साहित्य :- २ वाट्या बासमती तांदुळ, १/२ वाटी कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लवंगा,२/३ तमालपत्री, १०/१२ काजू तुकडे,
चिरलेला कोबी १ वाटी ,गाजराचे तुकडे एक वाटी, मोठे २ चमचे गोडा मसाला, चवीपुरते मीठ, २ मोठे चमचे
तेल, १ मोठा चमचा तुप, राई, जीरे, हळद, हिंग,आले १ इंच
उकललेले पाणी तांदळाच्या अडीचपट
कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा. एका कढईत २ चमचे तेल गरम करून मोहोरी,जीरे,हिंग, हळद, काजू,
लवंगा, मिरे, तमालपत्री घालून कोबी आणि गाजर घालुन परतुन घ्यावे नंतर त्यात तांदूळ घालुन परतून घ्यावे.
तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.आले किसुन घालावे, बारीक गॅसवर
उकळी काढावी.मग त्यात गोडा मसाला, चवीपुरते मीठ घालावे. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ
काढावी. भात शिजत आला की त्यात चमचाभर तुप सोडावे त्यामुळे भाताची शिते मोकळी राहतात.
खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ कोथिंबीर घालुन घ्या.
प्रतिक्रिया
10 Dec 2009 - 1:40 pm | माधुरी दिक्षित
पाठवुन द्या लगेच
10 Dec 2009 - 1:55 pm | श्रद्धा.
अग डिशमधला फोटो सापडलाच नाही ग असाच पाठवुन देते
10 Dec 2009 - 11:20 pm | jaypal
आर्धीच डीश पाठवतोय



एकीकडुन गणप्या आणि एकीकडुन ही श्रद्धा ( परत एकदा "आले पाचक" बनवाव लागेल)
मसाले भत जबराच
10 Dec 2009 - 1:49 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या सासुबै छान करतात मसालेभात ;;)
चुचु
10 Dec 2009 - 2:02 pm | अवलिया
वा वा छान छान !
घोसाळ्याची भजी ! मसाले भात..
आता कढी, मठ्ठा, बुंदिचे लाडु सगळं येवु द्या.. सगळं कसं लग्नाच्या मेजवानीत आल्यासारखे वाटते.
नव्या संपादकांना खाउ पिवु घालुन फितवणं चांगलं चालु आहे.
--अवलिया
10 Dec 2009 - 3:03 pm | श्रद्धा.
अवलिया तु पण ना भारीच आहेस बाबा.... खरच अवलिया आहेस...
10 Dec 2009 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार
अप्रतिमच !!!
दुपारच्या वेळी पाकृचा विभाग उघडु नये हेच खरे.
अवांतर :- नान्या तु लग्न कर आता, मस्त जेवणावळ घालु आपण ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Dec 2009 - 3:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी
माझी मामी मस्त करते मसालेभात एकदम त्याचीच आठ्वण झाली.
10 Dec 2009 - 8:18 pm | प्रभो
मस्त..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
11 Dec 2009 - 12:13 am | निमीत्त मात्र
स्स्स्स्स्स्स्स...मस्तच!
गणपाचा क्यामेरा कुठला आहे ते विचारुन घ्या एकदा.