शेवटी म्हटलं, प्रवासात शिकलेली गाणी
चिरंतन प्रवाशांच्या ओठी देऊन जावीत.
मग त्यांच्या किलबिलाटातून
ती गाणी सगळीकडे पसरतील.
सकाळी घरट्याबाहेर पडताना ही गाणी
आठवत असतील आणि
संध्याकाळी परत येताना अंगभर
साठवत असतील...
मग एखादे दिवशी याच गाण्यांनी उजवलेल्या
एखाद्या स्वरभारल्या कुशीतून मी परत जन्म घेईन
आणि ती गाणी परत... नव्याने शिकेन.
नाहीतरी, माझं असं काय होतं
जे मी घेऊन आलो ?
माझं असं काय आहे
जे मी घेऊन जाईन ?
पण एक मात्र नक्की.
जगण्याची गाणी निरंजनपणे गात राहीन.
प्रतिक्रिया
7 Dec 2009 - 9:34 pm | मदनबाण
व्वा... मुक्तक आवडले.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
8 Dec 2009 - 8:19 am | क्रान्ति
अतिशय सुंदर मुक्तक.
क्रान्ति
अग्निसखा