घोसाळ्याची भजी

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
10 Dec 2009 - 1:49 pm

साहीत्य :- घोसाळे.... गोल काप केलेले अथवा फिंगरचिप्स प्रमाणे, डळीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ, तिखट, हिंग,ओवा,थोडी चिरलेली कोथिंबीर, तळायला तेल.

कृती :- प्रथम डाळीच्या पिठात मीठ, तिखट, ओवा, हिंग, घालुन घ्यावा. मग तेल गरम करुन १ मोठा चमचा तेलाचे मोहन त्या पिठात घालावे. पीठात कोथिंबीर घालुन पाणि घालुन सारखे करुन घ्यावे. पीठ फार पातळ अथवा फार घट्ट असु नये. त्यातच घोसाळ्याचे काप घालुन भजी तळुन घ्यावीत..गरम गरम खायला घ्यावीत...

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

10 Dec 2009 - 1:56 pm | पर्नल नेने मराठे

घोसाळं कसे दिस्ते..मी विसरले
चुचु

अवलिया's picture

10 Dec 2009 - 1:58 pm | अवलिया

छान !

--अवलिया

श्रद्धा.'s picture

10 Dec 2009 - 2:09 pm | श्रद्धा.

चु चु तो पण फोटो काढायला हवा होता बै... लक्षातच आले नाही... पण साधारण काकडीसारखे असते..

गणपा's picture

10 Dec 2009 - 2:26 pm | गणपा

घोसाळ म्हणजेच दोडका का?

-माझी खादाडी.

अवलिया's picture

10 Dec 2009 - 2:29 pm | अवलिया

अरे बाबा गिलकं !

बघा मी म्हणत नव्हतो गणपा त्याच्या बायकोला कामाला लावुन त्याचं क्रेडीट घेतो. कसा पकडला !

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Dec 2009 - 2:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चुचुआत्या, इंग्रजीत घोसाळ्याला झुकीनी किंवा कॉर्जेऽट असं म्हणतात.

अदिती

पर्नल नेने मराठे's picture

10 Dec 2009 - 3:21 pm | पर्नल नेने मराठे

अग बयो मला कुठ्ले इन्ग्रजी येतेय.
चुचु

पांथस्थ's picture

11 Dec 2009 - 11:59 am | पांथस्थ

घोसाळ्याला इंग्रजीत स्पाँज गोर्ड म्हणतात झुकीनी नव्हे....

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

निमीत्त मात्र's picture

11 Dec 2009 - 11:31 pm | निमीत्त मात्र

घोसाळ्याला इंग्रजीत स्पाँज गोर्ड म्हणतात झुकीनी नव्हे....

बरोबर...स्पाँज गोर्डच

"आम्ही" इंग्रजांच्या देशात जाऊन हुच्च शिक्षण घेतलेले नाही तेव्हा म्हणालो कशाला आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन!

अरे काय? स्वतःविषयी बोलणे सुद्धा संपादकिय नियमात बसेना का आता?

श्रावण मोडक's picture

10 Dec 2009 - 2:34 pm | श्रावण मोडक

खतरनाक. गणपा, बोला आता काय ते? ;)

गणपा's picture

10 Dec 2009 - 3:05 pm | गणपा

आवांतरा मुळे आय डी ३ दिवस बंद होउ शकतो (लोक म्हणतील बर झालं ;))
तरी,

हा हा हा..
अहो मराठमोळी नाव आठवत नाहीत हो ऐन वेळी.
बाकी घोसाळ टायपताना डोक्यात मात्र गिलकंच होत. :)

अंतरात्मा की आवाज : लोक पळतीवर आहेत जपुन राहिल पाहिजे गण्या.

एक शंका हा दोडका कसा दिसतो. (शिराळ तर न्हवे)
साला साफ गोंधळ झाला आहे.

-माझी खादाडी.

टारझन's picture

10 Dec 2009 - 3:10 pm | टारझन

घोसाळ्याची भजी केवळ अप्रतिम लागते. भाजी मात्र आज्जिबात आवडत नाही.
धन्यवाद श्रद्धा जी.

- घोसाळवडी

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2009 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार

चकणा म्हणुन तर हि भजी अप्रतीमच लागतात. आवडत्या भज्यांबरोबर वारुणीचा आस्वाद घेणे म्हणजे मोठी मौजच म्हणा ना !

अवांतर :- अरे टारझना आमचा नान्या चिखल नाही हो ,बटाटे फेकतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

10 Dec 2009 - 3:22 pm | पर्नल नेने मराठे

आता आले लक्शात ..थन्क्स ग ;;)
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

10 Dec 2009 - 3:22 pm | पर्नल नेने मराठे

आता आले लक्शात ..थन्क्स ग ;;)
चुचु

निमीत्त मात्र's picture

10 Dec 2009 - 10:06 pm | निमीत्त मात्र

चुचु तुमच्या एका चतकोर प्रश्नाने ह्या धाग्यावर १२ प्रतिसाद गोळा केले!
जियो!!*

बाकी पाककृत फक्कडच!

*तात्यासाहेबांकडून साभार.

स्वाती२'s picture

10 Dec 2009 - 4:52 pm | स्वाती२

छान! उन्हाळ्यात बागेत झुकिनी लागल्या की नेहमीचा मेनू.

प्रभो's picture

10 Dec 2009 - 8:22 pm | प्रभो

मस्त...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

रेवती's picture

10 Dec 2009 - 9:34 pm | रेवती

घोसाळ्याची भजी.......फार ग्रेट लागतात.
पण झुकिनीची केली तर अगदी तशी लागणार नाहीत.
झुकिनीला आपण घोसाळ्याचं चुलत भावंडं म्हणू शकतो.

रेवती

स्वाती२'s picture

11 Dec 2009 - 11:08 pm | स्वाती२

रेवती, जवळपास घोसाळ्याची चव मिळते. माझी मैत्रीण तरी फसली.

भानस's picture

12 Dec 2009 - 10:36 am | भानस

घोसाळ्याची भजी मस्तच लागतात. भाजीच्या आसपासही न फिरकणारे ही भजी आवडीने खातात.:) दोडक्याच्या ( शिराळं ) शिरांची( सालीची पण संपूर्ण साल नाही ) चटणी.....अहा.....बाकी भाजीही छान लागतेच मुगाची डाळ घालून.

बहुगुणी's picture

13 Dec 2009 - 10:06 pm | बहुगुणी

याची botanical family cucurbitacie हीच आहे, ज्या फॅमिलीत काकडी व झुकिनी याही येतात.

लहान असतांना वाळवलेल्या गिलक्याच्या भुसभुशीत गाभ्याला पेटवून देऊन धुमसत राहणारी मशाल करून फिरायचो त्याची आठवण झाली.

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2009 - 8:57 pm | प्रभाकर पेठकर

गिलक्यांची (घोसाळ्याची) भजी, गिलक्यांची मुगाची डाळ +गोडामसाला+कोथींबिर भाजी, दोडक्याची (शिराळ्याची) चण्याची डाळ+गोडामसाला+कोथींबिर पेरून केलेली भाजी, शिराळ्याच्या शिरांची चटणी अगदी अप्रतिम.

पाकृ मस्त आहे. साधारणपणे पिठात मी काही मिसळत नाही पण तुमच्या पाकृ प्रमाणे आता करून पाहिन. अभिनंदन.

------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.