२६/११/०९ ची संध्याकाळ

jaypal's picture
jaypal in कलादालन
27 Nov 2009 - 3:57 pm

२६/११ चा थरार आपल्या पैकी काही जणांनी प्रत्यक्ष अनुभवला असेल, तर बहुतेकंनी माझ्यासारखा टि.व्ही. समोर बसुन. कसाबा आणि साथीदारांनी मुंबईच नव्हे तर आख्खा देश हादरवला होता. मी देखिल ठरवल येत्या २६/११/०९ ला आपण पण शुटींग करायच. आठवडा भर आधी नियजन केलं होत, पण विरजण घालणारे काही फक्त मिपा वरच असतात असं नाही. माझ्या कार्यालयत देखिल आहेत.माझ्या साहेबांनी माजी रजा नामंजुर केली. मग काय? संध्याकाळी कार्यालयातुन लवकर कल्टी मारली.
२६/११ ला एक वर्ष पुर्ण झाल्याने छत्रपती शिवाजी स्थानक, होटेल ताज, ओबेराय, गेटवे,कामा ई. ठिकाणी श्रध्दांजली समारंभांच आयोजन केल होत.(रजे अभावी ही सगळी ठिकाण कव्हर करता आली नाहीत) सकाळी निघतानच कॅमेरा सोबत घेउन निघालो.
मी फक्त नावाला हाफीसात होतो. मन मात्र शिवाजी स्थानक, होटेल ताज, ओबेराय, गेटवे,कामा ई. ठिकाणी भट्कत होत.(लहनपणी देखिल मी खुप मस्तीखोर्,खोडकर,टपोरी अस्ल्याने घरचे मला कधिच शाळेच्या ट्रीपला पाठवत नसत. सगळी मित्र मंडळी कशी मजा करत असतील? हा विचार करत शरीराने मी घरी एकटाच असे. मन तर सकाळीच ६.३० वाजता त्यांच्या बरोबर पाठवलेल असायच. आज पण आगदी तशीच अवस्था होती.)
संध्यकाळी ५/५.१५ च्या सुमारास सी.एस.टी. गाठली आणि शुटींग सुरु केल त्याचा तपशील आप्ल्या समोर सविनय सादर....

सी.एस.टी.बाहेर रक्तदान शिबीर चालु होत आणि दुस-या बाजुला २६/११/०८ च्या फोटोंचे प्रदर्शेन दोन्ही ठिकाणी उस्फुर्त गर्दी होती.

इथुन पुढे गेटवेला गेलो. तिथे प्रेत्येक जण आपपल्या परीने भावना व्यक्त करीत होता.

संपुर्ण भारताचा (पाकव्याप्त-काश्मीर सह) नकाशा घेऊन

हे सर्वजण कुणाचा फोटो काढतायत माहीत आहे का? फसाल हं

हीचा. होटेल ताजच्या पाश्र्वभुमीवर हीचा फोटो काढत होती मंडळी.

शांतता प्रर्थना "नफ्रत को प्यारसे जितेंगे हम, आतंक से नही डरेंगे हम"

"हरे क्रिश्ना हरे रामा,हरे रामा हरे क्रिश्ना" इसाकोन मंडळीचा तल्लीन होऊन गजर चालु होता.

संत निरंकारी चे आनुयायी पण होते.

सगळी कडे तिरंगा फडकत होतो. मला १५ आगस्टची आठव झाली.

"वंदे मातरम आणि भारत माता कि जय" नारे देत एकीकडुन हे टोळक आलं

तर दुसरीकडुन हा "मुक" मोर्चा

"माज बी म्हणन ऐका तर " ह्यांनी तर भ्रष्टाचारावर हल्ला बोल केला होता.

बोलता येत नाही म्हणुन काय झालं? मला पण व्यक्त होउ द्या "सारे जहां से अच्छा......."

या सर्व प्रतिक्रिया टिपायला माझ्या बरोबर विदेशी पाहुणे देखिल होते.

आणि हो !!!! व्हिआयपी येणार मग मिडीया पाहीजेच नाही का?

ताज व गेटवेचे काही फोटो.

आता वेळ होती श्रध्दांजली ची. (२० रु. एक मेणबत्ती घ्या, भाउ आज धंदा होणार वाटतं)

सगळं आट्पुन परत सी.एस.टी. ला आलो . २४ तास कायम लगबग, धवपळ उसंत अशी नाहीच या मुंबापुरीला.

मुंबईकरांचा प्राण, धमन्या सर्व काही "हीच तर आहे....लोकल"

विचारांच्या नादात घरी पोहचलो आणि मागे राहीला तो .........."मी मुंबईकर, गर्दीतही एकटा"

कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन डिएक्स १८-५५
ता.क. जवळ्पास ४/४.३० तास, ताज आणि गेटवे परिसरात फिरत होतो पण एकाही राजकिय पक्षाचा एकही कर्यकर्ता दिसला नाही. अन्यथा टिपलाच असता त्याला (कॅमे-यात) .
२६/११/२००८ चे काही फोटो इथे पहा. विरजवान आणि या फोटोग्राफरना "क.....ड......क सलाम"

मांडणी

प्रतिक्रिया

टारझन's picture

27 Nov 2009 - 4:09 pm | टारझन

गुड फोटोज ... भारावून गेलो !!

श्री's picture

27 Nov 2009 - 4:44 pm | श्री

विचारांच्या नादात घरी पोहचलो आणि मागे राहीला तो .........."मी मुंबईकर, गर्दीतही एकटा"

एकदम परफेक्ट ......

तमसो मा ज्योर्तिगमय

मदनबाण's picture

27 Nov 2009 - 4:51 pm | मदनबाण

संपुर्ण भारताचा (पाकव्याप्त-काश्मीर सह) नकाशा घेऊन
हा फोटो सगळ्यात जास्त आवडला. असचं झाल पाहिजे !!! माजुरड्या पाकड्यांना कायमची अद्दल घडवलीच पाहिजे.वन टाईम कंबरड मोडल यांच की वळवळ थांबेल कायमची.
आता वेळ होती श्रध्दांजली ची. (२० रु. एक मेणबत्ती घ्या, भाउ आज धंदा होणार वाटतं)
हा.अगदी बरोबर,,, आज कालचा हा ट्रेंड झाला आहे .आली श्रध्दांजली वेळ की लाव मेणबत्ती !!!,आली श्रध्दांजली वेळ की लाव मेणबत्ती !!! हा मेणबत्तीचा धंदा जोरात चालणार कारण अशा घटना घडणार नाहीत याची कुठलीच खात्री कोणही देऊ शकणार नाही आणि भारनियमन आहेच खप वाढवायला.
"वंदे मातरम आणि भारत माता कि जय" नारे देत एकीकडुन हे टोळक आलं
ए मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी हे गाणं आता इतक्या वेळेला ऐकतोय, की मनात विचार येतो... अजुन किती दिवस आणि का म्हणुन डोळ्यात पाणी आणायच ??? शहीद होण्यासाठीच इथले लोक जन्माला येतात काय? अजुन किती दिवस असचं होत राहणार?
या सगळ्या मंत्री-संत्री लोकांची सुरक्षा व्यवस्था काढुन टाकली पाहिजे...इथे जर जनताच सुरक्षित नसेल तर यांना का म्हणुन सुरक्षा पुरवायची?

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

घाशीराम कोतवाल १.२'s picture

27 Nov 2009 - 5:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

बाणा लेका प्रत्येक वाक्याशी सहमत रे भावा
ह्या मंत्री संत्री लोकांची सगळी सुरक्षा काढुन घेतली पाहिजे

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

सूहास's picture

27 Nov 2009 - 4:56 pm | सूहास (not verified)

.........

सू हा स...

प्राजु's picture

27 Nov 2009 - 5:46 pm | प्राजु

काही बोलायला शब्दच नाहीयेत.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

विकास's picture

27 Nov 2009 - 6:46 pm | विकास

सर्व छायाचित्रे छान आणि बोलकी आहेत. आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद!

बाकरवडी's picture

27 Nov 2009 - 7:15 pm | बाकरवडी

उत्तम निरीक्षण.........
छान फोटो.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Nov 2009 - 9:46 am | बिपिन कार्यकर्ते

कल्पकतेने काढलेली छायाचित्रं. धन्यवाद. खवळलेला मारूतराय जास्त आवडला आणि पटला.

मात्र, काल काही वृत्तपत्रात वाचेलेले... लोक अगदी पिकनिक मूडमधे होते. प्रसंगाचे गांभिर्य हरवले होते. वगैरे... परवाच ही छायाचित्रं पाहताना कुठे कुठे जाणवत होते. कालाय तस्मै नमः ... बहुधा एखाद वर्षा नंतर २६ नोव्हेंबर येईल आणि जाईल... किंवा त्याचे महत्व फक्त 'संविधान दिवस' म्हणून राहिल. असो.

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

28 Nov 2009 - 3:52 pm | गणपा

फोटो सुरेख आहेत..
काही लोकांच्या भावना खर्‍या असतीलही पण बरेच जण फिरायला आल्यासरखे वाटत आहेत :(
मेणबत्ती लावण्याच फॅडही बरच मूळ धरतय..

ऋषिकेश's picture

28 Nov 2009 - 3:54 pm | ऋषिकेश

फोटो सूचक आणि नेमके ..

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

विसोबा खेचर's picture

28 Nov 2009 - 4:46 pm | विसोबा खेचर

२६/११ च्या हल्ल्यात कामी आलेल्या सर्व जवानांना, बळी पडलेल्या सर्व नागरीकांना आदरांजली परंतु हा धागा पाहताना लाजही वाटली..

नाकर्त्या शासनकर्त्यांमुळे अवघ्या दहा-पंधरा ट्रेन्ड पोरांनी मुंबै ६० तास दहशतीखाली ठेवली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही..

ते १०-१५ दहशतवादी सतत ६० तास कमांडोंशी लढू शकतील एवढा दारूगोळा मुबैत आला केव्हा याचाही आम्हाला पत्ता लागला नाही. हे काही एका दिवसात होणारे काम नाही. अगदी पद्धतशीरपणे, पूर्वनियोजित असा हा हल्ला होता आणि याला आपली अत्यंत ढिली सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे..

आम्ही मात्र आजही मेणबत्त्या पेटवण्यात धन्यता मानतो आहोत..

असो, या मेणबत्त्या केवळ शहीदांसाठी. परंतु एका अर्थी पाकिस्तानने भारतावर लादलेल्या ६० तासांच्या त्या छोटेखानी युद्धात भारताचा पराभवच झाला आहे असे खेदपूर्वक म्हणावे लागेल..

तात्या.

स्वाती२'s picture

28 Nov 2009 - 5:42 pm | स्वाती२

+१
सहमत.

sujay's picture

28 Nov 2009 - 9:23 pm | sujay

+२
सहमत

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Nov 2009 - 4:14 pm | llपुण्याचे पेशवेll

मेणबत्त्या पेटवणार्‍यांचीही लाज वाटली. असो. ते सोडून लोक अजून काही करु तरी काय शकतात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

विकास's picture

1 Dec 2009 - 3:04 am | विकास

>>>एवढा दारूगोळा मुबैत आला केव्हा याचाही आम्हाला पत्ता लागला नाही. हे काही एका दिवसात होणारे काम नाही. अगदी पद्धतशीरपणे, पूर्वनियोजित असा हा हल्ला होता आणि याला आपली अत्यंत ढिली सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे..<<<

नुसती ढिली आणि ती पण सुरक्षा यंत्रणाच? अहो जेंव्हा आपण लाच घेयची सवय लावतो आणि लाचे शिवाय काम होऊ शकत नाही म्हणत चलता है करत लाच देत कामे करवून घेतो तेंव्हा त्याच्या पुढच्या पायर्‍या अशाच असणार...

रेशन कार्ड हवे आहे? ड्रायव्हरचे लायसन्स? कस्टम मधून सामान बाहेर आणायचे आहे? कुठलाही दाखला? अ‍ॅडमिशन्स? इत्यादी इत्यादी... इतकेच कशाला खाजगी क्षेत्रात काय चालते? हे काय सगळे एका दिवसात होत नाही. पण त्याचे परीणाम मात्र दूरगामी होत असतात. कोण कुठून काय आणते आहे (आठवते का १२ मार्च १९९३ च्या आधी श्रीवर्धनला असेच आरडीएक्स उतरवण्यात आले होते ते?), तर कुणाला रेशन कार्डे सहज मिळतात ते... तो हॅडली काय केवळ ढिली यंत्रणा म्हणून येथे राजरोस येऊ शकतो? तो केवळ काय सरकारचाच दोष आहे? राहूल भट्ट आणि बॉलीवूड काय करत होते? इतकी त्या हॅडलीची काय गरज होती या लोकांना? आणि तो महेश भट्ट बघा आता कसा ओरडत बसला आहे ते...

अहो, ब्रिटीशांनी अथवा त्या आधी मोगलांनी जितका आपला देश लुबाडला नसेल तितका आज आपणच लुबाडत आहोत - पैशाने आणि नैसर्गिक साधन संपत्तीने आणि त्याहूनही अधिक स्वतःचे इमान विकत... सर्व काही आम्ही विकू शकतो... जेंव्हा सगळेच विकाऊ असते तेंव्हा देश म्हणून आपण टिकाऊ कसे ठरणार? असो.

टुकुल's picture

28 Nov 2009 - 11:13 pm | टुकुल

...

भानस's picture

29 Nov 2009 - 12:02 am | भानस

छायाचित्रे. तात्यांशी सहमत. अशी वेळ पुन्हा येणार नाही अशी आशा तरी ठेवावी का?

श्रीयुत संतोष जोशी's picture

29 Nov 2009 - 10:07 am | श्रीयुत संतोष जोशी

मला ती पहाट आठवली.
पहाटे ४ वाजता फोन आला म्हणून टिव्ही लावला आणि ७ पर्यंत तसाच बसून होतो . विश्वास बसत नव्हता हे असं होतय यावर.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मॅन्ड्रेक's picture

29 Nov 2009 - 3:33 pm | मॅन्ड्रेक

at and post : Xanadu.

अशोक पतिल's picture

29 Nov 2009 - 8:40 pm | अशोक पतिल

मेणबत्त्या पेटवुन काहिहि होनार नाहि .
आता तोफ गोळेच पेटवा .

-----अनिकेत.

प्रभो's picture

29 Nov 2009 - 8:57 pm | प्रभो

चांगले फोटो......त्यादिवशीचे प्रसंग परत डोळ्यासमोर उभे राहिले....
यापुढे मेणबत्त्या पेटवायची वेळ येणार नाही अशी आशा करतो..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

महेश काळे's picture

30 Nov 2009 - 11:46 am | महेश काळे

फारच छान...
भारवुन गेलो...

काळे डॉट महेश ..

चेतन's picture

30 Nov 2009 - 12:46 pm | चेतन

लेख ठिक झालाय

हू किल्ड करकरेः द रिअल फेस ऑफ टेररीझम इन इंडीया ’ हे राज्याचे माजी इस्पेक्टर जनरल एस.एम. मुश्रीफ यांनि लिहलेली मुक्ताफळे ही वाचा

(उद्विग्न) चेतन

"शहीद होण्यासाठीच इथले लोक जन्माला येतात काय? अजुन किती दिवस असचं होत राहणार?"

पॅटन नांवाचा एक सिनेमा पाहिला होता. त्यात जनरल पॅटन त्याच्या सोजिरांना सांगतो "तुम्ही देशासाठी बलिदान करावं अशी माझी अजिबात इच्चा नाही. त्या ***ना त्यांच्या देशासाठी मरुदे."

चिंतामणराव

संजा's picture

30 Nov 2009 - 7:39 pm | संजा

सुरेख फोटो
फारच छान