जय जवान जय किसान !

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
26 Nov 2009 - 1:27 pm

२६/११ च्या निमित्ताने....

!!जय जवान जय किसान!!

चला , २६/११ ला एक वर्ष झालं
नको त्या आठवणी म्हटलं तरी , जरा रक्त ओघळ्लं
हुतात्म्यांच बलिदान अगदीच फुकट नाही गेलं
वर्षभरात तसं काहीच नाही घडलं

देशात कुठे कुठे थोडफार झालं
पण आमच्या बापाच , त्यात काय गेलं...?
(बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होतेही है ! )
तशी आम्हाला सुरक्षेची आजिबात चिंता नाही
आमच्या देशात हुत्तात्म्यांची अगदीच काही कमी नाही

आहो सैनिकांच हेच तर काम असतं
लढता लढला देशासाठी कधीतरी मरायचं असतं
आपलाशेतकरी बघा , फुकटचा मरत असतो
इतके बॉम्बस्फोट होतात , आत्महत्या कशाला करतो...?

मरायच तर लेका , बोम्बस्फोटात मरावं
आपल्या कुटुंबाचं येड्या, भलंतरी करावं
अरे शास्त्रीजींच्या मन्त्राने भरून घे कान
उगीच का म्हणतात ...?
जय जवान जय किसान

कविता

प्रतिक्रिया

चेतन's picture

26 Nov 2009 - 2:17 pm | चेतन

सुरेख पण म्हणवत नाही

जय जवान जय किसान
चेतन

गणपा's picture

26 Nov 2009 - 2:58 pm | गणपा

भळभळणार्‍या जखमेला चांगल कस म्हणु ?

मदनबाण's picture

26 Nov 2009 - 7:41 pm | मदनबाण

!!जय जवान जय किसान!!
ही घोषणा अजुन आहे ??? मला वाटले हिंदूस्थानी लोकांना या घोषणेचा कायमचा विसर पडला आहे !!!
आपलाशेतकरी बघा , फुकटचा मरत असतो
इतके बॉम्बस्फोट होतात , आत्महत्या कशाला करतो...?

हा प्रश्न आपल्या राजकारण्यांना कधीच पडणार नाही याची १००% खात्री बाळगा.

(जवान आणि किसान यांचा ॠणी )
मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2009 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-(

क्रान्ति's picture

27 Nov 2009 - 8:30 pm | क्रान्ति

तशी आम्हाला सुरक्षेची आजिबात चिंता नाही
आमच्या देशात हुत्तात्म्यांची अगदीच काही कमी नाही

अगदी खरंय!

क्रान्ति
अग्निसखा