कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे,
वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे,
मुरलीची तान ,
ऐकू येता जाई भान,
सुटे कामधाम,
घेते तुझ्याकडे धाव रे ,
तुझ्या वेणु नादामधे जीव धुंद होतो रे
कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे
वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे,
रोज खेळू रास,
हाच लागे ध्यास,
तुझे नाम होई श्वास,
उरे हाच एक छंद रे,
तुझ्या पायी सोडिले मी, उभे घरदार रे ,
कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे
वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे,
नुरे द्वैताचे भान,
होते सारी एकतान,
लागे कृष्ण ध्यान,
कृष्णमयी होते रे ,
सारीकडे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण बघते रे,
कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे
वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे,
सागर लहरी - १५/११/२००९
प्रतिक्रिया
7 Dec 2009 - 10:11 pm | पाषाणभेद
कविता आवडली.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
8 Dec 2009 - 10:09 am | jaypal
खुप आवडली कविता. विशेषतः
"रोज खेळू रास,
हाच लागे ध्यास,
तुझे नाम होई श्वास,
उरे हाच एक छंद रे," सुंदरच
11 Dec 2009 - 10:54 pm | सागरलहरी
कौतुका बद्दल आभारी आहे.