मसाले भात
साहित्य :- २ वाट्या बासमती तांदुळ, १/२ वाटी कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लवंगा,२/३ तमालपत्री, १०/१२ काजू तुकडे,
चिरलेला कोबी १ वाटी ,गाजराचे तुकडे एक वाटी, मोठे २ चमचे गोडा मसाला, चवीपुरते मीठ, २ मोठे चमचे
तेल, १ मोठा चमचा तुप, राई, जीरे, हळद, हिंग,आले १ इंच
उकललेले पाणी तांदळाच्या अडीचपट
कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा. एका कढईत २ चमचे तेल गरम करून मोहोरी,जीरे,हिंग, हळद, काजू,
लवंगा, मिरे, तमालपत्री घालून कोबी आणि गाजर घालुन परतुन घ्यावे नंतर त्यात तांदूळ घालुन परतून घ्यावे.
तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.आले किसुन घालावे, बारीक गॅसवर
उकळी काढावी.मग त्यात गोडा मसाला, चवीपुरते मीठ घालावे. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ
काढावी. भात शिजत आला की त्यात चमचाभर तुप सोडावे त्यामुळे भाताची शिते मोकळी राहतात.
खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ कोथिंबीर घालुन घ्या.

वाचने
10663
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्तच ........
In reply to मस्तच ........ by माधुरी दिक्षित
अग डिशमधला
In reply to मस्तच ........ by माधुरी दिक्षित
डाएटींग करावे म्हणुन
माझ्या
वा वा छान
In reply to वा वा छान by अवलिया
अवलिया तु
In reply to वा वा छान by अवलिया
अप्रतिमच !!!
माझी मामी
मस्त..
स्स्स्स्स