मत्सर ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Dec 2009 - 12:51 pm

चांदण्याने ओंजळ भरली
चंद्र नयनी सामावला
मत्सराने धुमसणारा, तो...
सुर्य सखे मी पाहीला

पसरले पंख मयुराने
उन्मुक्त सुखे तो नाचला
थांबला नभी खगराज
पाहता नर्तन कोमेजला

विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी
भागवतींचा हर्ष गर्जला
कमरेवरती हात ठेवूनी
विठू सावळा हिरमुसला

तुझे आहे ते तुझ्याचपाशी
हेवा मना हवा कशाला?
तुझ्यासारखा तुच राजा
मत्सर का मनी आला ?

विशाल.
०२/१२/२००९

कविता

प्रतिक्रिया

sneharani's picture

2 Dec 2009 - 12:59 pm | sneharani

सूंदर कविता...
छान झालीये..!

ज्ञानेश...'s picture

2 Dec 2009 - 5:08 pm | ज्ञानेश...

कविता आवडली. आणि त्यातला मेसेजही.

विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी
भागवतींचा हर्ष गर्जला
कमरेवरती हात ठेवूनी
विठू सावळा हिरमुसला

हे समजले नाही. विठू का हिरमुसला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2009 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विठू का हिरमुसला?

असो, तरीही कविता आवडलीच.

-दिलीप बिरुटे

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Dec 2009 - 5:56 pm | फ्रॅक्चर बंड्या

आवडली कविता...
binarybandya™

विठू का हिरमुसला?
मला वाटतं, हर्षभराने नाचणार्‍या , गाणार्‍या भक्तांना पाहून-- आपल्याला मात्र २८ युगांपासून एका विटेवर नुसते उभे रहावे लागते अशा विचाराने विठू हिरमुसला .. असे असावे .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2009 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हर्षभराने नाचणार्‍या , गाणार्‍या भक्तांना पाहून-- आपल्याला मात्र २८ युगांपासून एका विटेवर नुसते उभे रहावे लागते अशा विचाराने विठू हिरमुसला .. असे असावे

अरे वा ! एकदम पटण्यासारखे.

थँक्स.......!

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

3 Dec 2009 - 12:31 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मनीषा ! अगदी हाच अर्थ अभिप्रेत आहे मला. देवाची भक्ती करणं, त्याच्या ठायी सर्वस्व अर्पण करणं यासारखा आनंद, समाधान, त्यातली तृप्ती आणखी कशातच नाही. तो आनंद फक्त भक्तांनाच मिळतो, प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. या भावनेने देवही हिरमुसला. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रभो's picture

2 Dec 2009 - 8:01 pm | प्रभो

मस्त ..आवडली

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता आवडली. मनीषाताईंच्या स्पष्टीकरणामुळे समजायला मदत झाली.

अदिती

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:42 am | विसोबा खेचर

पसरले पंख मयुराने
उन्मुक्त सुखे तो नाचला
थांबला नभी खगराज
पाहता नर्तन कोमेजला

वा!