चार भिंती अन डोक्यावरती आहे छप्पर म्हणायला..
जीव जडु दे त्याला लागु आपण ही घर म्हणायला..
मदत घेतली नाही मित्रा इतक्यासाठीच तुझ्याकडुन
लोक लागले मलाच असते तुझाच चाकर म्हणायला
जेव्हा जातो त्याच्यापाशी ह्ट्टापाशी अडुन बसतो..
त्याला आता नकोच आहे कुणीच ईश्वर म्हणायला...
दु:ख जरी तु देवुनि गेलीस हसतमुख मी असे सदा
निमित्त झाले दुनियेला असते दिली तु ठोकर म्हणायला..
सभ्यपणाच्या वस्त्राआडुन मला दाविता पुच्छच त्यानी..
त्यांना देखील हवेच होते मी ही वाSSनर म्हणायला...
क्षितिजावर मी धावुन गेलो लांघुन गेलो सर्व दिशा.
जिथे मी गेलो तिथे लागले दे दे भाकर म्हणायला..
इथे तिथे मी विखरुन गेलो..मोडुन गेलो डाव शेवटी
तिथे कुणी मज उरले नव्हते आवर सावर म्हणायला..
नको जीवना मला दाखवु मरण्याची तु भीती कधी..
मी ही देखील तयार आहे तुलाच जा मर म्हणायला..
---- कानडाऊ योगेशु
---------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
प्रतिक्रिया
27 Nov 2009 - 4:49 pm | प्राजु
नको जीवना मला दाखवु मरण्याची तु भीती कधी..
मी ही देखील तयार आहे तुलाच जा मर म्हणायला..
सुंदर!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
28 Nov 2009 - 7:32 am | पाषाणभेद
मस्त.
"जीव जडु दे त्याला लागु आपण ही घर म्हणायला.."
लागू दे त्यावर जीव आपण ही घर म्हणायला..
असे हवे होते असे मला वाटते.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
28 Nov 2009 - 1:55 pm | क्रान्ति
इथे तिथे मी विखरुन गेलो..मोडुन गेलो डाव शेवटी
तिथे कुणी मज उरले नव्हते आवर सावर म्हणायला..
वा! खास!
क्रान्ति
अग्निसखा