ते झाड़ तोडले कोणी ?

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
6 Dec 2009 - 10:26 pm

ते झाड़ तोडले कोणी ?

पक्ष्यांची घरटी होती ... बहराची पालव होती ..
.... ते झाड़ तोडले कोणी ?

संध्याकाळी मावळतीचा निरोप घेउन आम्ही यावे ...
इवल्या इवल्या पिल्लांना हे मायेचे दाणे द्यावे ..
करून विसावा पुन्हा पिलाना तुझिया खान्द्यावरती द्यावे...
इवले होते स्वप्ना आमुचे तोडून विस्कटले कोणी?
.... ते झाड़ तोडले कोणी ?

सळ सळ ऐकत तुझीच आम्ही प्रेम गूंजने करीत होतो ..
मावळतीच्या पटलावरती स्वप्न उद्याचे रेखीत होतो ..
प्रीत फुलांच्या वचना साठी तुलाच साक्षी ठेवीत होतो ..
संकेत भेटीचा तुझ्या तळीचा असा मोडला कोणी ?
.... ते झाड़ तोडले कोणी ?

शतकापुर्वी तुझे बालपण आम्ही शिम्पिले होते ...
वर्षा काळी भिजवून तुजला आम्ही पोशिले होते ..
मेघ सैन्य हे भेटाया तुज वरुणाचे आले होते ..
तोडून सारे असे कलेवर तुला बनविले कोणी ? ....
.... ते झाड़ तोडले कोणी ?

-- सागर लहरी ३१/१०/२००९ -

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2009 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा. दुर्गाबाई भागवतांना असेच एक तोडलेले झाड पाहून
'ऋतूचक्र’ चे लेखन सुचले होते. त्याची आठवण झाली.(चुभुदेघे)

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

8 Dec 2009 - 11:00 am | मृत्युन्जय

ह्रिदयनाथ मंगेशकरांचे घर थकलेले सन्यासी या निवडुंग मधील गीतावरुन प्रेरणा घेतली आहे का? खुपच छान गाणे आहे ते.

अर्थात "पक्ष्यांची घरटी होती ... ...... ते झाड़ तोडले कोणी " एवढेच त्यातले आहे.

छान जमली आहे.

ते झाड़ तोडले कोणी .. या कवितेच्या कौतुका बद्दल धन्यवाद.

माझ्या एका ओर्कुट मित्राच्या प्रोफाइल वर त्याने काढलेला तोड्लेल्या झाडाचा फोटो आहे. त्यावर एका दुसर्या मित्राने पक्ष्यांची घरटी होती ... ...... ते झाड़ तोडले कोणी अशी कॉमेंट दिली होती. ती वाचुन वरील कविता सुचली आहे. या ओळी घर थकलेले सन्यासी .... या गाण्यातील आहेत हे मला आजच समजते आहे. असो .
पुन्हा धन्यवाद.