मनोगतावर हे विडंबन आधी प्रकाशित झालेआहे.
आमची प्रेरणा संदीप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो.
जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे
जाणीव कुठली? मुळात मजला शुद्ध नको आहे
ह्या शुद्धीशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे तिला, तिने ही छळू नये मजला
बधिरतेच्या गुंगीवर मी रोज असा डुलतो
आता आता छाती केवळ धुरास साठवते
दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते
आता चालती दिलखुष गप्पा बारबालांशी
आता असते रात्रही माझी थोडीशी हौशी
कलंदरीने पेल्यावर हा पेला मी भरतो
कळून येता जगण्याची मज इवलीशी त्रिज्या
उतरून गेली पुरती माझी पिण्याची मौजा
बाई बाटली सर्व जाहला बंद अता चाळा
जगा न कळले असा कसा हा झाला घोटाळा
स्वप्नी हल्ली बघ माझ्या हा यम काळा येतो!
प्रतिक्रिया
23 Sep 2007 - 10:04 pm | राजे (not verified)
वा मस्तच .....
" आता आता छाती केवळ धुरास साठवते
दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते "
क्या बात है |
राजे
(*हेच राज जैन आहेत)
23 Sep 2007 - 10:18 pm | लिखाळ
जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे
जाणीव कुठली? मुळात मजला शुद्ध नको आहे
वा..विडंबन मस्त आहे.
(पिण्याची मौजा काही विशेष पटले नाही.)
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
23 Sep 2007 - 11:42 pm | विसोबा खेचर
दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते
आता चालती दिलखुष गप्पा बारबालांशी
आता असते रात्रही माझी थोडीशी हौशी
कलंदरीने पेल्यावर हा पेला मी भरतो
वा सुंदर लिहिले आहेस रे केशवा...
आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.
24 Sep 2007 - 4:54 am | सर्किट (not verified)
संदीप खरेंच्या कविता आवडणारा एक क्लास आहे. हा क्लास साधारणतः "आज माझ्याकडे बगून कालिजात कविता हासली नाय" म्हणून हाय क्लास मराठीसाठी खरे-कुलकर्णींकडे आशेने बघतो. त्यांना कदाचित हे आवडेल. मला नाही आवडले बॉ.
केशवसुमारजी, बेटर लक नेक्ट टाईंम.
- (चोखंदळ) सर्किट
24 Sep 2007 - 7:15 am | प्राजु
नेहमीप्रमाणे मजा नाही आली.
- प्राजु.
24 Sep 2007 - 7:33 am | सहज
हे विडंबन बहूतेक "रिकाम्या ग्लासाने" केले म्हणून जमले नाही. ग्लास भरो क्लास लावो!
"रेशमाच्या बाबांनी" च्या दैदीप्यमान यशानंतर बेताचा हीट पण फ्लॉपच भासतो. (बॉबी नंतर मेरा नाम जोकर काढलात केशवकपूर)
आम्ही अजूनही टीकीट काढून "रेशमाच्या बाबांनी" बघतोय. :-)
24 Sep 2007 - 7:47 am | गुंडोपंत
""रेशमाच्या बाबांनी" च्या दैदीप्यमान यशानंतर बेताचा हीट पण फ्लॉपच भासतो. (बॉबी नंतर मेरा नाम जोकर काढलात केशवकपूर)
आम्ही अजूनही टीकीट काढून "रेशमाच्या बाबांनी" बघतोय. :-)"
सहजा
एकदम भारी उपमा दिली!!
संपुर्णपणे सहमत... पण तरीही आम्हाला 'केसु' आवडतातच बरं का!
तो बाकी सब खामोश!
केसुराव और आने दो!
छमीया! ग्लास भरो!!
चिवडाखान आये नही अभी तक?
गुंडाखान
24 Sep 2007 - 5:02 pm | रंजन
वा वा विडंबनाची अखेर झकास
25 Nov 2010 - 10:32 pm | मितभाषी
व्वा क्या बात है.
29 Nov 2010 - 3:07 pm | ढब्बू पैसा
मस्तच विडंबन!