(माजुर्डा डास)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
25 Nov 2009 - 10:13 pm

प्रेरणा जयवीताईंची सुंदर कविता हिरवा साज.

गुणगुणतो चावतो पकवतो, घुसला घरात डास
धडकी भरवतो मनात, तोचि एक डास

प्रतीक्षा कसली करीशी, आहे जालिम इलाज
हाती घेतली रॅकेट, मारायाची भारी खाज

धडपडायचे मम डोहाळे, लपे तो निगरगट्ट
मारायचे आज त्याला, लावा ऑल-आउट

मिरवते द्रव आतले, बाटली ती भगवी
वीज गेली, आली परी दैवगती आडवी

शांत बसता दिला तयाला, एक फटका जोरकस
हाय लागले "आई गं", नेम माझा हिणकस

शोषिले रक्त माझे हळूच डाव साधून
झोपावे आता तरी, गोधडी ही पांघरून

करुणविडंबन

प्रतिक्रिया

गणपा's picture

25 Nov 2009 - 10:17 pm | गणपा

हा हा हा मस्त..

प्रभो's picture

25 Nov 2009 - 10:21 pm | प्रभो

चालू द्या..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

jaypal's picture

25 Nov 2009 - 10:21 pm | jaypal


-**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमृतांजन's picture

26 Nov 2009 - 11:33 am | अमृतांजन

दुर्बिणीतून फारच मोठे दिसत्तात बाई हे डास!

धमाल मुलगा's picture

25 Nov 2009 - 10:24 pm | धमाल मुलगा

म्हणुन आत्ता ऑनलाईन आहेस होय?

सरळ आपलं ओडोमॉस आणाव, आणि मस्तपैकी चोपडावं...स्वतःच्या अंगाला, डासांना नव्हे!
पण तुम्हाला जुन्या गोष्टी चालतील तर ना....ती विजेवरचीच महागडी कामं लागतात तुम्हाला. :P

-(क्यास्पर) ध.

श्रावण मोडक's picture

25 Nov 2009 - 10:45 pm | श्रावण मोडक

बरी आहेस ना? हल्ली चाललंय काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Nov 2009 - 10:55 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

26 Nov 2009 - 6:29 am | सहज

हेच म्हणतो.

टारझन's picture

25 Nov 2009 - 10:51 pm | टारझन

अतिशय सुंदर अशा कवितेचे तितकेच प्रभावी आणि चाणाक्ष आणि मर्मावर नेमकं बोट ठेऊन केलेलं विडंबण !! लेखिकेने आपल्या लौकिकास जागुन अत्यंत मार्मिक टिपण्णी करत डासांना चिमटे काढलेले आहेत.
थोडक्यात विडंबण हृदयाला भिडले !!

जग अदिती.

- टारझन

चतुरंग's picture

25 Nov 2009 - 10:54 pm | चतुरंग

तुझे हे असले 'शिकरण प्रतिसाद' बंद कर बुवा आधी!! X(

(खर्डा)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Nov 2009 - 11:00 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठशी आम्ही बाय डिफॉल्ट सहमत असतो.

(ठेचा) बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

25 Nov 2009 - 11:11 pm | प्रभो

>>तुझे हे असले 'शिकरण प्रतिसाद' बंद कर बुवा आधी!!

टार्‍या, संपादक स्वतः तुला मोड बदलायला सांगतायत..नंतर मालक म्हणतील की आयडी उडवतो....जपून पावले टाक बाबा... :)

(शिकरण्,खर्डा,ठेचा सगळं आवडणारा)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Nov 2009 - 8:37 am | llपुण्याचे पेशवेll

संपादक स्वतः तुला मोड बदलायला सांगतायत
काय रे टार्‍या तुला कधी मोड आला? तरी सांगत होतो तर्री जरा कमी खा. प्रभो तू पण सांभाळून रे, नाही "खर्डा,ठेचा सगळं आवडणार" असं लिहीलं आहेस म्हणून सांगितलें.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पक्या's picture

25 Nov 2009 - 11:00 pm | पक्या

विडम्बन जमले नाही हो. उगाच काहितरी लिहायचे म्हणुन लिहिले असे वाटत आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Nov 2009 - 9:34 am | llपुण्याचे पेशवेll

विडंबन ठीक.
कवितेची निवड - २ मार्क
वातावरण निर्मिती - २ मार्क
'र' ला 'ट' जुळवणे (यमक) - ०.७५ मार्क
कल्पनाशक्ती - २ मार्क
परिणाम कारकता - १ मार्क

एकूण मार्क १० पैकी ७.७५

अदितीबै,
कविता चांगली होण्यासाठी कमीत कमी ७.७५ मार्कांची आवश्यकता असते. अशा कविता पाडण्यापेक्षा गूगल डॉक्सवर पुस्तके चढवून त्याच्या लिंका इथे चघळायला देत जा! त्याने चांगला टाईमपास होईल.
असो.
पुलेशु, मागची कविता अगदीच ५.७५ त्यापेक्षा यावेळेला ७.७५ म्हणजे सुधारणा आहे म्हणायची. असो हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्याने आपले हृदयपरिवर्तन होऊन आपण चांगल्या कविता पाडाल अथवा माझे हृदयपरिवर्तन होउन मला तुमच्या कविता वाचायची आवड निर्माण होईल अशी देवाकडे (खर्‍याखुर्‍या) प्रार्थना.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

चेतन's picture

26 Nov 2009 - 9:53 am | चेतन

विडंबन मस्त

चेतन

अवांतरः हा जयपाल कुठून एवढी चित्र शोधुन आणतो बरे :?
अतिअवांतर: डास माजुर्डा कसा? ;)

निखिल देशपांडे's picture

26 Nov 2009 - 9:59 am | निखिल देशपांडे

आठवड्यानंतर ताप मजला चढला
शोषुनिया रक्त प्रसाद डेंगुचा मिळाला

रक्तातले झाले कमी अचानक प्लेटलेट
डॉक्टर वदती व्हा लगेच अ‍ॅडमिट

हट्टाकट्टा झाले पिउन दहा बारा सलाईन
म्हणती डॉक्टर रहा डासांपासुन जपुन

मलेरिया, डेंगु, गुनियाचिकन घालती दंगा
डासांशी ह्या घेउ नका उगाच काही पंगा

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

धमाल मुलगा's picture

26 Nov 2009 - 4:14 pm | धमाल मुलगा

ही रचनादेखील उत्तमच!
आणी विशेष म्हणजे स्वानुभवाचं ज्वलंत दु:ख ह्या कवितेला करुणतेची हळवी झालर लावते.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2009 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय उत्तम अशी काव्य रचना केलेली आहेस रे निख्या.
निख्या हा आमचा आवडता पुरुष असल्याने त्याच्या कवितेपुढे तुमची कविता म्हणजे 'लंकेची पार्वती' आहे असे म्हणावे लागेल.

पुपे ह्यांचे रसग्रहण अगदी त्यांच्य सोमरसग्रहणा इतकेच दर्जेदार व प्रशंसनीय. कधी कधी त्यांच्या रसग्रहणानी एखाद्या कवितेला उच्च दर्जा मिळतो असे नमुद करावेसे वाटते.

©º°¨¨°º© अखिल डेंगीपांडे ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

26 Nov 2009 - 10:52 am | अवलिया

डासासारख्या प्राण्याला माजुर्डा म्हटल्याबद्दल अदितीचा जाहिर निषेध !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Nov 2009 - 1:39 pm | ब्रिटिश टिंग्या

अवलियाला बाय-डिफॉल्ट सहमत आहे!

अदितीचा नेहमीप्रमाणे जाहिर निषेध !

हे पहिल ठरवा. बाकी तुमच्या प्रतीसादाशी सहमत.

वेताळ

धमाल मुलगा's picture

26 Nov 2009 - 6:35 pm | धमाल मुलगा

कि ट क!

*म्हणुन शाळेत अभ्यासाच्या वेळी अभ्यास करावा, इकडंतिकडं टापाटापी करु नये. ;)