आमच्या कवितेची प्रेरणा
टंकतानाही का ना टीकेना शब्द आता सांग ना
तेच सारे ताव आणि त्याच सार्या वल्गना
हाणामार्या त्याच त्या की, वारही हो तेच ते
तेच ते धमकाविणे अन मिर्या वाटणे पुन्हा
भांडताना हाणतो मी त्यासहो पुन्हा पुन्हा
असते तेथेही नित्य संपादकीय निर्भत्सना
घाव तेही वर्मीचे, 'भुर्र' झाले नेमके
तेच ते निषेध आणि त्याच शरमेच्या भावना
तीच संस्थळे आणि तीच संपादकीय धोरणे
तेच ते लोचट करती लुभ्रा निलाजरेपणा
जा कुठेही मिळती तेच फासलेले रंगही
भुर्र होई वेगळीशी मांडलेली भावना..
सर्वत्र जा तीच वृत्ती दिसतसे या लोचना
एक नागोबाच वसतो वेगवेगळाल्या बिळा
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 8:49 am | विसोबा खेचर
हम्म! हे बाकी खरं आहे!
तात्या.
25 Nov 2009 - 8:52 am | प्रभो
भांडताना हाणतो मी त्यासहो पुन्हा पुन्हा
असते तेथेही तित्य संपादकीय निर्भत्सना
वा ...तोडलस मित्रा...पुप्या हुच्च कविता रे..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 8:56 am | टुकुल
पुप्या..
तुला आपल्या कडुन एक गाय छाप, चुन्या सहित .. लै भारी.
--टुकुल
25 Nov 2009 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. पेशवे-जी, असं म्हणतात की एखाद्या सुंदर रचनेमागे एक दर्द असतो. तुमच्या या रचनेमधून तो दर्द अगदी वारंवार डोकावत आहे. अर्थात हा दर्द, ही वेदना, तुमची स्वतःचीच असेल असं नाही, पण दुसर्याचे दु:ख पाहून तुमचे हळूवार मन अशा प्रकारच्या रचनेच्या स्वरूपात वेदना प्रकट करत आहेत यातच तुमची भावना आणि अनुभूती यांचा उच्च दर्जा दिसून येत आहे.
टंकताना .. टीकेचा, भुर्र ... भावना या अनुप्रासातून कवीने एक अतिशय वेगळीच उंची गाठली आहे. त्याच वेळी कवीने भांडताना, हाणतो, धमकाविणे असे भेदक शब्द वापरून अगदी खोलवर प्रहारही केला आहे. या सर्व परिमाणांमुळे श्री. पेशवे यांची ही रचना वाचकांना एका वेगळ्याच अनुभूतीच्या प्रवाहात आणि नव्याच मितीत नेऊन सोडते. या सर्वांचा परिपाक म्हणून प्रस्तुत रचना सद्यस्थितीतल्या अशांत जगाशी एक नातं सांगत तरीही स्वतःचं वेगळेपण जपत आपल्यासमोर येते.
यातच पेशवे यांचं एक रचनाकार म्हणून यश आणि अपयश दोन्ही समाविष्ट आहे.
अदिती
*हा प्रतिसाद सध्या गायब असलेले आमचे मित्र श्री. लिखाळ-गुरूजी यांना सादर समर्पित.
25 Nov 2009 - 10:38 am | विसोबा खेचर
सहमत आहे. एखाद्या ठिकाणापाशी राहताही येत नाही, वा तेथून जाताही येत नाही, किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असे एखादे अवघड जागेचे दुखणे झाले की ती अवस्थादेखील दर्दभरी असते!
हम्म! जेव्हा प्रत्येक व्यक्ति स्वत:च्या मर्यादा ओळखून त्याच मर्यादांमध्ये चूपचाप राहील, तेव्हा जगाच्या अशांततेचे माहीत नाही परंतु त्या व्यक्तिपुरती तरी अशांतता सम्पून तेथे शांतता प्रस्थापित होईल असे वाटते!
तात्या.
25 Nov 2009 - 11:00 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे.
सहमत आहे. एखाद्या ठिकाणापाशी राहताही येत नाही, वा तेथून जाताही येत नाही, किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असे एखादे अवघड जागेचे दुखणे झाले की ती अवस्थादेखील दर्दभरी असते!
समवेदना (संवेदना नव्हे) किंवा सह अनुभूती म्हणजे काय ते मला तात्याच्या प्रतिसादातून कळले. या तरल संवेदना टिपण्यासाठी मनुष्य त्या अनुभवातून तावून सुलाखून अनुभव समृद्ध असावा लागतो. अर्थात दुनिया पाहीलेला तात्या तसा असणारच यात शंकाच नाही. धन्यवाद तात्या.
हम्म! जेव्हा प्रत्येक व्यक्ति स्वत:च्या मर्यादा ओळखून त्याच मर्यादांमध्ये चूपचाप राहील, तेव्हा जगाच्या अशांततेचे माहीत नाही परंतु त्या व्यक्तिपुरती तरी अशांतता सम्पून तेथे शांतता प्रस्थापित होईल असे वाटते!
आपल्याशी शतशः सहमत आहे. आपले परखड विचार नेहेमीच वाचनीय असतात.
(गडद - धुसर, खालच्या-वरच्या रेषा जिथून सुरु होतात तिथेच संपणारा)
पुण्याचे पेशवे
25 Nov 2009 - 11:06 am | विसोबा खेचर
धन्यवाद...
छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून कविता/विडंबनं न करता चार-पाचशे रुपायांच्या नौकरीकरता,
"अबे ए, मन्सूर को एक चपटी देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै भूर्जीभी भेज फटाफट..!"
अश्या मग्रूर भाषेतला फोन ऐकला तेव्हाच आयुष्यात खूप काही भोगलं, शिकायला मिळालं!
"क्यो बे तात्याखान, वो नैनारंडी तेरेको अंडा बोली तो तुरंन्त भेज दिया, साला तेरेको फोकटमे गेम बजाने देती क्या?! हॅ हॅ हॅ"
असा संवाद जेव्हा ऐकला तेव्हाच मान-अपमान-अवहेलना-पाणउतारा वगैरे सर्वांच्या पलिकडे गेलो होतो!
असो,
आपला,
तात्या अभ्यंकर,
*प्रतिसाद संपादित.
25 Nov 2009 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद तात्या.
आपले तावून सुलाखून निघण्याचे अनुभव छानच. अजून येऊदेत. त्या विश्वावर परत एकदा रोशनी टाका.
(छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून कविता/विडंबनं करण्यासाठी पूर्वी खूप मेहनत केलेला)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
25 Nov 2009 - 11:23 am | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद तात्या !!
डोळे पाणवल्या गेले :( खरंच तात्या किती खडतर आयुष्य जगला आहात तुम्ही.. तुम्ही जे पाहिलंत त्यच्या १०% पण आम्ही स्वप्नातही पाहिलेलं नाही !
आपल्या जिगरबाज आयुष्याला सलाम आहे तात्या !!
केवळ नतमस्तक !!
- (फक्त सुखात आयुष्य जगलेला) टारझन
25 Nov 2009 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऐला, लिखाळाची वही हळूच पाहून त्यातले शब्द ढापून इथे काहीतरी(च) लिहीलं तर त्यावरून मिपावर चर्चा होत आहे .... हल्ली कोणीही (पक्षी: मी) काहीही (पक्षी: निर्बुद्ध शब्दबंबाळ प्रतिसाद) लिहीलं की त्याला वैचारीकतेचा झगा चढतो हे माहित नव्हतं.
अदिती
25 Nov 2009 - 10:07 am | चेतन
पुपे निशाणा बरोबर साधलाय पण बाणात गडबड आहे
पुलेशु
चेतन
25 Nov 2009 - 10:26 am | टारझन
गेल्या बुधवारी टाकली असतीस तर विस्तृत प्रतिसाद दिला असता श्रीमान पेशवे.
असो .. आपल्या कविता रचनेच्या गुणांनी मी मात्र प्रभावित झालो आहे .
मी आपला एक चाहता आहे ! अर्थपुर्ण आणि सुरेख रचना .. चाल लावून वाचली .. मजा आली
- टारझन
25 Nov 2009 - 11:03 am | गणपा
मराठी आंतर्जालीय सद्य परिस्थिती वरच बोलके काव्य.
जियो पुपे. बुधवार परत सार्थकी लागला.
कडव न कडव दाद देण्या जोग.
-गणपा
25 Nov 2009 - 1:16 pm | अमृतांजन
प्रकाटासा
25 Nov 2009 - 1:15 pm | अमृतांजन
+२ असेच म्हणते.
25 Nov 2009 - 11:10 am | अवलिया
पुपे अंमळ भिकारचोट आहे.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
25 Nov 2009 - 11:40 am | ब्रिटिश टिंग्या
सहमत आहे!
पुपे अंमळ अवलिया आहे.
- टिंग्या
आम्ही आजकाल शिवराळ भाषा अन् सह्यांचे विडंबन करणे बंद केले आहे. अधिक माहिती व्यनीमधुन.
25 Nov 2009 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार
पुपे अवलिया आणी टिंग्या हे तिघेही महा भिकारचोट आहेत.
अतिशय सुंदर पद्य हो पुपे. काळजाला ते हे पडले, ते काय म्हणतात ते... हान घरे घरे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
25 Nov 2009 - 12:58 pm | श्रावण मोडक
कैच्या कैच प्रतिभा याची!
25 Nov 2009 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते
हीकछा, आ. पुकशु.
बिपिन कार्यकर्ते
25 Nov 2009 - 2:44 pm | निखिल देशपांडे
पेशेवेजी आपण एक उत्तम कवी आहात... कवी म्हणुन तुमची कविता भरत चाललेली आहे....
उत्तम पद्य.. कवितेतल्या वेदना कळुन येत आहे...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
25 Nov 2009 - 5:21 pm | मस्त कलंदर
उत्तम पद्य.. कवितेतल्या वेदना कळुन येत आहे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Nov 2009 - 5:47 pm | धमाल मुलगा
हम्म..चालायचंच!
ह्म्म..खरं आहे!
कुठेही असो, दोन्ही बाजु त्याच अन तशाच...जिकडेतिकडे आपापले मापदंड इतकंच! :)
दुर्दैवानं सहमत असेच म्हणावे लागते आहे! जळजळीत वास्तव!!
असो, कुठेही जा, इथुनतिथुन माणुस शेवटी सारखाच! भले गोळीवर कोणत्या रंगाचा साखरपाक इतकाच काय तो फरक... काय म्हणता?
-(संस्थळमुक्त बैरागी) ध.
25 Nov 2009 - 7:03 pm | सूहास (not verified)
भांडा सौख्यभरे !!
सू हा स...