user

गुलमोहोर असा

लाल टपोऱ्या त्या फुलांचा
रंग चटकदार ऐसा शोभतो
वाळक्या त्या जंगलामधे
गुलमोहोर ऐटीत मिरवतो

बहर आला असा फुलांना
लाल दहकत्या रंगाला
वैशाखात ही दिमाखाने
सजत डोलत उभा राहिला

बहरला गुलमोहोर तरी
प्रिया माझी का येईना
वैशाख वणावा अंतरीचा
उरातुनी त्याचा दाह जाईना

प्रसन्ना जीके

आपले नाव

आपले नाव प्रसन्ना जीके आहे का ? Smile

कविता सुंदर आहे .. अगदी कविताच्या प्रेमात पडावं अशी Smile

- टारझन

मस्तच

मस्तच !

आपल्या काव्यप्रतीभेचा गुलमोहोर आजकल अप्रतीम बहरु लागला आहे.

पहिल्या दोन्ही अप्रतीम प्रतिक्रीया, ह्या टार्‍या आणी पर्‍या ह्यांच्या लाभल्याने आपल्या कवितेचे भविष्य उज्ज्वल आहे ह्यात शंका नाही.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

व्वा !!!

सुरेख .. शेवटची ओळ मस्तच जमली आहे !!

Scroll to Top