************************
************************
जगलो तुला घेऊन राजरोस आयुष्या
का तुला अंधाराचा आता सोस आयुष्या
बहरातले जीणे शिशिरातली गाणी झाली
टाकलेस दान किती भरघोस आयुष्या
सवेच फिरलो झिंगलो नाचलो खेळलो
घातला मनस्वीच ऐसा हैदोस आयुष्या
खेळलो सगळेच डांव अन निर्ढावलोही
तिथे असायचास आता नसतोस आयुष्या
आता मोजकाच उरलो ओळखुन आहे
श्वासांचे इमले झाले रे ओस आयुष्या
अतृप्तीची काहाणी नव्याने लिहून पाहू
वार्धक्याचा नको रे अफसोस आयुष्या
अमर्याद तुझा संग हवा ही आंस नाही
पण अंक शेवटाचा हवा ठोस आयुष्या
*************************
*************************
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 5:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुरूवात वाचल्यावर शेवट असा असेल असं वाटलं नाही, पण शेवट आवडला; त्यामुळे कविताही.
अदिती
26 Nov 2009 - 1:37 pm | श्रावण मोडक
+१
25 Nov 2009 - 6:31 pm | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
26 Nov 2009 - 2:26 am | पाषाणभेद
तेच म्हणतो.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
26 Nov 2009 - 2:30 am | टुकुल
मस्त ..
--टुकुल
26 Nov 2009 - 12:13 pm | चेतन
सुंदर कविता
अवांतरः हे "आयुष्या" सारख आणखी कुठेतरी वाचल्याचं आठ्वतयं
अतिअवांतरः कच्चा माल बरा सापडला ;)
26 Nov 2009 - 1:43 pm | विशाल कुलकर्णी
आवडली :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"