तुझ्या विना ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
15 Dec 2009 - 3:32 pm

क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो
हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो...!

सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या
सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...!

आयुष्याच्या या रंगपटावर खोटे खोटे जगताना
फसवुनी सत्यास, स्वप्नात रंगून घेईन म्हणतो...!

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी
साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...!

हा प्रवास युगा युगांचा तुजवीण नको नकोसा
तव आठवणींना सार्‍या, संगे बांधून घेईन म्हणतो...!

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

15 Dec 2009 - 4:46 pm | मदनबाण

व्वा... सुंदर कविता... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विशाल कुलकर्णी's picture

15 Dec 2009 - 5:06 pm | विशाल कुलकर्णी

धन्स रे बाणा !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

15 Dec 2009 - 6:03 pm | फ्रॅक्चर बंड्या

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी
साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...!

फारच छान..
मस्त आहे

binarybandya™

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2009 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी
साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...!

मलाही याच ओळी आवडल्या...!

-दिलीप बिरुटे

स्वानन्द's picture

23 Dec 2009 - 7:57 am | स्वानन्द

असेच म्हणतो.

मित्रा, खरंच खूप दर्जेदार लिहितोस...
:*
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

sneharani's picture

16 Dec 2009 - 4:20 pm | sneharani

मस्त कविता आहे

sneharani's picture

16 Dec 2009 - 4:20 pm | sneharani

मस्त कविता आहे

विशाल कुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 9:21 am | विशाल कुलकर्णी

मनापासुन धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु's picture

22 Dec 2009 - 10:19 am | प्राजु

सुंदर!! खूप छान.
ही वाचायची राहून कशी काय गेली? :?

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

विशाल कुलकर्णी's picture

22 Dec 2009 - 11:30 am | विशाल कुलकर्णी

प्राजुतै.... लै लै धंकू बर्का ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाषाणभेद's picture

23 Dec 2009 - 8:29 am | पाषाणभेद

वि. कु. मस्त रे भावा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

पूजादीप's picture

23 Dec 2009 - 2:34 pm | पूजादीप

आशयघन परंतु अस्वस्थ करणारी कविता.

jaypal's picture

23 Dec 2009 - 2:38 pm | jaypal

छान आहे कविता.
"सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या
सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...!" ...........या ओळी विषेश आवडल्या
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विशाल कुलकर्णी's picture

23 Dec 2009 - 3:04 pm | विशाल कुलकर्णी

आभारी आहे. सगळ्यांचे धन्यवाद :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"