडाला माकड म्हणुन हिणवु नये) आणि त्याचा गळा दाबणारी व्यक्ती अगदी नीट ओळखु येत आहेत.

फक्त पलिकडुन चिंतीत होवुन पहाणारी व्यक्ती कोण असावी याचा उलगडा होत नाही तसेच तिच्या चिंतेचे कारण खाली पडलेल्या व्यक्तीचा गळा दाबला जाणे हे आहे की आपली कुठली तरी वस्तु जसे गाण्याची पेटी, तबला, पावा किंवा अजुन काही हरवल्यामूळे आहे हे समजत नाही.

धन्यवाद.

--अवलिया

श्रावण मोडक's picture

17 Dec 2009 - 2:25 pm | श्रावण मोडक

चित्रांबाबत सहमत! या काव्यावर हे चित्र अगदी समर्पक ठरते.

jaypal's picture

17 Dec 2009 - 2:41 pm | jaypal

आवलियाजी साहेबजी,
सदर फोटोतुन मी काढलेला अर्थ केवळ " दंगा/मस्ती" इतपच मर्यादीत आहे.
मला असे चित्रमय (कधी,कधी विचीत्रचित्र) प्रतीसाद देण आवडतं.
ह्या फोटो मुळे अहिंसेला खतपाणी घालत आहे असा कोणि निष्कर्ष काढु नये. ती गांधीजींची २००९ मधील माकडे आहेत. गाधीजी होते तो पर्यंत ती शांत होती. आता बापु नाहीत हे लक्षात आल्यावर दंगा मस्ती करत आहेत.
किंवा
सामाजीक विषमता या द्रुष्टीकोनातुन सुद्धा त्यांच्या कडे पाहता येइल. जसे श्रिमंत आधिक श्रिमंत होत आहेत आणि गरीब अजुन गरीब. शेवटी गरीबांनी त्यांना होणा-या/सोसाव्या लागणा-या त्रासाबद्दल असा निषेध व्यक्त केला आहे.
किंवा...........
अंधारात तोल गेलेल्यांना उठवायचा प्रयत्न असावा...
किंवा.....
......शक्यता भरपुर आहेत. तुर्तास येवढेच.
कौतुकाबद्दल आभारी आहे.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/