सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
10 Dec 2009 - 1:56 pm | पर्नल नेने मराठे
घोसाळं कसे दिस्ते..मी विसरले
चुचु
10 Dec 2009 - 1:58 pm | अवलिया
छान !
--अवलिया
10 Dec 2009 - 2:09 pm | श्रद्धा.
चु चु तो पण फोटो काढायला हवा होता बै... लक्षातच आले नाही... पण साधारण काकडीसारखे असते..

10 Dec 2009 - 2:26 pm | गणपा
घोसाळ म्हणजेच दोडका का?
-माझी खादाडी.
10 Dec 2009 - 2:29 pm | अवलिया
अरे बाबा गिलकं !
बघा मी म्हणत नव्हतो गणपा त्याच्या बायकोला कामाला लावुन त्याचं क्रेडीट घेतो. कसा पकडला !
--अवलिया
10 Dec 2009 - 2:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चुचुआत्या, इंग्रजीत घोसाळ्याला झुकीनी किंवा कॉर्जेऽट असं म्हणतात.
अदिती
10 Dec 2009 - 3:21 pm | पर्नल नेने मराठे
अग बयो मला कुठ्ले इन्ग्रजी येतेय.
चुचु
11 Dec 2009 - 11:59 am | पांथस्थ
घोसाळ्याला इंग्रजीत स्पाँज गोर्ड म्हणतात झुकीनी नव्हे....
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
11 Dec 2009 - 11:31 pm | निमीत्त मात्र
बरोबर...स्पाँज गोर्डच
"आम्ही" इंग्रजांच्या देशात जाऊन हुच्च शिक्षण घेतलेले नाही तेव्हा म्हणालो कशाला आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन!
अरे काय? स्वतःविषयी बोलणे सुद्धा संपादकिय नियमात बसेना का आता?
10 Dec 2009 - 2:34 pm | श्रावण मोडक
खतरनाक. गणपा, बोला आता काय ते? ;)
10 Dec 2009 - 3:05 pm | गणपा
आवांतरा मुळे आय डी ३ दिवस बंद होउ शकतो (लोक म्हणतील बर झालं ;))
तरी,
हा हा हा..
अहो मराठमोळी नाव आठवत नाहीत हो ऐन वेळी.
बाकी घोसाळ टायपताना डोक्यात मात्र गिलकंच होत. :)
अंतरात्मा की आवाज : लोक पळतीवर आहेत जपुन राहिल पाहिजे गण्या.
एक शंका हा दोडका कसा दिसतो. (शिराळ तर न्हवे)
साला साफ गोंधळ झाला आहे.
-माझी खादाडी.
10 Dec 2009 - 3:10 pm | टारझन
घोसाळ्याची भजी केवळ अप्रतिम लागते. भाजी मात्र आज्जिबात आवडत नाही.
धन्यवाद श्रद्धा जी.
- घोसाळवडी
10 Dec 2009 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार
चकणा म्हणुन तर हि भजी अप्रतीमच लागतात. आवडत्या भज्यांबरोबर वारुणीचा आस्वाद घेणे म्हणजे मोठी मौजच म्हणा ना !
अवांतर :- अरे टारझना आमचा नान्या चिखल नाही हो ,बटाटे फेकतो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Dec 2009 - 3:22 pm | पर्नल नेने मराठे
आता आले लक्शात ..थन्क्स ग ;;)
चुचु
10 Dec 2009 - 3:22 pm | पर्नल नेने मराठे
आता आले लक्शात ..थन्क्स ग ;;)
चुचु
10 Dec 2009 - 10:06 pm | निमीत्त मात्र
चुचु तुमच्या एका चतकोर प्रश्नाने ह्या धाग्यावर १२ प्रतिसाद गोळा केले!
जियो!!*
बाकी पाककृत फक्कडच!
*तात्यासाहेबांकडून साभार.
10 Dec 2009 - 4:52 pm | स्वाती२
छान! उन्हाळ्यात बागेत झुकिनी लागल्या की नेहमीचा मेनू.
10 Dec 2009 - 8:22 pm | प्रभो
मस्त...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
10 Dec 2009 - 9:34 pm | रेवती
घोसाळ्याची भजी.......फार ग्रेट लागतात.
पण झुकिनीची केली तर अगदी तशी लागणार नाहीत.
झुकिनीला आपण घोसाळ्याचं चुलत भावंडं म्हणू शकतो.
रेवती
11 Dec 2009 - 11:08 pm | स्वाती२
रेवती, जवळपास घोसाळ्याची चव मिळते. माझी मैत्रीण तरी फसली.
12 Dec 2009 - 10:36 am | भानस
घोसाळ्याची भजी मस्तच लागतात. भाजीच्या आसपासही न फिरकणारे ही भजी आवडीने खातात.:) दोडक्याच्या ( शिराळं ) शिरांची( सालीची पण संपूर्ण साल नाही ) चटणी.....अहा.....बाकी भाजीही छान लागतेच मुगाची डाळ घालून.
13 Dec 2009 - 10:06 pm | बहुगुणी
लहान असतांना वाळवलेल्या गिलक्याच्या भुसभुशीत गाभ्याला पेटवून देऊन धुमसत राहणारी मशाल करून फिरायचो त्याची आठवण झाली.
15 Dec 2009 - 8:57 pm | प्रभाकर पेठकर
गिलक्यांची (घोसाळ्याची) भजी, गिलक्यांची मुगाची डाळ +गोडामसाला+कोथींबिर भाजी, दोडक्याची (शिराळ्याची) चण्याची डाळ+गोडामसाला+कोथींबिर पेरून केलेली भाजी, शिराळ्याच्या शिरांची चटणी अगदी अप्रतिम.
पाकृ मस्त आहे. साधारणपणे पिठात मी काही मिसळत नाही पण तुमच्या पाकृ प्रमाणे आता करून पाहिन. अभिनंदन.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.