जगलो जरी मी खुप.

टुकुल's picture
टुकुल in जे न देखे रवी...
7 Dec 2009 - 9:46 am

हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता.

जगलो जरी मी खुप
परी ते जगणे नव्हते,
विद्वतेचा किताब घेवुन
हात कधीच थांबले होते

पडलो न कुणाच्या कामी
तो शब्दांचा बाजार होता,
त्या बाजारातच माझ्या
व्यक्तिमत्वाचा र्‍हास होता.

परी न दाखवली मी कुणा
नाराजी असुनी या अंतरी,
माझ्या पिलांनीच माझी
फसगत केली सारी,

परी जीव गुंतला त्यात
जरी झाले मजला परके,
ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा
करावयास मन माझे हलके,

जातानाही नाही सुटतील
हे बंध रेशमाचे,
या मायेच्या कपड्याला,
शिवणारे हात विणकर्‍याचे..

जगलो जरी मी खुप.................

करुणजीवनमान

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

7 Dec 2009 - 6:17 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2009 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त !